Debadatta Chand MD and CEO Bank of Baroda (BoB) announces the bank’s Q3FY24 Results

बँक ऑफ बडोदाने जाहीर केले 31 डिसेंबर 2023 रोजी समाप्त तिमाहीचे आर्थिक निकाल

मुंबई, 1 फेब्रुवारी, 2024 (GPN): बँक ऑफ बडोदाने जाहीर केले Q3FY24 आर्थिक निकाल – आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत बीओबीने केली 38.2 टक्के एवढ्या दमदार वाढीची नोंद, निव्वळ नफा 12,902 कोटी रुपयांवर वैशिष्ट्ये 31 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, जागतिक व्यवसायात 10.7 टक्क्यांनी वाढ होऊन तो 22,94,627 कोटी रुपयांवर पोहोचला आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीतील (क्यू3) निव्वळ नफा 4,579 कोटी रुपये, मागील वर्षाच्या तुलनेत 18.8 टक्के वाढ तिमाहीतील मालमत्तेवरील परतावा (रिटर्न ऑन असेट्स अर्थात आरओए) 1.20 टक्के, आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत आरओए 1.15 टक्के इक्विटीवरील परतावा (आरओई) मागील वर्षाच्या तुलनेत 168 बीपीएसने वाढून, आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत 18.70 टक्क्यांवर नफाक्षमतेतील वाढीला निकोप कार्यात्मक उत्पन्नवाढीचा आधार मिळाला, आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत मागील वर्षाच्या तुलनेत 18.8 टक्के वाढ आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत व्याजेतर उत्पन्नात 1.5 पटींनी वाढ होऊन कार्यात्मक उत्पन्न वाढीला चालना मिळाली, हे उत्पन्न 10,304 कोटी रुपयांपर्यंत गेले उत्पन्नातील निकोप वाढीला ओपेक्समधील नियंत्रित वाढीची जोड मिळाल्यामुळे, आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत, कार्यात्मक नफ्यामध्ये 21.7 टक्के एवढी निकोप वाढ झाली आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत खर्च व उत्पन्नाचे गुणोत्तर मागील वर्षाच्या तुलनेत 123 बीपीएसने घटून 47.13 टक्क्यांवर आले जागतिक निव्वळ व्याज अंतरामध्ये (एनआयएम) सलग सुधारणा होऊन ते 3 बीपीएसने वाढले, आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत ते 3.10 टक्के होते, आर्थिक वर्ष 24च्या दुसऱ्या तिमाहीत ते 3.07 टक्के होते आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील निव्वळ व्याज अंतर (एनआयएम) 3.14 टक्के आहे बीओबीच्या असेट दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून, जीएनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 145 बीपीएसने कपात झाली आहे, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत जीएनपीए 4.53 टक्के होते, ते आर्थिक वर्ष 24च्या तिमाहीत 3.08 टक्के झाले आहे बँकेचे एनएनपीए आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत 0.99 टक्के होते, त्यात 29 बीपीएसने घट होऊन आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत ते 0.70 टक्क्यांवर आले आहे बीओबीचा ताळेबंद, टीडब्ल्यूओसह 93.39 टक्के आणि टीडब्ल्यूओ वगळता 77.70 टक्के, एवढ्या निकोप तरतूद संरक्षण गुणोत्तरासह (पीसीआर), दमदार आहे आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत पत खर्च 1 टक्क्यांहून कमी म्हणजेच 0.69 टक्का होता, तर या तिमाहीमध्ये तो 0.39 टक्का होता. 31 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, रोखता संरक्षण गुणोत्तर (एलसीआर) 133 टक्के एवढे निकोप होते बीओबीच्या जागतिक…