ब्रिटानिया ट्रीट क्रॉसाँ सादर करत आहेत दुबई कुनाफा क्रॉसाँ-पिस्ता क्रीम, आता क्रॉसाँमध्ये मिळणार जागतिक चवींची लयलूट

मुंबई, 31 मे 2026:  चवींचे लाड पुरवण्यासाठी अधिक पुढे जात ब्रिटानिया ट्रीट क्रॉसाँने आपल्या नवीन उत्पादनाची म्हणजेच दुबई कुनाफा क्रॉसाँ – पिस्ता क्रीमची घोषणा केली आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या या चवीपासून प्रेरणा घेत या क्रॉसाँमध्ये सावर डो क्रॉसाँमध्ये अस्सल पिस्त्यापासून बनवलेल्या अनोख्या फिलिंगचा मेळ साधण्यात आला आहे. यामुळे पहिल्यांदाच तुमच्या ओळखीच्या, जगभरातून प्रेरणा घेतलेल्या चवींचा अनुभव असा सहजसोप्या पद्धतीने रेडी-टू-ईट प्रकारात घेता येणार आहे.

स्नॅक्स किंवा नाश्त्याचा अनुभव अधिक छान आणि चविष्ट बनवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खास या दुबई कुनाफा क्रॉसाँ-पिस्ता क्रीम क्रॉसाँमध्ये जगभरातून प्रेरणा घेतलेल्या चवींसोबत ओळखीच्या टेक्श्चरचा मेळ घडवून आणला आहे. मऊशार, लेअर्ड टेक्श्चर आणि क्रीमी फिलिंगसोबतच या क्रॉसाँमध्ये प्रत्येक घासात अगदी सहजसोप्या पद्धतीने उत्तम चवीचा आनंद घेता येईल.
जागतिक चवींमधील ग्राहकांची वाढती रुची आणि स्नॅक्समधील बदलते प्राधान्यक्रम या नव्या उत्पादनात प्रतित होतात. या ब्रँडने भारतीय ग्राहकांसाठी ब्रिटानिया ट्रीट क्रॉसाँमध्ये सातत्याने वैविध्यपूर्ण चवींचा अनुभव देऊ केला आहे. यासाठी सहज उपलब्ध आणि तरीही प्रीमिअम असा अनुभव देऊ करणाऱ्या प्रकारांचा वापर करत त्यांनी भारतात क्रॉसाँ विभागाला स्थिर गतीने बळकटी दिली आहे.

या सादरीकरणाबद्दल ब्रिटानियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर पुनीत दास म्हणाले, “आजघडीला जागतिक पातळीवरील चवींबद्दल, विशेषत: जीभेचे चोचले पुरवणाऱ्या चवींचा अनुभव घेण्याबद्दल ग्राहकांमध्ये बरीच उत्सुकता दिसून येत आहे. दुबई कुनाफा क्रॉसाँ-पिस्ता क्रीम या नव्या उत्पादनासह आम्हाला आमची उत्पादने अशा प्रकारे बनवायची आहेत ज्याबद्ल ग्राहकांना आधीपासूनच उत्सुकता आहे, जे ट्रेंडिंग आहे आणि ज्यांना क्रॉसाँ प्रकारात समाविष्ट करता येईल. जागतिक चवींची प्रेरणा आणि दैनंदिन जीवनात सोयीचा असेल असा प्रकार यांचा मेळ घालत ग्राहकांना काहीतरी नवीन, अधिक आकर्षक देणे, ही आमची मूळ कल्पना आहे. पिस्त्याच्या अप्रतिम क्रीमसोबत मऊशार क्रॉसाँमध्ये तुम्हाला अधिक समृद्ध, चवदार स्नॅकिंगचा अनुभव मिळेल आणि हा अनुभव काहीसा ओळखीचा, सोयीचाही असेल. ”

आपल्या वाढत्या उत्पादनयादीच्या यशाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटानिया ट्रीट क्रॉसाँने सातत्याने नव्या चवी आणल्या आहेत. यात कोका, वॅनिला, ट्रिपल चोको आणि मिक्स्ड फ्रूट अशा बहूविध चवींसह त्यांनी भारतातील वाढत्या क्रॉसाँ उद्योगात आपली दमदार ओळख निर्माण केली आहे. ब्रिटानिया ट्रीट दुबई कुनाफा क्रॉसाँ-पिस्ता क्रीम सध्या निवडक शहरांमधील आघाडीच्या रिटेल आऊटलेट्स आणि क्यू-कॉमर्स व्यासपीठांवर उपलब्ध आहे.
===========================================================

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "ब्रिटानिया ट्रीट क्रॉसाँ सादर करत आहेत दुबई कुनाफा क्रॉसाँ-पिस्ता क्रीम, आता क्रॉसाँमध्ये मिळणार जागतिक चवींची लयलूट"

Leave a comment

Your email address will not be published.


*