नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्स्पिरिअन इंडिया यांची केंद्रीय अर्थसंकल्प 2022 नंतरची प्रतिक्रिया

Experian India Logo

Neeraj Dhawan, Managing Director, Experian India

नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्सपेरियन इंडिया.

मुंबई, 2 फेब्रुवारी 2022 (GPN):- केंद्रीय अर्थसंकल्पात तीन वृद्धी घटकांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. मॅक्रोइकोनॉमिक व मायक्रोइकोनॉमिक वृद्धीवर भर देत सर्वसमावेशक दृष्टिकोन, डिजिटल अर्थव्यवस्था व फिनटेकला चालना आणि सार्वजनिक व खासगी भांडवलादरम्यान गुंतवणूकचक्र तयार करणे हे ते तीन घटक आहेत. पंतप्रधानांच्या ‘अमृत काल’ या पुढील 25 वर्षांच्या कालावधीचा संदर्भ घेत अर्थमंत्र्यांनी आर्थिक आराखडा मांडला.

5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची घोषणा करत, भारतातील ग्रामीण भागात 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करणे, 150,000 पोस्ट ऑफिसेसना बँकिंग यंत्रणेशी जोडणे आणि रिझर्व्ह बँकेतर्फे सादर करण्यात येणारा नवा डिजिटल रुपया यांची घोषणा करून डिजिटल व आर्थिक सर्व समावेशकतेवर भर देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा याही वर्षी पुनरुच्चार करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणा स्वागतार्ह आहेत. हे उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहेत. याचा ग्राहकांना आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना लाभ होणार आहे. कारण हे सर्व घटक त्यांच्या डिजिटल व आर्थिक अॅक्टिव्हिटी वाढवत आहेत. यामुळे त्यांची भक्कम क्रेडिट पार्श्वभूमी तयार होणार आहे आणि त्यांना त्वरेने व सुलभतेने कर्ज मिळण्यास मदत होईल.

उद्यम, ई-श्रम, नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस) आणि आत्मनिर्भर स्किल्ड एम्प्लॉयी एम्प्लॉयर मॅपिंग (असीम) पोर्टलची कर्ज मिळवण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. 2020मध्ये जाहीर करण्यात आलेल्या इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ईसीएलजीएस) योजनेची तारीख पुढे नेण्यात आली आहे आणि हमी संरक्षणामध्ये वाढ करण्यात आल्याची आणि सीजीटीएमएसई म्हणजेच क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस योजनेची पुनर्रचना करण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या योजनेसाठी अधिक निधी पुरविण्यात येईल आणि त्यामुळे एमएसएमईंना मोठ्या प्रमाणावर मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केल्यानुसार, येत्या वर्षात 9.2% या जीडीपी दराने भारताची भक्कम वाढ अपेक्षित आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, एमएसएमईं व उद्योगांना सहाय्य, डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ करून घेण्यासाठी दिलेली चालना आणि सर्वसमावेशक वृद्धी धोरण तयार करून अर्थमंत्र्यांनी असा अर्थसंकल्प सादर केला आहे, ज्याने अर्थव्यवस्थेत सकारात्मकता निर्माण होईल. महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेसाठी असा अर्थसंकल्प सादर होणे ही काळाची गरज होती. या अर्थसंकल्पात निश्चितच वृद्धीवर भर देण्यात आला होता आणि त्याने अर्थव्यवस्थेला आवश्यक असलेली साधने उपलब्ध करून दिली. वृद्धी आणि रोजगारामध्ये वाढ झाल्याने कर्ज क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या कंपन्या वैयक्तिक अर्थसहाय्य व व्यावसायिक वाढीला चालना देणाऱ्या कर्जांची मागणी वाढेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

====================

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्स्पिरिअन इंडिया यांची केंद्रीय अर्थसंकल्प 2022 नंतरची प्रतिक्रिया"

Leave a comment

Your email address will not be published.


*