न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या वतीने नवयुवतींसाठी मासिक पाळी आणि स्वच्छतेविषयक जनजागृती उपक्रमाचे मुंबईत आयोजन

Neuberg Diagnostics

मुंबई, 7 मार्च, 2022 (GPN): महिला दिनाचेऔचित्य साधून न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स याभारताच्या चौथ्या सर्वात मोठ्या रोगनिदानप्रयोगशाळा शृंखलेच्या वतीने पवई इंग्लिशहाय स्कूलमधील इयत्ता 7 वी ते 10 वीच्याविद्यार्थीनींत मासिक पाळीदरम्यानचेआरोग्य आणि स्वच्छता याविषयीजनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यातआले होतेयावेळी किशोरवयीनविद्यार्थीनींना जैविक विघटन होऊशकणारे सॅनिटरी पॅड मोफत वाटण्यातआलेया उपक्रमाकरिता एनजीओ थिंकबियॉन्ड सोबत न्यूबर्ग डायग्नोस्टीकनेभागीदारी केली असून वर्षभरकिशोरवयीन विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरीपॅड पुरवण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली.   

न्यूबर्ग आणि थिंक बियॉन्डमधीलडॉक्टरांच्या गटाने या नवयुवतींना मासिकपाळीशी निगडीत आरोग्य आणि स्वच्छताव्यवस्थापनाची माहिती देऊनत्यांच्यासोबत चर्चाही केलीमासिकपाळीतील अनारोग्य म्हणजे काय हेमुलींना पटवून देण्यात आलेजुनी फडकी,केळ्याच्या साली आणि गोणपाटाचे तुकडे वापरता सॅनिटरी पॅड कसे आरोग्यदायकअसतात याचे महत्त्वही त्यांना समजावूनसांगण्यात आलेत्याशिवाय,  मुलींचीमासिक पाळी कशी येतेफलन प्रक्रियाम्हणजे कायकालावधीप्रीमेन्यूस्ट्रलसिंड्रॉमओटीपोटातील येणाऱ्या कळांचेव्यवस्थापनमासिक चक्राची नोंदकरण्यासाठी कॅलेंडरचा वापरवापरूनझालेल्या नॅपकिनचे कचरा व्यवस्थापन,गर्भधारणादेखभालीच्या सूचनालोहाचीकमतरतारक्ताक्षयाची समस्या उद्भवू नयेयासाठी संतुलित आहार याविषयी माहितीदेण्यात आलीएखाद्या परिस्थितीतवैद्यकीय मदत कधी घ्यावी याबद्दलचेमार्गदर्शन करण्यात आले.  

न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या ग्रुप चीफऑपरेटींग ऑफिसर ऐश्वर्या वासुदेवनम्हणाल्या की, “नवयुवतींकडूनमिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानेआम्हाला प्रोत्साहन मिळालेघरी किंवामैत्रिणींसमवेत ज्या विषयावर बोलण्यासमुली लाजतातत्यावर खुलेपणाने चर्चाकरताना दिसल्याया मार्गदर्शनामुळे आतामुली स्वत:चा आहारघरी येणारी आव्हानेआणि वैद्यकीय मदत यासारखे विषयांवरलक्ष केंद्रित करतीलही आशा आम्हीबाळगतोआम्ही यापुढेही त्यांच्या संपर्कातराहून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाप्रयत्न करणार आहोत.”

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या वतीने नवयुवतींसाठी मासिक पाळी आणि स्वच्छतेविषयक जनजागृती उपक्रमाचे मुंबईत आयोजन"

Leave a comment

Your email address will not be published.


*