बॉलिवूड अभिनेत्री तबू करणार कल्याण ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन

नवी मुंबईतील नेक्सस मॉलमध्ये २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता करणार उद्घाटन

नवी मुंबई, 28 जून 2025 (GPN): भारतातील आघाडीच्या व विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज नवी मुंबईतील नेक्सस सीवुड्स मॉलमध्ये आपल्या नव्या शोरूमच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते रविवार, 29 जून रोजी सायंकाळी 5:00 वाजता या नवीन दालनाचे उद्घाटन होणार आहे. हे दालन महाराष्ट्रातील कल्याण ज्वेलर्सचे 24वे शोरूम असेल. या नव्या शोरूममध्ये जागतिक दर्जाच्या वातावरणात विविध प्रकारच्या देखण्या दागिन्यांच्या भव्य कलेक्शन्सचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

श्री.रमेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक,कल्याण ज्वेलर्स म्हणाले,“कंपनी म्हणून आम्ही अनेक उल्लेखनीय टप्पे गाठले असून ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी मजबूत परिसंस्था तयार करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. महाराष्ट्र ही कल्याण ज्वेलर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि गेल्या काही वर्षांत आम्ही येथे आमचे स्थान धोरणात्मक पद्धतीने वाढवले आहे. नवी मुंबईतील हे आगामी शोरूम आमच्या बाजारपेठेतील स्थानाला अधिक बळकट करेल आणि आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी आणखी सोय आणि उपलब्धता प्रदान करेल असा आम्हाला विश्वास आहे.”

या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या लोकप्रिय हाउस ब्रँड्सची देखील भरपूर विविधता असेल. त्यामध्ये मूहूर्त (लग्नासाठीचे खास दागिने), मुद्रा (हस्तकलेने बनवलेले प्राचीन धाटणीचे दागिने), निमह (देऊळ शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), जिया (सॉलिटेअरसारखे डायमंड दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी डायमंड्स), अंतरा (लग्नासाठी डायमंड्स), हेरा (रोजच्या वापरातील डायमंड्स), रंग (मूल्यवान रत्नदागिने) आणि अलीकडेच सादर झालेला लीला (रंगीत रत्न व हिऱ्याचे दागिने) यांचा समावेश असणार आहे.

#Kalyan #KalyanJewellers #Tabu #KalyanBrandAmbassador

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बॉलिवूड अभिनेत्री तबू करणार कल्याण ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन"

Leave a comment

Your email address will not be published.


*