- कॅस्ट्रॉल अॅक्टिव्हचे #प्रोटेक्टइंडियाजइंजिन अंतर्गत आलेल्या प्रत्येक प्रतिज्ञेसाठी १० रूपयांचे योगदान देऊन मेकॅनिक्सचे कौशल्य वाढवण्यासाठी ५० लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट
- अभिनेता आयुष्मान खुराना यांच्याद्वारे मेकॅनिक समुदायाला आधार देण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम
- तरूण ७५७४-००३-००२ येथे मिस्ड कॉल देऊन किंवा www.protectindiasengine.com येथे भेट देऊन पाठिंबा देऊ शकतात
मुंबई, ११ सप्टेंबर २०२०: भारत हा देश जगातील सर्वांत मोठ्या दुचाकी बाजारपेठांपैकी एक असून तो आपल्या बाइकच्या डॉक्टर्स असलेल्या मेकॅनिक समुदायाकडून चालवला जात आहे. कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह हा भारताचा दुचाकीसाठीचा आघाडीचा इंजिन ऑइल ब्रँड आहे आणि त्याचे या समुदायासोबत उत्तम संबंध आहेत. त्यांनी आज #प्रोटेक्टइंडियाजइंजिन या मोहिमेला सुरूवात केली. ही एक राष्ट्रीय मोहीम असून त्यातून भारताच्या बायकर्सना आणि विशेषतः तरूणांना कोविडच्या जागतिक साथीच्या या अभूतपूर्व कालावधीत मेकॅनिक कौशल्य सुधारणा कार्यक्रमासाठी प्रतिज्ञा करण्यासाठी प्रेरित केले जात आहे.
नेटवर्क१८ आणि माइंडशेअरच्या भागीदारीत संकल्पना आणून विकसित केलेल्या या उपक्रमाला बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने पाठिंबा दिला आहे आणि त्याचे उद्दिष्ट देश लॉकडाऊननंतर देश हळूहळू काम करण्यास सुरूवात करत असताना नवीन सामान्य स्थितीसाठी मेकॅनिक्सना शिक्षित करण्याचे आणि तयार करण्याचे आहे.
कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह मेकॅनिक्सच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी मिळालेल्या प्रत्येक प्रतिज्ञेमागे १० रूपयांचे योगदान देऊन ५० लाख रूपायंपर्यंतची गुंतवणूक करणार आहे. या शैक्षणिक उपक्रमांचे उद्दिष्ट ते आपले काम सुरू करत असताना त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक सर्व्हिसिंग तंत्रे शिकणे तसेच आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता समजून घेण्यासाठी मदत करण्याचे आहे. तरूण ७५७४-००३-००२ येथे मिस्ड कॉल देऊन किंवा www.protectindiasengine.com येथे भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर करू शकतात. ही मोहीम नेटवर्क१८च्या सर्व वाहिन्यांवर आणि डिजिटल व्यासपीठावंर १० सप्टेंबर २०२० ते या महिन्याच्या अंतापर्यंत चालवली जाईल.

Ayushmann Khurrana urge youth to #ProtectIndiasEngine
या उपक्रमाबाबत बोलताना कॅस्ट्रॉल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सांगवान म्हणाले की, ”मेकॅनिक्सनी लॉकडाऊनच्या काळात देशाला मार्गावर ठेवण्यासाठी मदत केली आहे. अनेक स्वयंसेवी मेकॅनिक्सनी आपल्या व्यवसायाला मोठा फटका बसल्यानंतरही वाहने कोणतेही पैसे न आकारता दुरूस्त करून कोविड योद्धा म्हणून काम केले आहे. त्यांच्या कार्याला सलाम करताना आणि मेकॅनिक समुदायाप्रति आमची वचनबद्धता वाढवत असताना कॅस्ट्रॉलमध्ये आम्ही #प्रोटेक्टइंडियाजइंजिनद्वारे कॅस्ट्रॉल अॅक्टिव्हमध्ये त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याबाबत आणि नवीन सामान्य स्थितीसाठी त्यांना सज्ज करण्यासाठी उत्सुक आहोत.”
कॅस्ट्रॉल अॅक्टिव्हच्या #प्रोटेक्टइंडियाजइंजिनच्या मोहिमेच्या उद्घाटनाच्या फिल्ममध्ये बोलताना आयुष्मान खुराना म्हणाले की, ”मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मेकॅनिक समुदायाशी अगदी संलग्न राहिलो आहे. बायकिंग हा माझ्यासाठी फक्त छंद नाही तर रोडीजसोबत माझे करियर सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मी त्यांचा खूप आदर करतो, ते दिसण्यात न येणारे योद्धे आहेत आणि भारताला कार्यान्वित ठेवणारे इंजिन्स आहेत. त्यांच्या योगदानाकडे कदाचित दुर्लक्ष होत असेल परंतु माझ्यासारख्या तरूण रायडर्सचा हा समाज गतीशील राहून आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सज्ज असतो. माझ्या लहानपणापासून ओळखत असलेल्या काही लोकांसोबत मी दीर्घकालीन संबंधही जोडले आहेत. दुर्दैवाने, सध्याची अभूतपूर्व परिस्थिती पाहता आमचे प्रिय मेकॅनिक्स आज अत्यंत कठीण काळातून जात आहेत. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे. मी संपूर्ण भारताला आवाहन करतो की, त्यांनी आपल्या मेकॅनिक्सच्या चांगल्या भवितव्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी आणि ‘#प्रोटेक्टइंडियाजइंजिन’साठी मदत करावी.” ENDS
कॅस्ट्रॉल इंडियाची मेकॅनिक्सप्रति सातत्यपूर्ण वचनबद्धता
- कॅस्ट्रॉल एकलव्य सीएसआर उपक्रम (विद्यमान) – सर्वांगीण मेकॅनिक कौशल्य विकास अभ्यासक्रमाने आजपर्यंत जवळपास दोन लाख मेकॅनिक्सना फायदा झाला आहे. त्यात प्रत्यक्ष प्रशिक्षण, जीवन कौशल्ये, व्यवसाय कौशल्ये आणि आर्थिक साक्षरता यांचा समावेश आहे.
- कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक ऑनलाइन अॅकेडमी (२०२०) – यातून मेकॅनिक्सना शैक्षणिक व्हिडिओ आणि तज्ञांकडून लाइव्ह वेबिनार सत्रांद्वारे स्वतःची कौशल्ये विकसित करण्यासाठी संधी दिली जाते.
- कॅस्ट्रॉल फास्ट स्कॅन (२०१९) – मेकॅनिक्ससाठीच्या एका खास डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे १.५ लाख कार्यरत वापरकर्त्यांसाठी डिजिटल सवलत व्यासपीठ मिळाले आहे. या व्यासपीठामुळे त्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात रिवॉर्डस् मिळतात.
- कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक उपक्रम (२०१७) – यामुळे मेकॅनिक्सची कौशल्ये वाढवण्यात आणि सार्वजनिक व्यासपीठावर त्यांचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मदत होते. ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलसोबत भागीदारीत कॅस्ट्रॉल २०१९ मध्ये सुपर मेकॅनिक उपक्रमादरम्यान २० शहरांमधील सुमारे २ लाख मेकॅनिक्सपर्यंत पोहोचले आहे.
कोविडच्या जागतिक साथीदरम्यान कॅस्ट्रॉल इंडियाचे मेकॅनिक्सना पाठबळ
एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून कॅस्ट्रॉल इंडियाने विविध रूग्णालये, ट्रकचालक, पोलिस अधिकारी, कचरा गोळा करणारे, स्थलांतरित मजूर आणि रोजंदारीवरील मजूर यांना देशातील प्रतिसादाचा भाग म्हणून मदत केली असून यासाठी आमच्या सीएसआर बजेटमधून ११.५ कोटी रूपये वितरित केले आहेत.
मेकॅनिक्ससाठी आम्ही खालील गोष्टी केल्या आहेत-
- त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला कमी झालेल्या कामामुळे भारतभरातील आऊटरिचद्वारे मदत केली असून ६२,००० मेकॅनिक्सना छोटी आर्थिक मदत दिली आहे.
- अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे सर्व्हिसिंग करण्यासाठी निवडक माध्यमातून देशभरात मोफत वंगण देण्यात आले.
स्वतंत्र वर्कशॉप्स लॉकडाऊननंतर आपला व्यवसाय पुन्हा सुरू करत असताना मोफत सॅनिटायझेशन उपक्रम आणि किट्स
Be the first to comment on "कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह आणि आयुष्मान खुराना यांच्याकडून भारताच्या मेकॅनिक्समध्ये बदलाचे वाहक होण्यासाठी आणि ‘#प्रोटेक्टइंडियाजइंजिन’साठी तरूणांना आवाहन"