इलेक्ट्रिक वाहननिर्मिती आणि तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीजकडून ‘एका’ या कंपनीची स्थापना

EKA Logo
  • व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातइलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा उपयोगकरून ‘एका’ कंपनी नवीन युगसुरू करेल.
  • लास्ट माइल डिलिव्हरीसाठीएका’ मार्फत लवकरच इलेक्ट्रिकबसेस बाजारात आणणार

मुंबई, 24 फेब्रुवारी 2022 (GPN): शहरातीलवाहतुक आणि व्यावसायिक उपयोगासाठीइलेक्ट्रिक वाहनाद्वारे वाहतुकीचा पर्यायअधिक विश्वासार्ह आणि फायदेशीर आहे.जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांच्यावापरास गती देणे आणि शाश्वत, फायदेशीर वकार्यक्षम इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनेबाजारात आणणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून‘एका’ या ऑटोमोटिव्ह आणि तंत्रज्ञानकंपनीची स्थापना केली आहे. एका हीभारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह सीटिंग, इंटिरिअर्स आणि स्पेशालिटी व्हेइकल कंपनीपिनॅकल इंडस्ट्रीजची उपकंपनी असून, भारतसरकारच्या ऑटो पीएलआय योजनेच्यामान्यताप्राप्त उत्पादकांपैकी एक आहे.

एका द्वारे तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान अधिकसुलभ करण्याकडे  भर देतानाच व्यावसायिकइलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन आणिडिझाईनच्या तत्वज्ञानात मूलभूत बदल केलाजाणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्याउत्पादनाचे लोकशाहीकरण तर होईलचत्याचसोबत एकूण खर्चात कपात होऊनउत्पादने अधिक शाश्वत होण्यास हातभारलागेल. एका कंपनी  मार्फत  इलेक्ट्रिक वाहने,फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यायीइंधनावर चालणाऱ्या वाहनांचे डिझाइन,उत्पादन आणि पुरवठा केला जाईल.तसेचभविष्यात एका मार्फत उत्पादन,  असेंबली,ईव्ही ट्रॅक्शन सिस्टम, ईव्ही एनर्जी स्टोरेजसिस्टम, इत्यादि गोष्टीदेखील केल्या जातील.

यावेळी बोलताना पिनॅकल इंडस्ट्रीज आणिएका चे अध्यक्ष श्री. सुधीर मेहता म्हणाले की,”एका म्हणजे ‘एकत्र येणे’ आणि एकरूपहोणे’. पर्यावरण हा केंद्रबिंदू ठेवून एका हीकंपनी विवेकी संशोधन आणि विश्वसनीयवाहतुकव्यवस्था या मूल्यांवर व्यवसायामध्येबदल घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातभारताचं नेतृत्व प्रस्थापित करणे हे एका चेउद्दिष्ट आहे. देशातील विविध भागांमध्येतंत्रज्ञान, उत्पादन आणि वितरणाची एक नवीनव्यवस्था तयार करून, निर्मिती खर्च कमीकरणे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या  वापरालाप्रोत्साहन देणे यासाठी एका काम करेल.”

व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहने उद्योग आणिपर्यावरणपूरक असावीत यासाठी आम्हीकमीत-कमी खर्चात शाश्वत  उत्पादनाचीनिर्मिती करणार आहोत. “भारताची एका याआमच्या नवीन उपक्रमाच्या माध्यमातूनदेशाला ईव्ही उत्पादने आणि तंत्रज्ञानातीलजागतिक नेतृत्वापैकी एक बनवणार आहोत”असे ही ते पुढे म्हणाले.

इव्ही तंत्रज्ञान तयार करणे आणि मोठ्याप्रमाणावर सर्वदूर पोहोचवणे या उद्देशाने एकालवकरच इलेक्ट्रीक बसेस आणि हलक्याव्यावसायीक वाहनांचा पहिला संच पुढच्याकाही महिन्यांतच बाजारात आणणार आहे.भविष्यात कंपनीमार्फत ‘लिन फॅक्ट्री’ पद्धतआणण्याचा मानस आहे. ज्यामुळे विद्यमानपायाभूत सुविधांचा वापर करून इलेक्ट्रिकवाहनांच्या क्षेत्रात क्रांती होईल. एका चेउत्पादन मूल्यनिर्मितीसह. Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "इलेक्ट्रिक वाहननिर्मिती आणि तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीजकडून ‘एका’ या कंपनीची स्थापना"

Leave a comment

Your email address will not be published.


*