बँक ऑफ बडोदा’च्या वतीने बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराच्या 12 नामांकन दीर्घ यादीची घोषणा

L-R: श्री गोरख थोरात अनुवादक,श्री संजीव चढ्ढा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, बँक ऑफ बडोदा,आणि श्री मनोज बोरगावकर, मूळ लेखक, मराठी भाषेतील कादंबरी, ज्याचा एक भाग आहे. मुंबईत आज झालेल्या ‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कारांसाठी 12 नामांकने जाहीर करण्यात आली.

या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्यकृती तसेच त्यांच्या हिंदी अनुवादाचा गौरव होणार असून मूळ लेखक आणि अनुवादक असे दोघंही पुरस्काराचे मानकरी ठरतील

सुप्रसिद्ध लेखिका आणि बुकर पारितोषिक विजेत्या गीतांजली श्री 5 सदस्य मंडळाच्या अध्यक्षपदावर

नदीष्ट’, ही मराठी भाषेतील कादंबरी 12 नामांकनप्राप्त साहित्यकृतीत समाविष्ट

मुंबई, 24 मे, 2023 (जीपीएन / बबिता):बँक ऑफ बडोदा (बँक), ही  भारताची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असून आज बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार 2023 च्या पहिल्या नामांकन आवृत्तीकरिता 12 कादंबऱ्यांच्या दीर्घ यादीची घोषणा करण्यात आली. विविध भारतीय भाषांमधील (राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूची अंतर्गत समाविष्ट) साहित्यकृतींना मान्यता देणे तसेच प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनुवादांद्वारे हिंदी वाचकांना सर्वोत्तम भारतीय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी, त्याद्वारे रूची विस्तार आणि कादंबरी वाचकांच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या अद्वितीय पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार मूळ  साहित्यकृतीचे लेखक आणि पुस्तकाचे हिंदी अनुवादक अशा दोघांना प्रदान करण्यात येईल. मूळ साहित्यकृतीचे लेखक आणि पुरस्कार विजेत्या पुस्तकाच्या संबंधित हिंदी अनुवादकाला रु. 21.00 लाख आणि अनुक्रमे रु. 15.00 लाख; शिवाय, आणखी पाच निवडक पुस्तकांच्या लेखक आणि हिंदी अनुवादकांना रु. 3.00 लाख आणि प्रत्येकी अनुक्रमे रु. 2.00 लाखाच्या रोख पुरस्काराने गौरविण्यात येईल.

नामांकन यादीचे अनावरण करताना, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीसंजीव चढ्ढा म्हणाले, “भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे संस्कृती, धर्म आणि भाषांचा संगम असून विविधतेत त्याची ताकद आणि वेगळेपणा आहे. भारतीय भाषांमधील साहित्याचा प्रचार आमची बहु-सांस्कृतिकता मजबूत करण्यास मदत करतो हा आमचा असा विश्वास आहे. मूळ भारतीय भाषेतील साहित्य आणि या कलाकृतींचे हिंदीत अनुवादाला ओळख मिळावी आणि त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने आम्ही ‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ ची स्थापना केली. ‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कार देशाच्या विविध भागांतील प्रतिभावान भारतीय लेखकांना राष्ट्रीय व्यासपीठ देईल. भारतीय भाषा साहित्याला चालना देईल. तसेच साहित्यिक अनुवादांना प्रोत्साहन मिळेल.”

पाच सदस्यीय पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रख्यात लेखिका आणि बुकर पारितोषिक विजेत्या माननीय गीतांजली श्री आहेत. इतर चार सदस्यांत भारतीय कवी श्री. अरुण कमल; एक शिक्षण तज्ज्ञ आणि इतिहासकार श्री. पुष्पेश पंत; समकालीन भारतीय कवयित्री आणि कादंबरीकार श्रीमती अनामिका; आणि हिंदी कथा लेखक आणि अनुवादक श्री. प्रभात रंजन यांचा समावेश आहे.

बँकेच्या वतीने मार्च-एप्रिल 2023 या कालावधीत नामांकनं आमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विविध भारतीय भाषांमध्ये लिहिलेल्या अनेक प्रवेशिका प्राप्त झाल्या, ज्यातून ज्युरींनी 12 पुस्तकांची यादी तयार केली. पुस्तकांचे तपशील वर्णक्रमानुसार खाली दिले आहेत:

मूळ कादंबरीचे नाव मूळ भाषा मूळ लेखकाचे नाव कादंबरीचे भाषांतरीत नाव भाषांतकाराचे नाव
1. अभिप्रेत काल ओडिया परमिता सत्यपथी अभिप्रेत काळ अजोयकुमार पटनाईक
2. अल्ला मियां का कारखाना उर्दू मोहसीन खान अल्ला मियां का कारखाना सईद अहमद
3. बाकी सफा 5 ते पंजाबी रूप सिंग बाकी सफा 5 पर सुभाष नीरव
4. चीनी कोठी उर्दू सिद्दीक आलम चीनी कोठी अरजूमंद आला
5. एक खंजर पानी में उर्दू खलीद जावेद एक खंजर पानी में रिझवान ऊल हक
6. फत्संग नेपाळी चुडेन कविमो फत्संग : कहानी मिट्टी की नम्रता चतुर्वेदी
7. घर पलानो छेल्ले बंगाली मनोरंजन व्यापारी भागा हुआ लडका अमरिता बेरा
8. महानदी बंगाली अनिता अग्निहोत्री महानदी लिपिका सहा
9. नदीष्ट मराठी मनोज बोरगावकर नदीष्ट गोरख थोरात
10. नीमत खाना उर्दू खलिद जावेद नीमत खाना झमन तारीक
11. पोईमुगम तमीळ वासंथी मुखौटा एस भाग्यम शर्मा
12. थीरक्कअठ्ठा जन्नलकळ तमीळ वासंथी बंद खिड़कियां एस भाग्यम शर्मा

मुंबईत आज आयोजित दीर्घ-सूची घोषणा कार्यक्रमात, 12 नामांकन-प्राप्त साहित्यकृतीपैकी एक मराठी भाषेतील कादंबरी ‘नदीष्ट’चे मूळ लेखक मनोज बोरगावकर आणि अनुवादक श्री गोरख थोरात मुक्त-परिसंवादात सहभागी झाले होते. दोन्ही लेखकांनी भारतीय साहित्यविषयक परिघ आणि भारतातील साहित्यिक बांधवांसाठी राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराचे महत्त्व यावर संवाद साधला.

नदीष्ट‘ ही कादंबरी गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातून निर्माण झालेल्या वातावरणाचे वर्णन करते. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात या कादंबरीचा समावेश करण्यात आला असून पुण्यात नाट्यरूपातही या कादंबरीचे प्रस्तुतीकरण केले जाते. नदीष्ट’ची ही तीन वर्षांत आठवी आवृत्ती असून या कादंबरीचा कन्नड आणि हिंदी भाषेत अनुवाद करण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान‘ पुरस्कार विजेत्याची घोषणा 10 जून 2023 रोजी दिल्ली येथे करण्यात येईल.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदा’च्या वतीने बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराच्या 12 नामांकन दीर्घ यादीची घोषणा"

Leave a comment

Your email address will not be published.


*