या आठवड्यात ‘वागले की दुनिया’मध्‍ये सीनियर वागलेचे उत्‍साहपूर्ण राहण्‍यासाठीचे हट्टी प्रयत्‍न निश्चितच तुम्‍हाला हसवून-हसवून लोटपोट करतील

Aanjjan Srivastav as Srinivas Wagle on Sony SAB’s Wagle Ki Duniya

मुंबई, २५ मे २०२२ (GPN): सोनी सबवरील जीवनाचे सार दाखवणारी लोकप्रिय मालिका ‘वागले की दुनिया’ पुन्‍हा एकदा हास्‍यपूर्ण व विनोदी क्षणांनी भरलेला आणखी एक सप्‍ताह घेऊन आली आहे.

मालिकेने आपल्‍या विचारशील कथानकांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे सुरूच ठेवले आहे. यावेळी आपले लाडके सीनियर वागले श्रीनिवास कंटाळवाण्या जीवनाला अस्‍वस्‍थ होतात. आगामी एपिसोड्समध्‍ये श्रीनिवास (अंजन श्रीवास्‍तव) यांना वृद्धत्‍वामुळे स्‍वत:ला उत्‍साहपूर्ण ठेवण्‍यास सामना कराव्‍या लागणा-या विलक्षण स्थितींना पाहायला मिळणार आहे. राजेश (सुमित राघवन) आणि वंदना (परिवा प्रणती) हा वेडेपणा थांबवण्‍यासाठी त्‍यांच्‍या सूत्रांचा प्रयत्‍न करणार आहेत.

श्रीनिवास यांना त्‍यांच्‍या निवृत्तीनंतर काहीच करावे लागत नाही आणि प्रत्‍येक सरत्‍या दिवसासह ते अधिक अस्‍वस्‍थ होत आहेत. ते याबाबत सखी व अथर्वला सांगण्‍याचा प्रयत्‍न करतात, पण ते देखील व्‍यस्‍त असतात. आणि आता ते त्‍या स्थितीमधून बाहेर पडण्‍याचा मार्ग शोधत आहेत.

उत्तमरित्‍या स्‍थायिक असताना देखील रिक्षा चालवणा-या जुन्‍या मित्राला भेटल्‍यानंतर त्‍यांना त्‍यांचा वेळ घालवण्‍यासाठी व जीवनातील नीरसपणाला दूर करण्‍यासाठी त्‍याच्‍यासारखेच काहीतरी करण्‍याचा विचार करतात. म्‍हणून ते एका मिशनवर जातात, पण लवकरच समजते की हा विचार उत्तम नाही, कारण कडक ऊनामध्‍ये कोणीही काम करू शकत नाही आणि त्‍यांना त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या निराशेचा देखील सामना करावा लागतो.

श्रीनिवास कुटुंबाला त्‍यांची व्‍यस्‍त असण्‍याची गरज समजण्‍यापर्यंत अधिक धक्‍कादायक काहीतरी करतील का? कुटुंब श्रीनिवास यांना हट्टीपणा सोडून सोपा मार्ग अवलंबण्‍यास कशाप्रकारे समजावतील? या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्‍यासाठी मालिका पहा.

वंदना वागलेची भूमिका साकारणा-या परिवा प्रणती म्‍हणाल्‍या, ”विनोदी स्‍वरूपात कुटुंबातील ज्‍येष्‍ठांना सामना कराव्‍या लागणा-या एकाकीपणाच्‍या अशा गंभीर समस्‍येला सादर करताना खूप धमाल आली. आपण अनेकदा विसरून जातो की आपल्‍या मोठ्यांनी त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये भरपूर कामे केलेली आहेत आणि निवृत्त झाल्‍यानंतर देखील त्‍यांना व्‍यस्‍त राहावेसे वाटते. आम्‍हाला प्रेक्षकांना त्‍यांचे आई-वडिल किंवा आजी-आजोबांच्‍या मानसिक गरजांची काळजी घेण्‍याचे महत्त्व दाखवून द्यायचे आहे. मला वाटते की, आम्‍ही प्रेक्षकांशी संलग्‍न होण्‍यामध्‍ये उत्तम कामगिरी बजावली आहे आणि मी श्रीनिवास स्‍वत:ला व्‍यस्‍त ठेवण्‍यासाठी करणा-या विलक्षण कृतींप्रती त्‍यांच्‍या प्रतिक्रिया पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे.”

श्रीनिवास वागलेची भूमिका साकारणारे अंजन श्रीवास्‍तव म्‍हणाले, ”हा एपिसोड माझ्या मनाच्‍या खूप जवळ आहे. तुम्‍हाला श्रीनिवासने अशीच प्रतिक्रिया दिली पाहिजे असे वाटेल. मी श्रीनिवासच्‍या मतांशी सहमत आहे. मी माझ्या अनेक मित्रांकडून काहीच न करण्‍याबाबत तक्रारी ऐकल्‍या आहेत. आणि स्‍वत:च्‍या अनुभवावरून मी सांगू शकतो की, इतरांना व्‍यस्‍त असल्‍याचे पाहून अजून तणाव वाढतो. हे कथानक श्रीनिवास सारख्‍या भावनांचा सामना करणा-या प्रेक्षकांसाठी आहे. मी लवकरच ७५ वर्षांचा होणार आहे आणि यामुळेच हा एपिसोड माझ्यासाठी अधिक संबंधित आहे. मी आशा करतो की, निष्क्रिय राहणीमान मन:शांतीसाठी हानीकारक आहे हे प्रेक्षकांना समजेल आणि ते त्‍यांच्‍या ज्‍येष्‍ठ नातेवाईकांना आंनदी ठेवतील.”

पाहत राहा वागले की दुनिया दर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्‍त सोनी सबवर

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "या आठवड्यात ‘वागले की दुनिया’मध्‍ये सीनियर वागलेचे उत्‍साहपूर्ण राहण्‍यासाठीचे हट्टी प्रयत्‍न निश्चितच तुम्‍हाला हसवून-हसवून लोटपोट करतील"

Leave a comment

Your email address will not be published.


*