माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्‍हणाले, प्रशिक्षकांची भूमिका स्किलिंग, रिस्किलिंग व अपस्किलिंगमध्‍ये आवश्‍यक व निर्णायक आहे

+      माननीय पंतप्रधान श्री. नरेंद मोदी यांनी लिखित भाषणामध्‍ये कौशलाचार्य समादर २०२० (कौशलाचार्य पुरस्‍कार)च्‍या दुस-या पर्वादरम्‍यान कौशल्‍य इकोप्रणाली निर्माण करण्‍यामधील लक्षणीय योगदानांसाठी देशातील प्रशिक्षकांचे कौतुक केले

+      ९२ कौशल्‍य प्रशिक्षकांना पाच विभागांतर्गत पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले – दीर्घकालीन प्रशिक्षणअल्‍पकालीन प्रशिक्षण, जन शिक्षण संस्‍थानप्रशिक्षु व उद्योजकता प्रशिक्षण

+      महाराष्‍ट्रातील सात विजेत्‍यांना कौशलाचार्य पुरस्‍कार २०२० सह सन्‍मानित करण्‍यात आले

नवी दिल्‍ली, सप्‍टेंबर २०२०: कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई)ने आज कौशलाचार्य समादर २०२० (पुरस्‍कार)च्‍या दुस-या पर्वासाठी डिजिटल संमेलनाचे आयोजन केले. विविध विभागांमधील प्रशिक्षकांना देशाची कौशल्‍य इकोप्रणाली सुदृढ करण्‍यामध्‍ये आणि भावी सक्षम कर्मचारीवर्ग निर्माण करण्‍यामध्‍ये दिलेल्‍या त्‍यांच्‍या अपवादात्‍मक योगदानासाठी पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले. याप्रसंगी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्‍या लिखित भाषणातील संदेशामधून देशातील प्रशिक्षकांचे आजच्‍या तरूणांना त्‍यांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी आवश्‍यक कौशल्‍य प्रशिक्षण देण्‍यासोबत त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षा प्रज्‍वलित ठेवण्‍याकरिता घेतलेल्‍या सातत्‍यपूर्ण अथक मेहनत व तपश्‍चर्येचे कौतुक करण्यात आले.

महाराष्‍ट्र राज्‍यामधून सात विजेत्‍यांना दीर्घकालीन प्रशिक्षणअल्‍पकालीन प्रशिक्षण व जन शिक्षण संस्‍थान या विभागांतर्गत त्‍यांच्‍या अपवादात्‍मक योगदानासाठी पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले. हे सात विजेते आहेत नॅशनल इंजीनिअरिंगमधील श्री. गंगाराम बाबुराव कोलपटे, अॅपरल ट्रेनिंगमधील श्रीमती अर्चना सोळे, हँडक्राफ्ट ट्रेनिंमधील श्रीमती रेखा संदीप घरत, टेक्निशियन ट्रेनिंगमधील श्री. कैलास कडुबा सोनावणे, नॉन-इंजीनिअरिंगमधील गव्‍वल रेणुका प्रकाश, बँकिंग फायनान्शियल सर्विसेस अॅण्‍ड इन्‍शुरन्‍स ट्रेनिंगमधील डॉ. अभिनव दत्तात्रय जोग आणि प्‍लम्बिंग ट्रेनिंगमधील श्री. विद्याधर भालचंद्र गोखले. त्‍यांचे योगदान कुशल भारत इकोप्रणालीला चालना देईल आणि इतर प्रशिक्षकांना या मिशनचा भाग बनण्‍यास प्रेरित करेल.     

आपल्‍या लिखित भाषणामध्‍ये माननीय पंतप्रधानांनी पुरस्‍कार-प्राप्‍त व्‍यक्‍तींचे अभिनंदन केले. ते म्‍हणाले कीजागतिक दर्जाची पूर्तता करणारे कर्मचारीवर्ग निर्माण करणे हा सरकारचा कौशल्‍य अजेंडा आहे आणि या दृष्टिकोनासह दृढ कौशल्‍य विकास इकोप्रणाली निर्माण करण्‍यासाठी विविध प्रयत्‍न करण्‍यात आले आहेत. संपूर्ण देश आत्‍मनिर्भर भारत मिशनअंतर्गत एकत्र आला आहे आणि आपण आव्‍हानात्‍मक काळात राहत असताना प्रत्‍येक भारतीयाने आत्‍मनिर्भर असणे काळाची गरज आहे. अनेक विभागांमध्‍ये कौशल्‍यपूर्ण तरूणांसाठी वाढती मागणी आहे. आपल्‍या तरूण कर्मचारीवर्गासाठी सध्‍याच्‍या आव्‍हानांना उत्तम संधींमध्‍ये रूपांरित करण्‍याची आणि आत्‍मनिर्भर भारतचे प्रबळ आधारस्‍तंभ बनण्‍याची हीच सुवर्णसंधी आहे. ज्‍यासाठी आपण स्किलिंग, रिस्किलिंग व अपस्किलिंगवर अधिक भर देणे स्‍वाभाविकच आहे. या प्रयत्‍नामध्‍ये प्रशिक्षक व तज्ञांची भूमिका अधिक आवश्‍यक व निर्णायक आहे. माननीय पंतप्रधान म्‍हणाले की, हा माझा विश्‍वास आहे की आज पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आलेले प्रशिक्षक इतर अनेकांना प्रोत्‍साहित करतील आणि आपल्‍या तरूणांच्‍या जीवनांमध्‍ये, तसेच देशाच्‍या विकासामध्‍ये प्रचंड योगदान देण्‍याचे कार्य सुरूच ठेवतील.

उद्योजकता प्रशिक्षणराष्ट्रीय प्रशिक्षु संवर्धन योजना (एनएपीएस)जन शिक्षण संस्थान (जेएसएस)प्रधानमंत्री कौशल विकास योजना (पीएमकेव्हीवाय) अंतर्गत अल्पकालीन प्रशिक्षणप्रशिक्षण महासंचालनालय (डीजीटी) व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीआय) अंतर्गत दीर्घकालीन प्रशिक्षण अशा विविध विभागांमध्‍ये भौगोलिक क्षेत्रांमधील विविध पार्श्‍वभूमींच्‍या एकूण ९२ प्रशिक्षकांना आज आयोजित करण्‍यात आलेल्‍या डिजिटल संमेलनामध्‍ये पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले.

उद्योजकता प्रशिक्षण विभागांतर्गत ३ प्रशिक्षकांना, तर जन शिक्षण संस्‍थान अंतर्गत १५ प्रशिक्षकांना पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले. तसेच १४ प्रशिक्षकांना अल्‍पकालीन प्रशिक्षणांतर्गत आणि ४४ प्रशिक्षकांना दीर्घकालीन प्रशिक्षणांतर्गत पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले. याव्‍यतिरिक्‍त राष्‍ट्रीय प्रशिक्षु संवर्धन योजना (एनएपीएस)प्रती योगदानासाठी १५ कॉर्पोरेट्सना देखील पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले.

माननीय कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे म्‍हणाले, ”आम्‍ही आमच्या सर्वोत्तम प्रशिक्षकांचे कौतुक करण्‍यासोबत मनोबल उंचावण्‍यासाठी आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आपल्‍या संस्‍कृतीमध्‍ये गुरू किंवा शिक्षकांना देण्‍यात येणा-या महत्त्वामधून ते विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनांना आकार देण्‍यामध्‍ये बजावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते. त्‍याचप्रमाणे कौशल्‍य प्रशिक्षक कौशल्‍य इकोप्रणालीला चालना देण्‍यामध्‍ये आणि आपल्‍या तरूणांच्‍या भविष्‍याला योग्‍य दिशेने घेऊन जाण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. काळ बदलत असताना प्रशिक्षक व मूल्‍यांकनकर्त्‍यांची भूमिका अधिक निर्णायक बनली आहे. ते भावी काळातील उद्योगक्षेत्रामधील मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी आपल्‍या तरूण पिढीला योग्‍य दिशा दाखवत आहेत. मी सर्व पुरस्‍कार-प्राप्‍त व्‍यक्‍तींचे अभिनंदन करतो. आम्‍हाला आमच्‍या प्रशिक्षकांचा जागतिक दर्जाचे कौशल्‍यपूर्ण कर्मचारीवर्ग निर्माण करण्‍याप्रती त्‍यांच्‍या निष्‍ठेसाठी अत्‍यंत अभिमान वाटतो. यामुळे आम्‍हाला गेल्‍या पाच वर्षांमध्‍ये विविध लक्षणीय टप्‍पे गाठण्‍यामध्‍ये मदत झाली आहे. मला विश्‍वास आहे की, आम्‍ही सर्वोत्तमेचा शोध घेण्‍याचा आमचा प्रवास सुरूच ठेवू आणि स्किलिंग, अपस्किलिंग व रिस्किलिंगच्‍या माध्‍यमातून आत्‍मनिर्भर भारतचे दृष्टिकोन पूर्ण करण्‍याच्‍या समीप पोहोचू.” 

कौशल्‍य मंत्रालयाचा कौशलाचार्य समादार (पुरस्‍कार) हा वार्षिक कार्यक्रम कौशल्‍य प्रशिक्षकांनी व्‍यावसायिक प्रशिक्षण इकोप्रणालीमध्‍ये दिलेल्‍या योगदानाला पुरस्‍कारासह सन्‍मानित करतो. असा अंदाज आहे की, वर्ष २०२० पर्यंत भारताला कौशल्‍य इकोप्रणालीमध्‍ये जवळपास २.५ लाख प्रशिक्षकांची गरज भासेल. प्रमुख उपक्रम प्रधानमंत्री कौशल विकास योजना (पीएमकेव्‍हीवाय) अंतर्गत एमएसडीई प्रशिक्षकांना त्‍यांच्‍या क्षमता निर्माणानुसार उच्‍च दर्जाचे कौशल्‍य मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी निरंतरपणे काम करत आले आहे. ज्‍यामुळे ते भावी गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये सक्षम होतील.

कौशल्‍य प्रशिक्षकांच्‍या महत्त्वावर भर देत कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे माननीय राज्‍यमंत्री श्री. राज कुमार सिंग म्‍हणाले, ”आजचा कार्यक्रम खास दिवसाला प्रकट करतो, जेथे आम्‍ही आपल्‍या तरूणांना मार्गदर्शन करत असलेल्‍या व्‍यक्‍तींना सन्‍मान करतो. माझ्या मते, आजचा कार्यक्रम अनेक तंत्रज्ञान सक्षम व अनुभवी व्‍यक्‍तींसाठी कुशल भारत मिशनचा भाग बनण्‍याचा एक प्रेरणास्रोत आहे. मी भारतीय तरूणांच्‍या अंतर्गत क्षमतांना चालना देण्‍यामध्‍ये चिकाटी व सातत्‍याने प्रयत्‍न करणा-या सर्व प्रशिक्षकांच्‍या मेहनतींची प्रशंसा करतो. कुशलपूर्ण राष्‍ट्रनिर्मिती आणि आपण या आव्‍हानात्‍मक काळामधून यशस्‍वीपणे बाहेर पडण्‍याच्‍या खात्रीप्रती आपल्‍या अवश्विसनीय कटिबद्धतेसाठी आपले मन:पूर्वक अभिनंदन!

प्रशिक्षकांची भूमिका राष्‍ट्रनिर्मितीमध्‍ये मूलभूत आहे. आम्‍ही खात्री घेऊ की, जगामध्‍ये भारताला कौशल्‍य राजधानी बनवण्‍याच्‍या उद्देशाने दर्जात्‍मक प्रतिभांची निर्मिती करण्‍यासाठी आमच्‍या प्रशिक्षकांना योग्‍य पाठिंबा व दर्जेदार प्रशिक्षण मिळत राहिल.

सध्‍याच्‍या महामारी काळादरम्‍यान या प्रशिक्षकांच्‍या मदतीनेच आयटीआय व जेएसएस संस्‍थांनी संशोधन व नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली. आयटीआय, बेरहामपूरने यूव्‍हीसी सॅनिटायझर विकसित केले आणि आयटीआय कटकने ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्‍पेन्सिंग मशिन विकसित केले. तसेच जेएसएस व इतर संस्‍थांनी विशिष्ट प्रकारचा रोबोट, ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशिन, पीपीई किट्स इत्‍यादी विकसित करत समाजाप्रती लक्षणीय योगदान दिले आहे.

क्राफ्ट इन्‍स्‍ट्रक्‍टर्सच्‍या प्रशिक्षणाव्‍यतिरिक्‍त डीजीटीने आयटीआय व एनएसआयटींमधील प्रशिक्षकांना अधिक सक्षम करण्‍यासाठी आयबीएम, एसएपी, सिस्‍को, अॅसेन्‍चर व क्‍वेस्‍ट अलायन्‍स सारख्‍या विविध उद्योगक्षेत्र भागीदारांसोबत सहयोग केला आहे. नॅसकॉमच्‍या पाठिंब्‍यासह आयटीआय येथे इन्‍स्‍ट्रक्‍टर ट्रेनिंगच्‍या (टीओटी) माध्‍यमातून क्षमता निर्माणाला देखील चालना देण्‍यात येत आहे. अॅडोब स्‍पार्क अंतर्गत जवळपास ७००० इन्‍स्‍ट्रक्‍टर्सना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.

नॅशनल स्किल्‍स क्‍वॉलिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्‍यूएफ) अंतर्गत देशभरातील १३४६२ आयटीआय इन्‍स्‍ट्रक्‍टर्सना लेव्‍हल १, २ व ३ मधील एनएसक्‍यूएफ कम्‍प्‍लायन्‍सवर अल्‍पकालीन प्रशिक्षण देण्‍यात आले. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (एनआयईएसबीयूडी) प्रशिक्षकांना उद्योजकता कौशल्‍ये देण्‍यामध्‍ये सक्रियपणे सहयोगी आहे.

कॉर्पोरेट्स व युनिव्‍हर्सिटीजसह टेमासेक फाऊंडेशन व सिंगापूर पोलिटेक्निक सारख्‍या आंतरराष्‍ट्रीय संस्‍थांनी प्रशिक्षक व मूल्‍यांकनकर्त्‍यांना क्षमता निर्माण उपक्रमांना चालना देण्‍यामध्‍ये मदत केली आहे. राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्‍या नवीन आराखड्यांतर्गत शिक्षकांना शैक्षणिक प्रणालीमधील मूलभूत सुधारणांमध्‍ये अग्रणी स्‍थान देण्‍यात आले आहे. कौशल्‍य अजेंडामध्‍ये प्रशिक्षकांना यशस्‍वीपणे सामावून घेण्‍यासाठी कुशल भारत मिशनने विविध कॉर्पोरेट्ससोबत सहयोग केला आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून कौशल्‍य विकासामधील गती कायम ठेवण्‍यासाठी प्रशिक्षक व मूल्‍यांकनकर्त्‍यांना सक्षम करण्‍यात येईल.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्‍हणाले, प्रशिक्षकांची भूमिका स्किलिंग, रिस्किलिंग व अपस्किलिंगमध्‍ये आवश्‍यक व निर्णायक आहे"

Leave a comment

Your email address will not be published.


*