शॉपर्स स्टॉपकडून भारतातील पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनसाठी हायब इंडियासोबत सहयोगाने ‘गेट स्पॉटलाईट रेडी’चे अनावरण

मुंबई, ८ मे २०२६ GPN: शॉपर्स स्‍टॉप या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम फॅशन, ब्युटी आणि गिफ्टिंग डेस्टिनेशनने, मुंबईत इन-स्टोअर ऑडिशन-प्रेरित अनुभव ‘गेट स्पॉटलाईट रेडी’सुरू करण्यासाठी हायब इंडियासोबत सहयोग केला. हा सहयोग देशातील पहिल्या जागतिक गर्ल ग्रुप ऑडिशनसाठी भारतातील कलाकारांच्या भावी पिढीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे भारतातील तरूण प्रतिभेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

नवीन पिढीसाठी डिझाइन केलेल्‍या या मोहिमेने शक्तिशाली सांस्कृतिक बदल सादर केले, जिथे जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा फक्त प्रेक्षक राहिले नसून जगावर ठसा उमटवण्यासाठी सज्ज असलेले महत्त्वाकांक्षी कलाकार बनले आहेत. १ मे ते ८ मे या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सौंदर्य, शैली आणि जागतिक पॉप संस्कृतीचे संयोजन सादर केले. याद्वारे ग्राहकांना खास क्युरेटेड आणि अत्यंत गुंतवून ठेवणाऱ्या क्रियाकलापांच्‍या माध्यमातून स्पॉटलाईटसाठी (प्रसिद्धीसाठी) सज्ज होण्याची संधी मिळाली.

हायब इंडियाच्या जागतिक गर्ल ग्रुप ऑडिशनबद्दल असलेल्या वाढत्या उत्साहात या अनुभवाने अधिक भर घातली. ३१ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत ऑनलाइन चालणाऱ्या या ऑडिशन्स भारतातील उदयोन्मुख आणि महत्त्वाकांक्षी तरुण प्रतिभेला वाव देत आहेत. तसेच, ९ आणि १० मे रोजी मुंबईत होणाऱ्या ऑन-ग्राउंड ऑडिशन्स आणि हायब इंडिया पॉप-अप पार्क्समुळे हा उत्साह अधिक वाढला आहे, जिथे परस्परसंवादी अनुभव आणि कंपनीच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण व निर्मिती परिसंस्थेत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

“शॉपर्स स्टॉपने हायब इंडियासोबत सहयोगाने आपल्या देशव्यापी ‘गेट स्पॉटलाईट रेडी’ मोहिमेची घोषणा केली आहे,” असे शॉपर्स स्टॉपचे कस्टमर केअर असोसिएट, मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ कविंद्र मिश्रा म्हणाले. “दशकांपासून शॉपर्स स्टॉपने आघाडीच्या जागतिक ब्रँड्सना भारतातील ग्राहकांच्या जवळ आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. ‘गेट स्पॉटलाईट रेडी’ मोहिमेद्वारे हा ब्रँड आपला प्रवास पुढे नेत असून, आता भारतातील प्रतिभेला जागतिक स्तरावर चमकण्यास सक्षम करत आहे. भारतासाठी जागतिक अनुभव सादर करण्यापासून भारतातील प्रतिभेला जागतिक व्यासपीठावर नेण्यापर्यंतचा हा ब्रँडच्या उद्देशातील महत्त्वाचा बदल आहे.”
शॉपर्स स्टॉपसोबत आमचा सहयोग उत्साही पाऊल आहे, कारण याद्वारे आम्ही भारतातील समृद्ध आणि गतिमान मनोरंजन परिसंस्थेप्रती असलेली आमची बांधिलकी अधिक दृढ करत आहोत,” असे हायब इंडियाचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड सार्थक अरोरा म्हणाले.

“शॉपर्स स्टॉपसोबत ‘गेट स्पॉटलाईट रेडी’ मोहीम जागतिक स्तरावर चमकू शकणाऱ्या कलाकारांचा शोध घेण्याच्या, त्यांना जोपासण्याच्या आणि विकसित करण्याच्या आमच्या प्रयत्‍नांचाच भाग आहे. आम्ही चाहत्यांसाठी आणि समुदायांसाठी अशाच प्रकारचे गतिमान व आकर्षक अनुभव निर्माण करण्यास उत्सुक आहोत, जे त्यांच्या महत्त्वाकांक्षांना पाठबळ देतील आणि चिरंतन आठवणी तयार करतील.”

या मोहिमेच्या मुंबई टप्प्याचा एक भाग म्हणून, W.i.S.H. या सर्व मुलींच्या पॉप बँडने ७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जुहू येथील शॉपर्स स्टॉपमध्ये सादरीकरण केले. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना उत्‍साहवर्धक अनुभव दिला आणि तरुण महत्त्वाकांक्षी कलाकारांना त्यांची स्वप्‍ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले.

शॉपर्स स्टॉपने महत्त्वाकांक्षी कलाकारांना ‘गेट स्पॉटलाईट रेडी’ करण्यासाठी सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ज्यामध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शैली, कौशल्य आणि स्व-अभिव्यक्तीचे संयोजन होते. सहभागी कलाकारांनी पाच खास क्युरेटेड फॅशन आणि ब्युटी लुक्सचा अनुभव घेतला, कलर अॅनालिसिस झोनमध्ये स्वतःला साजेसे रंग शोधले आणि एका परस्परसंवादी व उत्साही फोटोबूथमध्ये आपली बदललेली शैली कॅमेऱ्यात कॅप्‍चर केली.

यातील प्रत्येक अनुभव फक्त सहभागींच्या बाह्य रूपाला उजाळा देण्यासाठीच नाही, तर त्यांचा आत्मविश्वास वाढवून सादरीकरण सुधारण्यासाठी डिझाइन केला होता. शॉपर्स स्टॉपची ही मोहीम म्हणजे महत्त्वाकांक्षी कलाकारांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी दिलेले एक निमंत्रण होते.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "शॉपर्स स्टॉपकडून भारतातील पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनसाठी हायब इंडियासोबत सहयोगाने ‘गेट स्पॉटलाईट रेडी’चे अनावरण"

Leave a comment

Your email address will not be published.


*