बँक ऑफ बडोदाने जाहीर केले 31 डिसेंबर 2023 रोजी समाप्त तिमाहीचे आर्थिक निकाल

Bank of Baroda (BoB) Logo

Debadatta Chand, MD and CEO, Bank of Baroda (BoB)

मुंबई, 1 फेब्रुवारी, 2024 (GPN): बँक ऑफ बडोदाने जाहीर केले Q3FY24 आर्थिक निकाल –

आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत बीओबीने केली 38.2 टक्के एवढ्या दमदार वाढीची नोंदनिव्वळ नफा 12,902 कोटी रुपयांवर

वैशिष्ट्ये

  • 31 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, जागतिक व्यवसायात 10.7 टक्क्यांनी वाढ होऊन तो 22,94,627 कोटी रुपयांवर पोहोचला
  • आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीतील (क्यू3) निव्वळ नफा 4,579 कोटी रुपये, मागील वर्षाच्या तुलनेत 18.8 टक्के वाढ
  • तिमाहीतील मालमत्तेवरील परतावा (रिटर्न ऑन असेट्स अर्थात आरओए) 1.20 टक्के, आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत आरओए 1.15 टक्के
  • इक्विटीवरील परतावा (आरओई) मागील वर्षाच्या तुलनेत 168 बीपीएसने वाढून, आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत 18.70 टक्क्यांवर
  • नफाक्षमतेतील वाढीला निकोप कार्यात्मक उत्पन्नवाढीचा आधार मिळाला, आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत मागील वर्षाच्या तुलनेत 18.8 टक्के वाढ
  • आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत व्याजेतर उत्पन्नात 1.5 पटींनी वाढ होऊन कार्यात्मक उत्पन्न वाढीला चालना मिळाली, हे उत्पन्न 10,304 कोटी रुपयांपर्यंत गेले
  • उत्पन्नातील निकोप वाढीला ओपेक्समधील नियंत्रित वाढीची जोड मिळाल्यामुळे, आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत, कार्यात्मक नफ्यामध्ये 21.7 टक्के एवढी निकोप वाढ झाली
  • आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत खर्च व उत्पन्नाचे गुणोत्तर मागील वर्षाच्या तुलनेत 123 बीपीएसने घटून 47.13 टक्क्यांवर आले
  • जागतिक निव्वळ व्याज अंतरामध्ये (एनआयएम) सलग सुधारणा होऊन ते 3 बीपीएसने वाढले, आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत ते 3.10 टक्के होते, आर्थिक वर्ष 24च्या दुसऱ्या तिमाहीत ते 3.07 टक्के होते
  • आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील निव्वळ व्याज अंतर (एनआयएम) 3.14 टक्के आहे
  • बीओबीच्या असेट दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून, जीएनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 145 बीपीएसने कपात झाली आहे, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत जीएनपीए 4.53 टक्के होते, ते आर्थिक वर्ष 24च्या तिमाहीत 3.08 टक्के झाले आहे
  • बँकेचे एनएनपीए आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत 0.99 टक्के होते, त्यात 29 बीपीएसने घट होऊन आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत ते 0.70 टक्क्यांवर आले आहे
  • बीओबीचा ताळेबंद, टीडब्ल्यूओसह 93.39 टक्के आणि टीडब्ल्यूओ वगळता 77.70 टक्के, एवढ्या निकोप तरतूद संरक्षण गुणोत्तरासह (पीसीआर), दमदार आहे
  • आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत पत खर्च 1 टक्क्यांहून कमी म्हणजेच 0.69 टक्का होता, तर या तिमाहीमध्ये तो 0.39 टक्का होता.
  • 31 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, रोखता संरक्षण गुणोत्तर (एलसीआर) 133 टक्के एवढे निकोप होते
  • बीओबीच्या जागतिक कर्जांमध्ये, आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत, मागील वर्षाच्या तुलनेत 13.6 टक्के वाढ झाली. रिटेल कर्जपुस्तिकेत झालेल्या दमदार वाढीमुळे जागतिक कर्जांमध्ये वाढ झाली. वाहनकर्ज (24.3 टक्के), गृहकर्ज (15.6 टक्के), व्यक्तिगत कर्ज (60.8 टक्के), तारणावरील (मॉर्गेज) कर्ज (10.5 टक्के), शैक्षणिक कर्ज (18.3 टक्के) आदी विभागांतील उत्तम वाढीमुळे, बँकेच्या ऑरगॅनिक रिटेल अॅडव्हान्सेसमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नफाक्षमता

  • बीओबीने आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत 4,579 कोटी रुपये एवढ्या स्टॅण्डअलोन निव्वळ नफ्याची नोंद केली. आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा 3,853 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील निव्वळ नफा 12,902 कोटी रुपये (+38.2 YoY) होता. आर्थिक वर्ष 23च्या नऊमाहीत तो 9,334 कोटी रुपये होता.
  • आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) मागील वर्षाच्या तुलनेत 2.6 टक्क्यांनी वाढून 11,101 कोटी रुपयांवर पोहोचले. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील एनआयआयमध्ये  10.4 टक्के होऊन तो 32,929 कोटी रुपये झाला आहे.
  • आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत व्याजेतर उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 57.1 टक्क्यांनी वाढून 10,304 कोटी रुपये झाले आहे.
  • जागतिक एनआयएमध्ये सलग सुधारणा होत आहे. आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत तो 3 बीपीएसने सुधारून 3.10 टक्के झाला आहे. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील जागतिक एनआयएम 3.14 टक्के आहे.
  • वित्तीय संस्थांना दिलेल्या आगाऊ रकमांवरील (अॅडव्हान्सेस) उत्पन्न आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत 8.51 टक्क्यांपर्यंत गेले आहे. आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत ते 7.78 टक्के होते.
  • आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत ठेवींचा खर्च वाढून 4.96 टक्के झाला, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तो  4.01 टक्के होता.
  • आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत कार्यात्मक उत्पन्न 13,912 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील कार्यात्मक उत्पन्न 43,233 कोटी रुपये होते. त्यामध्ये 18.8 टक्के वाढ झाली.
  • आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत कार्यात्मक नफा 7,015 कोटी रुपये होता. (आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत एमटीएमचा प्रभाव वगळता, तिमाही कार्यात्मक नफा 7,482 कोटी होता, तर आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत तो 7,307 कोटी रुपये होता.)
  • आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत कार्यात्मक नफा 21.7 टक्क्यांनी वाढून 22,859 कोटी रुपये झाला.
  • आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत उत्पन्न व खर्च ह्यांच्यातील गुणोत्तर 49.57 टक्के होते.
  • आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत मालमत्तेवरील परतावा अर्थात आरओएमध्ये  (वार्षिक) सुधारणा होऊन तो 1.20 टक्के झाला. आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत तो 1.13 टक्के होता.
  • इक्विटीवरील परतावा आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत 19.91 टक्के होता. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत, आरओईमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 168 बीपीएसने वाढ होऊन तो 18.70 टक्के झाला.
  • एकत्रित घटक म्हणून, आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा  4,789 कोटी रुपये होता, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा 4,306 कोटी रुपये होता.

असेटचा दर्जा

  • आर्थिक वर्ष 24 मध्ये एकूण एनपीए (बुडीतकर्जे) मागील वर्षाच्या तुलनेत 22.8 टक्क्यांनी घटून 32,318 कोटी रुपयांवर आला, तर एकूण एनपीए गुणोत्तर सुधारून 3.08 टक्के झाले, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत ते 4.53 टक्के होते.
  • बँकेचे निव्वळ एनपीए गुणोत्तर आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत अगदीच कमी म्हणजे 0.70 टक्का होते, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत ते  0.99 टक्का होते.
  • आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे तरतूद संरक्षण गुणोत्तर अर्थात पीसीआर टीडब्ल्यूओसह 99.39 टक्के, तर टीडब्ल्यूओ वगळता 77.70 टक्के होते.
  • आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत नवीन कर्जे बुडवले जाण्याचे प्रमाण (स्लिपेज रेशो) 1.06 टक्के होते, आर्थिक वर्ष 23च्या नऊमाहीत ते 1.22 टक्के होते. आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीतील स्लिपेज रेशो 0.95 टक्का म्हणजेच 1 टक्क्याहून कमी होता. आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत स्लिपेज रेशो 1.05 टक्के होता.
  • पतखर्च, आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत 0.39 टक्का, तर आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत 0.69 टक्का होता.

भांडवल पर्याप्तता

  • बँकेचा सीआरएआर डिसेंबर’23 मध्ये 14.72 टक्के होता. डिसेंबर’23मधील आकडेवारीनुसार, श्रेणी-I 12.67 टक्क्यांवर, (सीईटी-1 11.11 टक्के, एटी1 1.56 टक्के) आणि श्रेणी-II 2.05 टक्के होता.
  • एकत्रित कंपनीचे सीआरएआर आणि सीईटी-1 अनुक्रमे  15.14 टक्क्यांवर व  11.62 टक्क्यांवर होते.
  • रोखता संरक्षण गुणोत्तर (एलसीआर) एकत्रित निकषावर 133 टक्के होते.

व्यवसायाची कामगिरी

  • बँकेचे जागतिक अॅडव्हान्सेस मागील वर्षाच्या तुलनेत 13.6 टक्क्यांनी वाढून 10,49,327 कोटी रुपये झाले.
  • बँकेचे देशांतर्गत अॅडव्हान्सेस मागील वर्षाच्या तुलनेत 13.4 टक्क्यांनी वाढून 8,62,086 कोटी रुपयांवर गेले.
  • जागतिक ठेवी मागील वर्षाच्या तुलनेत 8.3 टक्क्यांनी वाढून 12,45,300 कोटी रुपयांवर गेल्या.
  • डिसेंबर’23 मधील आकडेवारीनुसार, देशांतर्गत ठेवी मागील वर्षाच्या तुलनेत 6.3 टक्क्यांनी वाढून 10,67,371 कोटी रुपयांवर गेल्या.
  • डिसेंबर’23 मधील आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय ठेवींमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 22.1 टक्क्यांनी वाढ होऊन त्या 1,77,929 कोटी रुपयांवर गेल्या.
  • वाहनकर्ज (24.3%), गृहकर्ज (15.6%),व्यक्तिगत कर्ज (60.8%), तारणावरील (मॉर्गेज) कर्ज (10.5%), शैक्षणिक कर्ज (18.3%) ह्या महत्त्वपूर्ण विभागांतील वाढीच्या जोरावर ऑरगॅनिक रिटेल अॅडव्हान्सेसमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली.
  • कृषीकर्जांचा पोर्टफोलिओ मागील वर्षाच्या तुलनेत 12.6 टक्क्यांनी वाढून 1,34,240 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • सुवर्ण कर्जाचा एकूण पोर्टफोलिओ (रिटेल व कृषी कर्जांसह) 45,074 कोटी रुपयांवर पोहोचला असून, त्यात मागील वर्षाच्या तुलनेत 28.3 टक्के वाढ झाली आहे.
  • ऑरगॅनिक एमएसएमई कर्जांचा पोर्टफोलिओ मागील वर्षाच्या तुलनेत 12.6 टक्क्यांनी वाढून 1,15,995 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • कॉर्पोरेट अॅडव्हान्सेसमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 10.2 टक्के वाढ होऊन ते 3,62,813 कोटी रुपये झाले आहेत.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाने जाहीर केले 31 डिसेंबर 2023 रोजी समाप्त तिमाहीचे आर्थिक निकाल"

Leave a comment

Your email address will not be published.


*