फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे पार पडला ‘केअरिंग फॉर एन्व्हायर्नमेंट’ या विषयावरील मुंबईतील पहिलावहिला समाजाभिमुख पीअर-मॉडरेटर कार्यक्रम

IMG-20191128-WA0005IMG-20191128-WA0004मुंबई, २६ नोव्हेंबर २०१९: फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणूकशास्त्र विभागाने आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये ‘पर्यावरणाची काळजी घेताना’ (‘केअरिंग फॉर एनव्हायर्नमेंट’) या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन केले. समाजाभिमुख पीअर मॉडरेटर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी आणि एसएल रहेजा हॉस्पिटल, माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईतील विविध ठिकाणच्या शाळांतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले. लोक व त्याच्याभोवतीचे नैसर्गिक जग यांच्यातील भावनिक बंध ओळखून ते आणखी सुधारणे तसेच लोकांनी आपल्या जीवनात शाश्वत पर्यायांचा स्वीकार करावा यासाठी आपल्या दैनंदिन कामांची उदाहरणे देत त्यांचे निसर्गाशी असेलले नाते घट्ट करणे हा या कार्यशाळेमागचा हेतू होता.

फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणूकशास्त्र विभागाचे संचालक डॉ. समीर पारीख यांनी धडाडीने आयोजित केलेल्या या कार्यशाळमध्ये इयत्ता दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग होता. खास नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना साजेशा पद्धतीने आखण्यात आलेल्या या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये ‘पीअर-मेन्टॉर’ (समवयीन मार्गदर्शक) पद्धत वापरली गेली. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विषयाचे थेट शिक्षण देऊन त्यांना पर्यावरणाचे दूत म्हणून तयार केले जाते व ही मुले आपापल्या शाळेमध्ये आपल्या वयाच्या इतर विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारच्या कार्यशाळा घेतात. संवादात्मक सत्राच्या माध्यमातून जलसंवर्धन, पुनर्वापर (reuse) आणि पुनर्प्रक्रिया (recycle) यांचे महत्त्व, हरित आवरणाचे महत्त्व आणि डिजिटल डिटॉक्सची गरज या विषयांवर भर देत ही कार्यशाळा घेतली गेली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल ई-प्रमाणपत्र देण्यात आले.

Image 5या कार्यक्रमाबद्दल बोलताना फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणूकशास्त्र विभागाचे संचालक डॉ. समीर पारीख म्हणाले, ”मानसिक आरोग्य विषयातील तज्ज्ञ म्हणून पर्यावरणीय मानसशास्त्र (इको-सायकोलॉजी)च्या क्षेत्राकडून मिळालेले ज्ञान वापरून जाणीवजागृती करणे व तरुण मुलांना पर्यावरणाचा अधिक सहृदयतेने विचार करण्यासाठी प्रेरणा देणे ही आमची जबाबदारी आहे. युवा मनांना प्रभावित करणारा हा उपक्रम पुढे नेण्यासाठी देशभरात आम्ही अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत व त्यातून आम्हाला खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.” 

या कार्यक्रमाबद्दल बोलताना फोर्टिस हॉस्पिटल, मुंबईच्या झोनल डायरेक्टर डॉ. एस. नारायणी म्हणाल्या, ”युवा मनांना सक्रिय आणि सक्षम बनवल्याने पर्यावरणाविषयी संवेदनशील असलेली पिढी घडविण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठे परिवर्तन येण्यास मदत होईल. तसेच भावी पिढ्यांच्या विचारांना आकार देण्यास मदत करणा-या या कार्यक्रमामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा याची निवड करण्यापासून तो प्रत्यक्ष राबविण्यापर्यंत सर्व कामांत आमची मदत करणारे डॉ. पारीख व त्यांची टीम यांची मी आभारी आहे.”

या कार्यशाळेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी आणि एसएल रहेजा हॉस्पिटल, माहीम येथे वृक्षारोपण केले; मुलांनी आपल्या घराच्या किंवा शाळेच्या परिसरातील एक झाड दत्तक घ्यावे व त्याची काळजी घ्यावी आणि पर्यावरणाबद्दल जनमानसात जागरुकता वाढविण्यासाठी आपल्या झाडाच्या प्रगतीची माहिती सोशल मीडियावर टाकावी असे आवाहन यावेळी मुलांना करण्यात आले. 

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे पार पडला ‘केअरिंग फॉर एन्व्हायर्नमेंट’ या विषयावरील मुंबईतील पहिलावहिला समाजाभिमुख पीअर-मॉडरेटर कार्यक्रम"

Leave a comment

Your email address will not be published.


*