भारतीय क्रीडा उद्योगाला भर घालण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनाचे’ भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सद्वारे नवी दिल्ली येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रीडा सम्मेलन आयोजन

भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सद्वारे नवी दिल्ली येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रीडा सम्मेलन

मुंबई, शुक्रवार, 8 एप्रिल, 2022 (GPN): भारतातील इन्फॉर्मा मार्केट्स (पूर्वी युबीएम इंडिया म्हणून ओळखले जाणारे) भारतातील आघाडीचे व्यवसायिक तसेच व्यवसायिकांसाठी आयोजित अशा क्रीडा, आरोग्य आणि खेळ उद्योगातील प्रत्येक विभागासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय व्यासपीठासह क्रीडा आणि फिटनेस क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी सज्ज आहे. यासाठीची, पहिली आवृत्ती पुढील वर्षी 7 ते 9 जून 2023 दरम्यान प्रगती मैदान नवी दिल्ली येथे प्रदर्शन भरवले जाईल.

वानखेडे स्टेडियमच्या ऐतिहासिक परिसरात झालेल्या पॉवर पॅक्ड लॉन्च कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे सध्याचे आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रमुख, क्रीडा व्यावसायिक प्रमुख तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत याची आज घोषणा करण्यात आली

कार्यवाहीचा एक भाग म्हणून अत्यंत प्रभावशाली आणि जाणकार समितीमध्ये एआयएफएफचे सरचिटणीस श्री कुशल दास, माजी भारतीय नेमबाज आणि 10 एअर रायफल स्पर्धा विश्व विक्रम धारक सुमा शिरूर, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि फिट इंडिया आयकॉन श्री संग्राम सिंग यांचा समावेश आहे. अकोसा स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थापक आणि संचालक श्री दीपक खानोलकर, सह-संस्थापक चॅम्पलिडर श्री सत्यजित सदानंदन तसेच श्री योगेश मुद्रा व्यवस्थापकीय संचालक इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडिया यांनीखेळातील बदलत्या मानसिकताया विषयावर चर्चा केली. भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सने येत्या काही वर्षांमध्येखेळातील बदलणारी मानसिकता आणि नवीन संधी शोधणेया विषयावर चर्चा केली, ज्यामध्ये देशातील वाढत्या क्रीडा उद्योगातील संधींबाबत चर्चा केली

समर्थन देण्यासाठी आणि या रोमांचक उपक्रमाचा एक भाग होण्यासाठी श्री धनराज पिल्ले, श्री अमोल मुझुमदार, श्री बलविंदर संधू, श्री हेन्री मिनेझिस, श्री दिनेश लाड, श्री अमित देसाई आणि श्री रविकांत काळे यांसारख्या दिग्गज क्रीडा व्यक्तिमत्त्वांची देखील उपस्थित होती.

वाढती लोकसंख्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावशाली व्यक्ती आणि क्रीडा क्षेत्रातील व्यापक पोहोच, त्यामागची बदलती मानसिकता, स्पोर्ट्स आणि खेळांतील नवे आकर्षण यामुळे क्रीडा आणि तंदुरुस्ती उद्योग अजूनही भारतात अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असतानाही वेगाने विकसित होत आहे. 2022-27 मध्ये 8.5 टक्के सिएजीआर प्रदर्शित करून 2027 पर्यंत बाजार 3,065 दशलक्षपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.भारतातील क्रीडा बाजार देखील 18-20 टक्के प्रभावी दराने वाढत आहे. याशिवाय, भारतातील स्पोर्ट्ससाठी प्रेक्षकांची संख्या 2025 पर्यंत 130 दशलक्षपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे आणि जागतिक खेळातील कंपन्या आता भारताच्या एस्पोर्ट्स इकोसिस्टममध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत. भारताने कोविड महामारीशी आक्रमकपणे लढा दिल्याने सामान्य स्थितीत परत येण्यासाठी देशात जागतिक क्रीडा बाजाराचे स्वागत करण्याची हीच योग्य वेळ आहे. एक यशस्वी दूरदृष्टी मार्ग प्रदान करणे हेच याआंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनाचेउद्दीष्ट आहे

या उद्घाटनप्रसंगी बोलताना भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री योगेश मुद्रा म्हणाले, “आम्हाला 7ते 9 जून 2023 दरम्यान प्रगती मैदान नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स एक्सपोच्या पदार्पणाची घोषणा करताना आनंद होत आहे. या उपक्रमामुळे भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सने या रोमांचक आणि संभाव्य समृद्ध उद्योगातील एक यशस्वी अंतर भरून काढले आहे, जे 2023 पर्यंत भारतामध्ये  5.6 अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारचा  360-डिग्री समर्पित प्लॅटफॉर्म असेल. क्रीडा, आरोग्य आणि खेळ उद्योगातील प्रत्येक विभागातील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत भागधारक समाविष्ट होतील

सकारात्मक आदर्श निर्माण करताना देशाला एकत्र आणण्यात खेळाची भूमिका महत्त्वाची आहे. देशाचे आरोग्य केवळ तेथील लोकांच्या तंदुरुस्तीमुळेच बळकट होऊ शकते आणि हा एक्स्पो सरकारच्या ‘फिट इंडिया आणि ‘मेक इन इंडिया उपक्रमांशी सुसंगत आहे आणि या क्षेत्राच्या विकासासाठी विदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनाचे पुढील उद्दिष्ट आहे हे आहे की, हा उद्योग भागधारकांचा एक मजबूत समुदाय तयार करणे आणि या क्षेत्राला औपचारिक बनविण्यात मदत करणारण्यासाठी व्यावसायिक युतीची पूर्तता करेल. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनात या क्षेत्रातील नवोन्मेष, शिस्त, आवेश आणि मिशनला यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही,” ते पुढे म्हणाले

हे प्रदर्शन एक मजबूत आणि एकात्मिक समुदाय तयार करण्याचा प्रयत्न करतो ज्यात निर्णय घेणारे अधिकारी, क्लब आणि संघटना, स्थानिक खरेदीदार, गुंतवणूकदार, नियोजन संस्था, वास्तुविशारद, स्टेडियम आणि ठिकाण ऑपरेटर आणि संपूर्ण भारतातील आणि प्रमुख देशांमधील उत्पादक यांचा समावेश असेल.

आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये :

  • आंतरराष्ट्रीय पॅव्हेलियनआशिया आणि युरोप
  • कुस्ती, गोल्फ, मुष्टियुद्ध, बास्केटबॉल, झुंबा, फुटबॉल, योग, इतर
  • क्रीडापटू आणि प्रदर्शकांसाठी क्रीडा पुरस्कार
  • क्रीडा पोषण आणि सौंदर्य प्रसाधने क्षेत्र
  • क्रीडा यंत्रसामग्री आणि उपकरणे क्षेत्र

हे आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शन भरविण्याचे उद्दिष्ट जागतिक क्रीडा व्यवसाय आणि भारतीय क्रीडा व्यवसाय यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी आहे. आमच्या क्रीडा व्यवसायांचे उत्थान आणि उद्योगांना अधिक संधी शोधण्यात मदत करण्याच्या मुख्य दृष्टीकोन समोर ठेऊन आयोजित करण्यात येणार आहे

इन्फॉर्मा मार्केट्सबद्दलची माहिती: 

इन्फॉर्मा मार्केट्स उद्योग आणि विशेषज्ञ बाजारपेठेसाठी व्यापार, नाविन्यपूर्ण आणि वाढीसाठी माध्यम तयार करते. आमच्या अनुसूचीमध्ये हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट, फॅशन आणि परिधान, हॉस्पिटॅलिटी, फूड अँड बेव्हरेज, आरोग्य आणि पोषण यासह मार्केटमधील 550 हून अधिक आंतरराष्ट्रीय उद्योजकांचा या  कार्यक्रमात समावेश आहे.

आम्ही जगभरातील ग्राहकांना आणि भागीदारांना प्रदर्शने, विशेषज्ञ डिजिटल सामग्री आणि कृती करण्यायोग्य डेटा सोल्यूशन्सद्वारे गुंतण्यासाठी, अनुभव घेण्याच्या आणि व्यवसाय करण्याच्या संधी प्रदान करतो. जगातील आघाडीचे प्रदर्शन आयोजक म्हणून आम्ही विविध प्रकारच्या विशेषज्ञ बाजारपेठांना यासाठी तयार करतो, संधी देतो आणि त्यांना वर्षातील 365 दिवस पुढे जाण्यास मदत करतो. अधिक माहितीसाठी, कृपया www.informamarkets.com ला भेट द्या.

इन्फॉर्मा मार्केट्स  आणि भारतातील आमच्या व्यवसायाबद्दल:

इन्फॉर्मा मार्केट्सची मालकी इन्फॉर्मा पीएलसी, एक आघाडीची व्यावसायिक माहिती सेवा गट आणि जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संमेलन आयोजक आहे. इन्फॉर्मा मार्केट्स  इन इंडिया (पूर्वीचे युबीएम इंडिया) हे भारतातील आघाडीचे प्रदर्शन आयोजक आहे जे देशांतर्गत आणि जगभरातील तज्ञ बाजारपेठा आणि ग्राहक समुदायांना, प्रदर्शन, डिजिटल सामग्री आणि सेवा आणि परिषदा आणि सेमिनार यांच्याद्वारे व्यापार, नवनवीन शोध आणि विकासासाठी मदत करण्यासाठी समर्पित आहे. दरवर्षी आम्ही देशभरात 25 हून अधिक मोठ्या प्रमाणावर प्रदर्शने, 40 परिषदा आणि उद्योग पुरस्कार आणि प्रशिक्षण आयोजित करतो, ज्यामुळे अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये व्यापार सक्षम होतो. भारतात इन्फॉर्मा मार्केट्सचे मुंबई आणि नवी दिल्ली येथे कार्यालये आहेत. अधिक तपशीलांसाठी, कृपया भेट द्याhttps://www.informamarkets.com/en/regions/asia/India.html

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "भारतीय क्रीडा उद्योगाला भर घालण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनाचे’ भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सद्वारे नवी दिल्ली येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रीडा सम्मेलन आयोजन"

Leave a comment

Your email address will not be published.


*