एका मोबिलिटी (EKA Mobility) आणि ग्रीनसेल मोबिलिटी (GreenCell Mobility)चा १००० इलेक्ट्रिक बसेस आणण्यासाठी सामंजस्य करार

  • या पथदर्शक सहयोगाअंतर्गत एका मोबिलिटी १००० इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन करून त्यांचा पुरवठा ग्रीनसेल मोबिलिटीला करेल
  • या इलेक्ट्रिक बसेस दर वर्षी इंधन खर्चात ७० कोटी रूपयांची बचत करतील आणि १२० लाख गॅलन डिझेल जाळण्याचे टाळले जाईल म्हणजेच जे १५ लाख झाडे वाढवण्‍याच्‍या समानुपाती आाहे
  • या १००० इलेक्ट्रिक बसेसच्या वापरामुळे दररोज ६ लाख व्यक्तींना फायदा होईल असा अंदाज आहे
  • या इ-बसेस ३२४०० टनांनी कार्बन डाय ऑक्साइड ऊत्सर्जन कमी करतील आणि जागतिक व राष्ट्रीय शाश्वतता ध्येयांनुरूप काम करून एका आरोग्‍यदायी वातावरणात योगदान देतील.

मुंबई४ जानेवारी २०२४ (GPN): एका मोबिलिटी ही आघाडीची इलेक्ट्रिक वाहने आणि तंत्रज्ञान कंपनी (समभाग भागीदार म्हणून मित्सुई कं. लि. आणि व्हीडीएल ग्रुप) आणि ग्रीनसेल मोबिलिटी ही इलेक्ट्रिक मास मोबिलिटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी यांनी सामंजस्य करारनाम्यावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत एका मोबिलिटी पुढील काही वर्षांत १२ मीटर आणि १३.५ मीटर श्रेणीत १००० आंतरशहर इलेक्ट्रिक बसेस ग्रीनसेल मोबिलिटीला पुरवेल. एका मोबिलिटी आणि ग्रीनसेल मोबिलिटी सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत आमूलाग्र बदल घडवून जागतिक ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठ्या सकारात्मक बदलाला चालना देण्यासाठी एकत्रितरित्या काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत.

एका मोबिलिटीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी या धोरणात्मक भागीदारीबाबत बोलताना सांगितले की, आमची ग्रीनसेल मोबिलिटीसोबतची भागीदारी इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतुकीद्वारे अधिक स्वच्छ अधिक शाश्वत भविष्याप्रति पुढे जाणारी आहे. सार्वजनिक वाहतूकविशेषतः इंटरसिटी बस वाहतूक हे ५०% पेक्षा जास्त भारतीयांसाठी वाहतुकीचे प्राथमिक साधन आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या विद्युतीकरणामुळे सर्वांसाठी स्वच्छ हवाशांत रस्तेअधिक कार्यक्षमसोयीस्करसुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाचा मार्ग मोकळा होईल. एकामध्ये आम्ही शाश्वत पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक आणि फायदेशीर उत्पादने विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमचे कौशल्य वापरूनआम्ही व्यावसायिक इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये नवीन मानके आखून देण्याची आशा करतो. त्यामुळे देशाच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांमध्ये लक्षणीय योगदान दिले जाईल.”

एमओयूवर स्वाक्षरी करण्याबाबत बोलताना ग्रीनसेल मोबिलिटीचे एमडी आणि सीईओ श्री. देवेंद्र चावला म्हणाले की, “इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एका मोबिलिटीसोबतची आमची भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी बाजारपेठेतील आमची स्थिती तर मजबूत करेलच पण शाश्वत गतिशीलतेसाठी आमचा दीर्घकालीन दृष्टीकोनदेखील अधोरेखित करते. मार्केट लीडर म्हणून ग्रीनसेल मोबिलिटीमध्ये आम्ही उद्योगात नवीन मानके स्थापित करत आहोत. आमचे एकत्रित प्रयत्न स्वच्छ, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल उपाययोजना देऊन सार्वजनिक वाहतुकीचे परिवर्तन करतील. नावीन्यपूर्णता आणि शाश्वततेच्या आमच्या वचनबद्धतेच्या दिशेने ही एक महत्त्वाची वाटचाल आहे आणि हरित, अधिक शाश्वत भविष्याप्रति आमचे वचन अधोरेखित करतो. या भागीदारीबद्दल आम्ही उत्सुक आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या उत्क्रांतीमध्ये आघाडी घेण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

एका मोबिलिटीवर या बसेसचा पुरवठा, विक्री आणि सेवेची जबाबदारी असेल, तसेच या एकत्रित प्रयत्नात सर्वोच्च मानके देण्यासाठी दर्जा प्रमाणन अहवालही देईल. एक हजार इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्याचा आपल्या पर्यावरणावर मोठा आणि सकारात्मक प्रभाव पडेल. त्यातून वार्षिक इंधन खर्चात ७० कोटी रुपयांची बचत आणि १२० लाख गॅलन डिझेल वाचेल, जे १५ लाख झाडे वाढवण्यासारखे आहे. सुधारित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक सुविधांचा दररोज सुमारे ६ लाख लोकांना फायदा होईल. या उपक्रमामुळे ३२४०० टन कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जन वाचेल, तसेच टेलपाइप उत्सर्जन कमी होण्यास आणि स्वच्छ, अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्यात मोठा हातभार लागेल.

ही भागीदारी स्वच्छ आणि अधिक पर्यावरणास अनुकूल वाहतूक पर्यायांची अतीव गरज ओळखून, शाश्वततेप्रति प्रमुख राष्ट्रीय व जागतिक उपक्रमांशी सुसंगत आहे. एका मोबिलिटी आणि ग्रीनसेल मोबिलिटीचा संयुक्त उपक्रम हरित भारत आणि स्वच्छ जगाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

एका मोबिलिटी ही भारत सरकारच्या ऑटो पीएलआय धोरणाच्या चॅम्पियन ओईएम योजना आणि ईव्ही युनिट उत्पादन योजनेअंतर्गत मंजूर व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे. एका ही भारतातील इलेक्ट्रिक नवीन ऊर्जा व्यावसायिक वाहनांचे एंड-टू-एंड डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान ऑफर करणार्‍या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने महाराष्ट्रातील पुणे येथे एक अत्याधुनिक संशोधन, विकास, अभियांत्रिकी आणि नवप्रवर्तन केंद्र स्थापन केले आहे आणि तिच्याकडे सध्या ७०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस आणि ५०००+ इलेक्ट्रिक हलक्या वाणिज्यिक वाहनांच्या ऑर्डर्स आहेत. ही सर्व वाहने भारतात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच्या प्रस्तावित आणि चालू असलेल्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये डिझाइन आणि उत्पादित केली जातील. कंपनीने मागच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक सिटी बस, कर्मचारी वाहक आणि स्कूल बस, ९-मीटर हायड्रोजन इंधन-सेल इलेक्ट्रिक बस आणल्या आहेत आणि आता डिझाइन केलेल्या व सानुकूलित केलेल्या ई-एलसीव्हीच्या श्रेणीसह ती भारतीय ग्राहक आणि व्यवसायांना अनुरूप गाड्या आणण्यासाठी सज्‍ज आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एका मोबिलिटी (EKA Mobility) आणि ग्रीनसेल मोबिलिटी (GreenCell Mobility)चा १००० इलेक्ट्रिक बसेस आणण्यासाठी सामंजस्य करार"

Leave a comment

Your email address will not be published.


*