रेनॉ क्विड ठरली भारतातील सर्वात लोकप्रिय युज्‍ड कार

  • रेनॉ क्विडने स्टायलिश एसयूव्‍ही-इन्‍स्‍पायर्ड डिझाइन, अद्वितीय वैशिष्‍ट्ये व किफायतशीर मालकीहक्‍कासह भारतातील एण्‍ट्री सेगमेंटमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे
  • ९८ टक्‍के स्‍थानिकीकरण पातळ्यांद्वारे सक्षम रेनॉ क्विड प्रबळ ‘मेक इन इंडिया’ प्रमाणाला सादर करते
  • क्विड ४.४ लाखांहून अधिक समाधानी व आनंदी ग्राहकांसह भारतातील रेनॉसाठी अस्‍सल गेम-चेंजर ठरली आहे

मुंबई, मे २७, २०२३ (GPN): रेनॉ या भारतातील आघाडीच्‍या युरोपियन ब्रॅण्‍डला जाहीर करताना आनंद होत आहे की, स्पिनीने जारी केलेल्‍या अहवालानुसार त्‍यांचे प्रमुख उत्‍पादन क्विड भारतातील युज्‍ड-कार बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल ठरले आहे. स्पिनी या युज्‍ड-कार रिटेलिंग व्‍यासपीठाने त्‍यांचा २०२३ च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी तिमाही अहवाल जारी केला आहे, ज्‍यामधून भारतीय युज्‍ड-कार बाजारपेठेबाबत काही लक्षवेधक माहिती मिळते. अहवालानुसार रेनॉ क्विड देशातील युज्‍ड कार बाजारपेठांमधील सर्वात लोकप्रिय स्‍मॉल कार आहे.

स्पिनीच्‍या अहवालामधून निदर्शनास आले आहे की, रेनॉ क्विडला देशभरातील युज्‍ड कार खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात पसंती व मागणी मिळाली आहे. वेईकलची अपवादात्‍मक कार्यक्षमता, अद्वितीय मूल्‍य व विश्‍वसनीयतेला वेईकलला अव्‍वलस्‍थानी नेले आहे आणि युज्‍ड कार बाजारपेठांमधील एण्‍ट्री लेव्‍हल श्रेणीमध्‍ये तिने आपले प्रभुत्‍व स्‍थापित केले आहे.

२०१५ मध्‍ये लॉन्‍च करण्‍यात आलेली रेनॉ क्विड डिझाइन,  नवोन्‍मेष्‍कारी व आधुनिकतेसंदर्भात उल्‍लेखनीय उत्‍पादन आहे. क्विड ४.४ लाखांहून अधिक समाधानी व आनंदी ग्राहकांसह भारतातील रेनॉसाठी अस्‍सल गेम-चेंजर ठरली आहे. रेनॉ क्विडने दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये व मालकीहक्‍काचा किफायतशीर खर्च देणाऱ्या त्‍यांच्‍या समकालीन एसयूव्‍ही-इन्‍स्‍पायर्ड डिझाइन लँग्‍वेजद्वारे नेतृत्वित भारतातील एण्‍ट्री सेगमेंटला पुनर्परिभाषित केले आहे.

रेनॉ क्विड आपल्‍या एसयूव्‍ही-इन्‍स्‍पायर्ड वैशिष्‍ट्यांसह, तसेच १८४ मिमीचे दर्जात्‍मक ग्राऊंड क्‍लीअरन्‍स व ड्युअल टोन लुकसह प्रत्‍येक वेळी लक्ष वेधून घेते. इंटीरिअर्स उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा व भावी तंत्रज्ञानाला पुनर्परिभाषित करतात. दर्जात्‍मक ८ इंच टचस्क्रिन मीडियाएनएव्‍ही इवॉल्‍यूशन इन्‍फोटेन्‍मेंटला अँड्रॉईड ऑटो, अॅप्‍पल कारप्‍ले, व्हिडिओ प्‍लेबॅक, तसेच ड्रायव्‍हरला प्रत्‍येक गोष्‍टीवर जलदपणे व सुलभपणे नियंत्रण ठेवण्‍यास मदत करणारे स्टिअरिंग माऊंटेड ऑडिओ व फोन कंट्रोल्‍ससह नव्‍या उंचीवर घेऊन जाते. सिल्‍व्‍हर स्‍ट्रीक एलईडी डीआरएल लक्षवेधक प्रभाव निर्माण करतात आणि कारला प्रिमिअम लुक देतात.

रेनॉ क्विड भारतीय बाजारपेठेसाठी सर्व विद्यमान सुरक्षितता आवश्‍यकतांचे पालन करते आणि ह्युमन फर्स्‍ट प्रोग्रामसह प्रवासी व पादचा-यांचे संरक्षण करण्‍यासाठी त्‍यापलीकडे देखील जाते. वेईकलमध्‍ये दर्जात्‍मक सेफ्टी पॅकेज आहे,  ज्‍यामध्‍ये इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्‍शन कंट्रोल सिस्‍टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम, ड्युअल फ्रण्‍ट एअरबॅग्‍ज, एबीएससह ईबीडी, सीट बेल्‍ट रिमाइंडर, स्‍पीड अलर्ट, स्‍पीड सेन्सिंग डोअर लॉक आणि सीट बेल्‍ट लोड लिमिअरसह रेंजवर प्रमाणित म्‍हणून ड्रायव्‍हरच्‍या बाजूला प्रीटेन्‍शनर यांचा समावेश आहे.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "रेनॉ क्विड ठरली भारतातील सर्वात लोकप्रिय युज्‍ड कार"

Leave a comment

Your email address will not be published.


*