– मिशन CARES आणि क्षेत्रीय सुधारणांवर आधारित दृष्टीकोनावर भर / CREDAI-MCHI’s Change of Guard 2025-2027
मुंबई, १४ ऑगस्ट २०२५ (GPN): मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील एक ऐतिहासिक घडामोड म्हणून, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (एमएमआर) मधील रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च संस्थेने, क्रेडाई एमसीएचआयने, नाहर ग्रुपचे चेअरमन श्री. सुखराज नाहर यांची २०२५-२०२७ या कालावधीसाठी १८ वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. हा भव्य ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, तसेच मान्यवर पाहुणे म्हणून भारत सरकारचे केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत, माजी अध्यक्ष, नवे व्यवस्थापन मंडळ, आणि संघटनेचे विविध सदस्य उपस्थित होते.
श्री. नाहर यांनी मागील दोन वर्षे उल्लेखनीय सेवा देणारे श्री. डॉमिनिक रोमल यांची जागा घेतली आहे. ही बदलाची प्रक्रिया फक्त नेतृत्वात झालेला बदल नाही, तर मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (एमएमआर) मधील रिअल इस्टेट इकोसिस्टमसाठी परिवर्तनात्मक टप्प्याची सुरुवात आहे. क्रेडाई एमसीएचआयने नवे व्यवस्थापन मंडळही जाहीर केले, ज्यात अध्यक्ष नियुक्त श्री. बंदिश अजमेरा, सचिव श्री. रुशी मेहता, आणि खजिनदार श्री. निकुंज संघवी यांचा समावेश आहे. या सोहळ्यात संस्थेच्या नव्या धोरणात्मक आराखड्याची औपचारिक वचनबद्धता देखील दर्शविण्यात आली. क्रेडाई-एमसीएचआयने मिशन CARES’ या सर्वसमावेशक आराखड्याद्वारे करुणा (Compassion), परवडणारी घरे (Affordability), पुनर्वनीकरण (Reforestation), सक्षमीकरण (Empowerment) आणि कौशल्य विकास (Skilling) या मुद्द्यांना शहरी विकासाच्या केंद्रस्थानी आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
२०२५-२०२७ साठीच्या आपल्या दृष्टीकोनाबद्दल बोलताना क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष श्री. सुखराज नाहर म्हणाले, “आपल्या क्षेत्राने नेहमीच मुंबईचे आकाशरेखा निर्माण केली आहे. आता आपल्याला तिचा आत्माही घडवायचा आहे. ‘मिशन CARES’ ही आमची सरकार, गृहखरेदीदार, आणि आमच्या अंतःकरणाशी असलेली वचनबद्धता आहे- आपण सहानुभूतीने विकास करू, उद्देशपूर्ण डिजिटायझेशन करू, शहरांना हिरवे करण्यासाठी तातडीने काम करू, आणि प्रत्येक घर सन्मानपूर्वक व सहज उपलब्ध करून देऊ. हा फक्त भाषणाचा टप्पा नाही, तर प्रत्यक्ष, मोजता येईल असा परिणाम देण्याचा क्षण आहे.”
क्रेडाई-एमसीएचआयचे सचिव श्री. रुशी मेहता म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्र प्रत्येक बांधलेल्या चौरस फूटामध्ये जीवनाला स्पर्श करते. आम्ही फक्त सरकारला काही करण्याची विनंती करत नाही-आम्ही दाखवत आहोत की उद्योग चांगल्या धोरणांसाठी सहकार्य करायला तयार आहे, तंत्रज्ञान स्वीकारायला तयार आहे, आणि प्रत्येक कामगार, गृहखरेदीदार आणि नागरिकाला उन्नत करायला तयार आहे. ‘मिशन CARES’ ही करुणा, सर्वांसाठी प्रवेश, हिरवे क्षेत्र पुनर्संचयित करणे, नवोन्मेषातून आर्थिक वाढ साधणे आणि कौशल्य विकास यासाठीची आमची नव्याने वचनबद्धता आहे. हे पाच स्तंभ पुढील दोन वर्षांत सर्व सदस्यांच्या उपक्रमांना दिशा देतील.”
माजी अध्यक्ष श्री. डॉमिनिक रोमल यांनी नव्या नेतृत्वाला संपूर्ण पाठिंबा देत म्हटले, “मागील दोन वर्षांत, आम्ही सरकार, डेव्हलपर्स आणि नागरी समाज यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याचा पाया घातला आहे. श्री. नाहर यांच्या नेतृत्वाखाली क्रेडाई-एमसीएचआय बांधकामातच नव्हे तर मूल्याधिष्ठित कार्यातही नव्या उंचीवर जाईल.” नवे अध्यक्ष पद स्वीकारताना त्यांनी पुढे म्हटले, “आमचा कार्यकाळ म्हणजे आव्हानांना संधींमध्ये बदलणे आणि पारदर्शक, सर्वसमावेशक इकोसिस्टम उभारणे. ‘मिशन CARES’ ही त्या प्रवासाची नैसर्गिक प्रगती आहे पुढील रिअल इस्टेट युगासाठी एक नैतिक दिशादर्शक, जो वाढ आणि जबाबदारीला हातात हात घालून नेईल.”
माजी सचिव श्री. धवल अजमेरा म्हणाले, “आम्ही नेहमीच बांधणारे राहिलो आहोत; आता आम्ही उपचार करणारेही होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मिशन CARES’ ही केवळ दृष्टी नाही तर सरकार, नागरी समाज, आणि शहरी इकोसिस्टममधील प्रत्येक भागीदाराला सन्मान, समानता आणि शाश्वतता आणणारा भविष्यकाळ तयार करण्यासाठीची कृतीची हाक आहे. आपल्या क्षेत्रातील खरी बदल ही सातत्यपूर्ण आणि सुयोग्य धोरणात्मक हस्तक्षेपातून येते. ‘मिशन CARES’ आमची सर्वसमावेशकता, हरित विकास आणि तंत्रज्ञान स्वीकारणे हे प्रशासनाच्या चौकटीत समाविष्ट करण्याची दृढता वाढवते, जेणेकरून महत्त्वाकांक्षा कृतीत बदलू शकेल.”
सध्या मुंबईतील डेव्हलपर्सना प्रति चौरस मीटर सरासरी १५४,२२१ इतका मंजुरी खर्च करावा लागतो, जो देशातील सर्वाधिक आहे. प्रीमियम, शुल्क, आणि लेवीज हे एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५-४०% इतके असतात, ज्यामुळे गृहखरेदीदारांवर मोठा आर्थिक ताण येतो आणि प्रकल्प विलंबित होतात. क्रेडाई-एमसीएचआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केवल वलांभिया यांनी नमूद केले, “अनुपालन खर्च हा परवडणाऱ्या घरांचा एक मोठा अडथळा आहे. आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स, प्रीमियमचे सुयोग्यीकरण, आणि तंत्रज्ञान-आधारित मंजुरी यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रॉप टेकद्वारे एआय-आधारित प्रकल्प ट्रॅकिंग आणि ब्लॉकचेन-आधारित अनुपालन सक्षम होईल, ज्यामुळे प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल. कागदपत्रांपासून रिअल-टाईम सिस्टीमकडे जाणे आवश्यक आहे. प्रत्येक वाचवलेला रुपया हा प्रमाण, विश्वास आणि चांगली घरे बांधण्यासाठीचा रुपया आहे. कारण शेवटी चांगली घरे बांधणे म्हणजे एकत्रितपणे एक मजबूत भारत घडवणे आहे.”
CARES आराखड्याचे ५ स्तंभः
- बांधकाम कामगार, महिला, मुले आणि वंचित समुदायांसाठी सीएसआर आणि सामाजिक कल्याणाद्वारे करुणा.
- धोरण सुधारणा आणि नाविन्यपूर्ण विकास मॉडेल्सद्वारे परवडणारी घरे.
- बांधकामाचा कार्बन परिणाम कमी करण्यासाठी आणि शहरातील राहणीमान सुधारण्यासाठी पुनर्वनीकरण व शहरी हरितीकरण.
- पारदर्शकता, डिजिटल परिवर्तन, आणि आर्थिक वाढीसाठी प्रॉपटेकद्वारे सक्षमीकरण.
- दरवर्षी १०,००० + कामगारांचे कौशल्य विकास, जेणेकरून भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर वृद्धीला कुशल हात आणि सुरक्षित उपजीविका मिळेल.
पुढील २४ महिन्यांसाठी नेतृत्वाचा आराखडाः
- नवोपक्रम स्वीकारण्यासाठी प्रॉपटेक लॅबची स्थापना.
- परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठी ‘इनोव्हेशन सेल’ ची निर्मिती.
- एमएमआर क्षेत्रात मोबाईल स्किलिंग लॅब सुरू करणे.
- डेव्हलपमेंट प्रीमियम आणि स्टॅम्प ड्युटी सुयोग्य करण्यासाठी राज्याशी संवाद.
- प्रत्येक सदस्य प्रकल्पात ‘ग्रीन स्कोअरकार्ड’ चे समाकलन.
सीएसआर दृष्टीकोनातून, क्रेडाई-एमसीएचआयने दरवर्षी १००+ मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे, १,००० हून अधिक विद्यार्थ्यांना (विशेषतः मुलींना) शिष्यवृत्ती देण्याचे, बांधकाम कामगारांच्या कुटुंबांसाठी २५ डे-केअर केंद्रे चालवण्याचे, सर्व सदस्य साइटवर बालमजुरी शून्य ठेवण्याचे, आणि आपत्ती निवारण व सामाजिक कार्यक्रमांसाठी ₹१० कोटींपेक्षा जास्त निधी उभारण्याचे वचन दिले आहे.
परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या दृष्टीने, २०२६ पर्यंत सदस्य प्रकल्पांद्वारे १०,०००+ परवडणाऱ्या युनिट्सना प्रोत्साहन देणे, जलद मंजुरीसाठी धोरणात्मक सुधारणा विषयक ‘पॉलिसी व्हाईट पेपर’ प्रकाशित करणे, ‘अफोर्डेबल हाउजिंग इनोव्हेशन सेल’ ची निर्मिती करणे, आणि भाडे व कामगार गृहनिर्माणाबाबत शहरी संस्थांसोबत तीन प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करणे हे उद्दिष्ट आहे. हे सर्व गुणवत्ता, शाश्वतता किंवा नागरी सोयींमध्ये कोणतीही तडजोड न करता केले जाईल.
पर्यावरणीय वचनबद्धतेनुसार, २०२६ पर्यंत ५०+ शहरी ठिकाणी १० लाख झाडे लावणे, सर्व नवीन सदस्य प्रकल्पांत किमान हरित बफर समाविष्ट करणे, आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या भागीदारीत पाच नमुना जैवविविधता उद्याने निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे.
आर्थिक वाढ आणि नवोपक्रमाच्या दृष्टीने, ७०% सदस्य डेव्हलपर्स किमान एक प्रॉपटेक सोल्यूशन स्वीकारतील, २०+ स्टार्टअप्सना नव्या प्रॉपटेक लॅबमध्ये सामील केले जाईल, आणि १०+ आरईआयटी-रेडी मालमत्तांची यादी केली जाईल.
कौशल्य विकासाच्या दृष्टीने, क्रेडाई-एमसीएचआय दरवर्षी १०,०००+ बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देईल, २,५००+ ‘ग्रीन जॉब कार्ड’ जारी करेल, आणि तीन मोबाईल स्किलिंग लॅब तैनात करून एमएमआर क्षेत्रात हिरव्या बांधकाम, सुरक्षा, आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे ऑन-साइट प्रशिक्षण देईल.
२,२०० पेक्षा जास्त सदस्य डेव्हलपर्ससह, क्रेडाई-एमसीएचआयचा ‘चेंज ऑफ गार्ड’ २०२५-२०२७ हा एक निर्णायक अध्याय सुरू करतो असा अध्याय जिथे उद्योग केवळ आजच्या शहरांसाठीच नव्हे, तर उद्याच्या पिढ्यांसाठीही बांधणी करण्याचे वचन देतो, आणि ज्यात आर्थिक वाढ, पर्यावरणीय संरक्षण, आणि सामाजिक समता यांचे मोजता येणारे उद्दिष्टे आहेत.
क्रेडाई-एमसीएचआय विषयी
क्रेडाई-एमसीएचआय ही मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील रिअल इस्टेट डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था आहे. २,२०० हून अधिक अग्रगण्य डेव्हलपर्सचे सदस्यत्व असलेल्या या संस्थेने ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-वीरार, रायगड, नवी मुंबई, पालघर-बोईसर, भिवंडी, उरण-ड्रोणागिरी, शहापूर-मुर्बाड, तसेच अलीबाग, कर्जत-खलापूर-खोपोली आणि पेन येथे आपली युनिट्स स्थापन केली आहेत. एमएमआरमधील खासगी क्षेत्रातील डेव्हलपर्ससाठी शासनमान्यता असलेली ही एकमेव संस्था असून, उद्योगाच्या संघटित आणि प्रगत विकासासाठी कटिबद्ध आहे.
#CREDAIMCHI #CredaiMCHIChangeOfGuard2025 #CMOMaharashtra #DevendraFadnavis #PresidentCredaiMCHI2025 #SukhrajNaharPresidentCREDAIMCHI2025

Be the first to comment on "क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून श्री. सुखराज नाहर यांची १८ वी नियुक्ती -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत झालेला ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा"