आगामी काळात मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा – वजावटी–पश्चात घट 3.2% वरून घसरून 2.6% सीएएसए रेशियो वाढून 39% पर्यंत साल दरसाल एकंदर जमा वृद्धी 49% व्यवसाय वृद्धी घोडदौड सुरूच – रू. 8,152 कोटींचे तिमाही वाटप (+ 33% साल–दरसाल) वाटचाल साल–दरसाल 26% मालमत्ता वाढीकडे स्वतंत्र संचालक म्हणून आरबीआयचे माजी–डेप्युटी गव्हर्नर एच आर खान यांचे एयु’कडून स्वागत क्रिसीलच्या वतीने बँकेचे दीर्घकालीन कर्ज आणि मुदत ठेव कार्यक्रमावरील रेटींग आऊटलुक अद्ययावत, स्थिती सकारात्मक’ वरून ‘स्थिर’ मुंबई, 29 जानेवारी 2022 (GPN): एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आजच्या बैठकीत तिमाही आर्थिक निकाल आणि 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या परिणामांना मंजुरी दिली. कार्यकारी सारांश एयु बँकेकरिता ठोस कर्ज वाटपाच्या एकंदर व्यवसाय वातावरणात महत्त्वपूर्ण सुधारणेची नोंद झाली. वित्तीय वर्ष 22 च्या तिमाहीत साल–दरसाल वाटप रु 8,152 कोटींपर्यंत म्हणजे 33% याप्रमाणे नोंदवण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा रु. 6,115 कोटी असा होता. वित्तीय वर्ष 22 ची तिमाही रु 48 कोटी ईसीएलजीएस वाटपात समाविष्ट. वित्तीय वर्ष 22 च्या तिमाहीत निधी–एतर वाटपात साल–दरसाल 55%ची वृद्धी होऊन ₹ 627 कोटी, मागील वर्षी याच कालावधीत ₹ 405 कोटीची नोंद. जमा रक्कम साल–दरसाल 49% ने वाढून रु 29,708 कोटींवरून रु. 44,278 कोटीपर्यंत, मागील वर्षी 22% असलेला सीएएसए रेशियो 39% पर्यंत. बँकेच्या अग्रिम रकमेत साल–दरसाल 33% वृद्धी, रु 30,523 कोटीवरून रु 40,719 कोटींवर. तिमाहीच्या प्रत्येक महिन्यात सातत्यपूर्ण जमा कार्यक्षमतेत 100% वृद्धी झाल्याने मालमत्ता गुणोत्तरात सुधारणा पाहायला मिळते. एयु 0101, व्हीडिओ बँकिंग, क्रेडीट कार्डस्, युपीआय क्यूआर इत्यादि घटकांसह बँकेने डिजीटल सेवेत बळकट स्थिती राखली असून सगळ्यात भक्कम वृद्धी पाहायला मिळते आहे. वित्तीय ठळक मुद्दे आर्थिक वर्ष 22 च्या 3 ऱ्या तिमाहीचा वित्तीय निकाल निव्वळ नफा वृद्धीत वाढ होऊन ₹ 302 कोटींवर नेट इंटरेस्ट मार्जिन (एनआयएम) 6.3% आरओए 2.2% आणि आरओई 17.4% मागील वर्षी याच तिमाहीत निधीचे सरासरी मूल्य 6.7% वरून 5.9% मालमत्ता गुणवत्ता बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत 2.6% जीएनपीएसह सातत्यपूर्ण सुधारणा, मागील तिमाहीत 3.2% एकंदर निव्वळ एनपीए एकूण अग्रिम रकमेच्या 1.3%, मागील तिमाहीत 1.7% जमा कार्यक्षमता सरासरी 106% , मागील वर्षी याच कालावधीची तुलना करता 97% याशिवाय बँकेने आकस्मिक तरतुदीपोटी ठेवलेली रक्कम रु. 300 कोटी (अग्रिम राशीच्या 75 बीपीएस) आणि जीएनपीएकरिता अधिकची तरतूद तसेच पुनर्रचित पुस्तिका तसेच मानक तरतुदी. भांडवल पर्याप्तता बँकेकडे चांगले भांडवल असून ठोस टियर 1 भांडवली गुणोत्तर 18.2 % आणि एकूण सीआरएआर 19.5% जे अनुक्रमे 7.5% and 15% च्या किमान आवश्यकतेच्या पुरेसे अधिक …