
Deependra Singh Kushwah, I.A.S, Dr. Harshdeep Kamble I.A.S., Shri Uday Samant, Dr. Satish Wagh & Shivani Wagh
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ (GPN): ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (एपीआय) निर्मिती मध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडने महाराष्ट्र सरकारच्या राज्य निर्यात आणि सामंजस्य करार ( MOU Signing ) पुरस्कारांमध्ये ८ -सुवर्ण पुरस्कार पटकावून एक उल्लेखनीय कामगिरी केली. हे पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे. हा सोहळा मा. उद्योग मंत्री, श्री उदय सामंत , महाराष्ट्र सरकार तसेच डॉ. हर्षदीप कांबळे I.A.S, प्रधान सचिव (INDS) महाराष्ट्र सरकार , डॉ. विपिन शर्मा IAS मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि श्री दीपेंद्रसिंग कुशवाह, I.A.S, विकास आयुक्त (उद्योग) आणि निर्यात आयुक्त यांच्या उपस्थितीत पार पडला. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी योगदान देणाऱ्या ,विविध उद्योग तज्ज्ञांच्या प्रयत्नांची पराकाष्टा करण्याच्या उद्दिष्टाने, त्यांनी सुप्रिया लाइफसायन्सला केमिकल आणि फार्मा या एमएसआय श्रेणी अंतर्गत एक्सपोर्ट हाऊसमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित केले.
८ सुवर्ण पुरस्कारांचे एकमेव मानकरी म्हणून, सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड ला त्यांच्या अनेक वर्षांच्या अपवादात्मक ‘निर्यात कामगिरीसाठी’ ओळखले जाते. यामध्ये २०१८-१९ या वर्षासाठी एमएसएमई आणि निर्यात गृह या दोन्ही सुवर्ण श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्य पुरस्काराचा समावेश आहे; एमएसएमई आणि निर्यात गृह या दोन्ही सुवर्ण श्रेणीसाठी निर्यातीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्ष २०१९-२० साठी राज्य पुरस्कार; निर्यातीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्ष २०२०-२१ करिता राज्य पुरस्कार आणि निर्यातीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्ष २०२१-२२ साठी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुप्रिया लाइफसायन्सच्या संचालिका शिवानी वाघ यांनी सन्मानीय मान्यतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या “सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडच्या एपीआय आणि फार्मा उद्योगातील योगदानाची कबुली देणाऱ्या,अशा दिग्गजांकडून पुरस्काराने गौरविण्यात आल्याने, आम्हाला आनंद होत आहे. ही प्रशंसा, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण परिवर्तनाच्या सामर्थ्यावर आमच्या विश्वासाची पुष्टी करते. जागतिक स्तरावरील विकासाच्या वाढीसाठी तसेच रसायने वितरित करण्याच्या ध्येयाने आम्ही नेहमीच वचनबद्ध राहू “.Ends
Be the first to comment on "सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडने महाराष्ट्र सरकारच्या राज्य निर्यात आणि सामंजस्य करार पुरस्कारांमध्ये ८ सुवर्ण पुरस्कार पटकाविले"