Cauvery Calling Movement’s Update: 2 Crore Saplings Planted In A Year Taking Total To 10.9 Crore-श्रीरंग बारणेंना खासदार बनवण्यासाठी सुधाकर भाऊ घारेंनी लावली ताकत : कर्जत- खालापूर मतदारसंघात आढावा बैठकांचे सत्र सुरु-Dr L H Hiranandani Hospital marks 50 Bone Marrow Transplants-Bank of Baroda ropes in Kunaal Roy Kapur for PehchaanCon 3.0 campaign to spread awareness on new-age financial frauds-आजच्या युगातील आर्थिक फसवणुकीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने पेहचानकॉन 3.0 कॅम्पेनसाठी केली कुणाल रॉय कपूरशी हातमिळवणी.-GJEPC: The Authorized Economic Operator (AEO) Status Now Extended To The Gem & Jewellery Sector-GJEPC: Plain Gold Jewellery Exports Grew by 61.72% to US$ 6792.24 million in FY 2023-24-Dabur Glucose launches ‘Energize India’ Campaign to Promote Young Athletes-The Yoga Institute Santa Cruz, Mumbai Announces Free Access to "Samattvam" Yoga OPD in Honor of Dr. Jayadeva Yogendra's Birth Anniversary on 27th April 2024-Bullet Echo India scales the Google Play Store charts; KRAFTON and ZeptoLab officially announce the launch of the game in India

डिझाइन नाविन्यपूर्णतेवर गोदरेज अप्लायन्सेसचा भर वुड-फिनिश, निसर्ग-प्रेरित एसी आणि रेफ्रिजरेटर्स सादर

• प्रिमियम विभागातील व्यवहार प्रमाण ४५% वरून ५५%पर्यंत वाढवणे आणि मजबूत उत्पादन पोर्टफोलिओसह उन्हाळ्यात त्यांच्या विक्रीत २०% वाढ करणे हे ब्रँडचे उद्दिष्ट

• क्युरेटेड ॲक्सेसरीज आणि होम डिझाइन गाईडसाठी इंडिया सर्कसच्या कृष्णा मेहता यांच्या सहकार्याने ग्राहकांचा अनुभव उंचावणार

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४ (GPN): गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसने इऑन वोग ही निसर्ग-प्रेरित वुड-फिनिश होम अप्लायन्सेसची नवीन मालिका सादर केली आहे. प्रगत, अत्याधुनिक रेफ्रिजरेटर्स आणि एअर कंडिशनर्सचा समावेश असलेली ही श्रेणी सौंदर्यशास्त्र आणि तंत्रज्ञानाचे अनोखे मिश्रण आहे. हे समकालीन भारतीय गृहसजावटीला पूरक असून त्याला वेगळ्याच उंचीवर नेते.

ब्रँडद्वारे केलेल्या भारतीय घरांच्या सर्वेक्षणानुसार, ७०% पेक्षा जास्त प्रतिसादकर्त्यांनी असे म्हटले होते की त्यांना त्यांच्या घराच्या सजावटीला अधिक अनुकूल अशा उपकरणांचे पर्याय बघण्याची ईच्छा आहे. अर्ध्याहून अधिक लोकांनी सांगितले की त्यांना त्यांच्या घरात सर्वकाही चांगले जुळणारे, सुसंगत असावे असे वाटते.

नवीन सादरीकरणाबद्दल बोलताना गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “आजकाल स्वत:च्या मालकीचे घर घेण्यासाठीचे सरासरी वय कमी होत चालले आहे. वाढते डिस्पोजेबल उत्पन्न आणि सहज उपलब्ध होत असलेले कर्ज यामुळे हे वय आता तिशीमध्येच येत आहे. हे तरुण भारतीय ग्राहक आपली घरे बांधण्यासाठी खूप प्रयत्न करतात, सर्व काही सुसंगत डिझाइनमध्ये सामावले जात आहे ना याची खात्री करतात. परंतु गृह सजावट आणि त्याला अनुरूप सुंदर दिसणारी घरातील उपकरणे असा मुद्दा येतो तेव्हा त्यांना जरा अडचणींचा सामना करावा लागतो. प्रिमियमायझेशनच्या सध्या सुरू असलेल्या लाटेमध्ये आजच्या काळात खरेदीसाठी सौंदर्यशास्त्र ही एक महत्त्वाची बाब आहे. गोदरेज अप्लायन्सेसच्या विचारपूर्वक बनवलेल्या गोष्टींच्या तत्त्वज्ञानाला खरे उतरत ब्रँडने पुन्हा एकदा ही गरज भरून काढण्यासाठी नवनिर्मिती केली असून  निसर्ग प्रेरित, वुड-फिनिश अशी एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्सची गोदरेज इऑन वोग मालिका सादर केली आहे. इतर प्रीमियम सादरीकरणासह प्रिमियम विभागातील व्यवहार प्रमाण ४५% वरून ५५%पर्यंत वाढवणे आणि मजबूत उत्पादन पोर्टफोलिओसह उन्हाळ्यात त्यांच्या विक्रीत २०% वाढ करणे हे ब्रँडचे उद्दिष्ट आहे.”

डिझाईनमागील विचार अधोरेखित करताना गोदरेज अप्लायन्सेसचे डिझाईन प्रमुख कमल पंडित म्हणाले, “आम्ही आमच्या झपाट्याने बदलणाऱ्या शहरांचे निरीक्षण केले आहे. यामध्ये मोठ्या बहुमजली इमारती स्वतंत्र घरांची जागा घेत आहेत आणि ग्राहक निसर्गापासून दूर जात असल्याचे लक्षात आले आहे. आमच्या हे देखील लक्षात आले की भारतीय घरांमध्ये उपकरणे ही बहुतांशवेळेला काच आणि स्टीलसह काळ्या वा चंदेरी रंगात असतात. या सगळ्यात घरातील उबदारपणाही कमी कमी होत जातो. आम्ही निसर्गापासून प्रेरणा घेणे निवडले आणि व्यावहारिकता अबाधित ठेवत, आमच्या घरांना सुसंगत आणि पूरक करण्यासाठी, अनेक छटांमध्ये नैसर्गिक लाकूड फिनिश उपकरणे आणली. इऑन वोग मालिका पाणी, डाग आणि ओरखडे प्रतिरोधक, स्वच्छ करण्यास सोपी आणि टिकाऊ आहे.”

ग्राहकांना त्यांच्या घरांमध्ये डिझाईन बदलाचा अनुभव घेता यावा आणि त्यांचा अवलंब करण्यात मदत व्हावी यासाठी, ब्रँडने इंडिया सर्कसचे संस्थापक आणि डिझाईन डायरेक्टर कृष्णा मेहता यांच्याशी सानुकूलित घर डिझाइन मार्गदर्शकासाठी सहयोग केला आहे. नवीन इऑन वोग मालिका पहिल्या एक हजार ग्राहकांसाठी १,९९९ रु. पर्यंत विविध गृहसजावट शैली आणि खास निवडलेल्या निसर्ग प्रेरित इंडिया सर्कस ॲक्सेसरीजसह उपलब्ध आहे.

या सादरीकरणा प्रसंगी बोलताना इंडिया सर्कसचे संस्थापक आणि डिझाईन डायरेक्टर कृष्णा मेहता म्हणाले, “गोदरेज अप्लायन्सेसची नवीन वुड-फिनिश मालिका ही भारतातील सजावटीच्या जगात स्वागतार्ह प्रवेशिका आहे. डिझाईनमध्ये निसर्ग-प्रेरित घटकांचा समावेश झाल्याचा मला आनंद आहे आणि तुम्ही इंडिया सर्कसमध्ये देखील तेच डिस्प्लेवर पाहू शकता. लाकूड हे एक नैसर्गिक फिनिश असल्याने विविध सजावट शैलींसह सुसंगत दिसते. मी माझ्या डिझाइन गाईडमध्येही तेच दाखवले आहे आणि ग्राहकांना खऱ्या अर्थाने त्याच्या डिझाइनचा अवलंब करण्यात मदत करत आहे. इंडिया सर्कसच्या काही खास निसर्ग-प्रेरित ॲक्सेसरीज – फ्रिज वेअर आणि कुशन ग्राहकांसाठी भेटवस्तू म्हणून तयार केल्या आहेत. ते अनुक्रमे रेफ्रिजरेटर्स आणि एअर कंडिशनर्सच्या व्होग मालिकेला पूरक आहेत. आम्हाला आशा आहे की यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरांमध्ये निसर्ग प्रेरित डिझाइनचा अधिक समग्र अनुभव मिळण्यास मदत होईल.”

गोदरेज इऑन वोग सीरिजचे रेफ्रिजरेटर्स ओक आणि वॉलनट लाकूड अशा दोन शेड्समध्ये २७२ ली. आणि २४४ ली. क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत आणि ते ग्राहकांना २७,००० ते ३२,००० रु.च्या श्रेणीमध्ये उपलब्ध असतील. रेफ्रिजरेटर्स नॅनो शील्ड निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान (पेटंट लागू), मोठ्या प्रमाणात भाजीपाला साठवणूक, आणि पेटंट कूल शॉवर तंत्रज्ञानाद्वारे ९५% हून अधिक पृष्ठभाग निर्जंतुकीकरणासह येतात. एअर कंडिशनर सायप्रस, टीक आणि महोगनी या तीन शेड्स मध्ये १.५ टन क्षमतेत आणि ३५,००० ते ३८,००० रु. रेंज मध्ये उपलब्ध आहेत. वीज बचतीसाठी 5-इन-1 परिवर्तनीय तंत्रज्ञान, अधिक आरामासाठी 4-वे स्विंग आणि अगदी ५२ अंश सेल्सिअस तापमानातही हेवी-ड्यूटी कूलिंगसह सुसज्ज आहे. हे एसी R32 वापरतात. त्यामध्ये कमी ग्लोबल वार्मिंग रेफ्रिजरंट आहे. ही मालिका लवकरच भारतातील अधिकृत स्टोअर्स आणि इंडिया सर्कस वेबसाइट व्यतिरिक्त लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.

अधिक तपशीलांसाठी https://www.godrej.com/appliances/eonvogue ला भेट द्या

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "डिझाइन नाविन्यपूर्णतेवर गोदरेज अप्लायन्सेसचा भर वुड-फिनिश, निसर्ग-प्रेरित एसी आणि रेफ्रिजरेटर्स सादर"

Leave a comment

Your email address will not be published.


*