बॉलिवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते नेक्सस मॉलमधील कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचे उद्घाटन

जागतिक दर्जाच्या वातावरणात लक्झरी शॉपिंगचा मिळणार अनुभव

नवी मुंबई, 29 जून 2025 (GPN): भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सतर्फे आज नवी मुंबईतील नेरुळ येथील नेक्सस सीवुड्स मॉलमध्ये आपल्या नव्या कोऱ्या शोरूमचे उद्घाटन केले. बॉलिवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या वैविध्यपूर्ण कलेक्शन्समधील अनेकविध डिझाइन्सचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उत्साही गर्दी लक्षणीय प्रमाणात जमली होती. सर्व उपस्थितांचे स्वागत खूप छान पद्धतीने करण्यात आल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या प्रसंगाने निर्माण झालेल्या उत्साह आणि अपेक्षांचे हे प्रतिबिंब होते.

या कार्यक्रमाला उपस्थितांशी संवाद साधताना बॉलिवूड अभिनेत्री तबू म्हणाल्या, “कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनासाठी येथे उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-केंद्रित मूल्यांवर आधारित असलेल्या या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला खात्री आहे की आपले ग्राहक केवळ उत्कृष्ट सेवाच नव्हे, तर विविध प्रकारच्या दागिन्यांच्या कलेक्शन्सचेही मनापासून स्वागत करतील.”

नवीन शोरूमच्या उद्घाटनाबद्दल बोलताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले, “नवी मुंबईतील आमच्या कल्याण ज्वेलर्सच्या नव्या कोऱ्या शोरूमच्या उद्घाटनासह आमचे ध्येय हे आमच्या ग्राहकांच्या खास गरजा पूर्ण करणारी एक व्यापक परिसंस्था निर्माण करणे आणि त्यांच्या खरेदी अनुभवाला एका नवीन पातळीवर नेणे हे आहे. सतत प्रगती करत राहणे, जागतिक दर्जाचे वातावरण देताना विश्वास आणि पारदर्शकता या ब्रँडच्या मुख्य मूल्यांना कायम ठेवणे यासाठी आम्ही बांधील आहोत. कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही उत्कृष्ट दर्जा आणि अतुलनीय सेवा यांवर भर देत देखण्या व वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांच्या विस्तृत श्रेणीसह ग्राहकांना समाधान देत राहू.”

उद्घाटनाच्या निमित्ताने, कल्याण ज्वेलर्सने 10 ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर* 0.5 ग्रॅम सोने मोफत देण्याची घोषणा केली आहे. जोडीला बाजारातील सर्वात कमी असलेला कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट दर सर्व शोरूममध्ये समान असून तोही या दागिन्यांच्या खरेदीवर लागू होणार आहे. ही सवलत मर्यादित कालावधीसाठीच लागू असेल.

ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सचे शुद्धतेची खात्री, कायमस्वरूपी मोफत देखभाल सेवा, दागिन्यांची तपशीलवार माहिती, तसेच पारदर्शक एक्सचेंज आणि बायबॅक धोरणांची हमी देणारे 4-स्तरीय अ‍ॅश्युरन्स सर्टिफिकेट मिळेल. हे प्रमाणपत्र ब्रँडच्या आपल्या निष्ठावान ग्राहकांप्रती असलेल्या उत्कृष्ट सेवा आणि बांधिलकीचे प्रतीक आहे.

या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या लोकप्रिय हाउस ब्रँड्सची देखील भरपूर विविधता असेल. त्यामध्ये मूहूर्त (लग्नासाठीचे खास दागिने), मुद्रा (हस्तकलेने बनवलेले प्राचीन धाटणीचे दागिने), निमह (देऊळ शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), जिया (सॉलिटेअरसारखे डायमंड दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी डायमंड्स), अंतरा (लग्नासाठी डायमंड्स), हेरा (रोजच्या वापरातील डायमंड्स), रंग (मूल्यवान रत्नदागिने) आणि अलिकडेच सादर झालेला लीला (रंगीत रत्न व हिऱ्याचे दागिने) यांचा समावेश असणार आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बॉलिवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते नेक्सस मॉलमधील कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचे उद्घाटन"

Leave a comment

Your email address will not be published.


*