गुजरातमधील गंडेवा-एना पट्ट्यातील आठ मार्गिकांच्या ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी’ (एचएएम) प्रकल्पासाठी ‘आयआरबी इन्फ्रा’ ठरली प्राधान्याची निविदाकार कंपनी

Virendra D Mhaiskar Chairman and MD - IRB Infrastructure -Photo By GPN

• कंपनीचा हा दुसरा एचएएम प्रकल्प
• वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरील 27.5 कि.मी. क्षेत्रात आठ मार्गिकांचे नव्याने बांधकाम करण्याचा प्रकल्प
• प्रकल्पाचे मूल्य 1,755 कोटी रू.

IMG_20200730_194050मुंबई, 30 जुलै, 2020 (GPN): गुजरातमधील वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरील गंडेवा-एना या पट्ट्यात 27.5 किलोमीटर लांबीच्या आठ मार्गिकांची निर्मिती करण्यासाठी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड (आयआरबी), या भारतातील आघाडीच्या व सर्वात मोठ्या महामार्ग सर्वात मोठ्या महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकसित करणाऱ्या कंपनी ला उच्च निविदा करणारी कंपनी म्हणून मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे मूल्य 1,755 कोटी रुपये आहे.
या कामाबद्दल भाष्य करताना ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र डी. म्हैसकर म्हणाले, “गुजरातमधील वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गावरील आणखी एका विभागाचे काम आमच्या कंपनीला मिळाल्याने आम्ही आनंदित आहोत. हा प्रकल्प मिळाल्याने गेल्या दोन दशकात आम्ही कमावले पायाभूत सुविधा क्षेत्रातील ज्ञान अनुभव आणि अंमलबजावणीच्या क्षमता या पुन्हा एकदा सिद्ध झाल्या आहेत.”
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः
• हा प्रकल्प (पॅकेज-सातवे) ‘नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या फेज-1 अंतर्गत सरकारच्या महत्वाकांक्षी ‘भारतमाला परियोजने’चा भाग आहे.
• आगामी वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गावर गंडेवा-एना पट्ट्यातील 27.5 किलोमीटर लांबीचा आठ मार्गिका उभारणीचा हा ‘ग्रीन-फील्ड’ (नवीन बांधणीचा) प्रकल्प आहे.
• या प्रकल्पाचे बांधकाम करण्यासाठी 730 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 15 वर्षांचे अधिकार देण्यात येणार आहेत.
• हा प्रकल्प मिळाल्यास, कंपनीला मिळालेल्या कामांचे एकूण मूल्य 13,755 कोटी रुपयांवर जाईल.
विशेष बाब अशी, की याच द्रुतगती मार्गावरील पद्रा ते वडोदरा या पट्ट्यातील 23.740 किमी लांबीच्या बांधकामाचे, 2,043 कोटी रुपयांचे काम या कंपनीकडून सध्या सुरू आहे. ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "गुजरातमधील गंडेवा-एना पट्ट्यातील आठ मार्गिकांच्या ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी’ (एचएएम) प्रकल्पासाठी ‘आयआरबी इन्फ्रा’ ठरली प्राधान्याची निविदाकार कंपनी"

Leave a comment

Your email address will not be published.


*