आजच्या युगातील आर्थिक फसवणुकीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने पेहचानकॉन 3.0 कॅम्पेनसाठी केली कुणाल रॉय कपूरशी हातमिळवणी.

Bank of Baroda

मुंबई, 25 एप्रिल, 2024 (GPN): बँक ऑफ बडोदा ही भारतातील एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून त्यांनी आज #PehchaanCon 3.0 या बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीबद्दल जागरुकता निर्माण करणाऱ्या अभियानाची घोषणा केली. या आधीच्या दोन यशस्वी पर्वांचा विचार करत, या नव्या कॅम्पेनमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने तयार केलेल्या डीपफेक स्कॅमसारख्या नव्या युगातील आर्थिक फसवणुकीबद्दल जागरुकता निर्माण करणे हे या नव्या कॅम्पेनचे उद्दिष्ट आहे. या नव्या पद्धतींचा वापर करून अत्यंत सजग ग्राहकांचीही फसवणूक होण्याची शक्यता असते.

#PehchanCon कॅम्पेनच्या तिसऱ्या टप्प्यात बँकेने दोन जाहिराती प्रदर्शित केल्या आहेत. या दोन्ही जाहिरातींमध्ये कुणाल रॉय कपूर आहे. विनोद व माहितीपूर्ण कंटेन्ट यांची सांगड घालून हा व्हिडियो तयार करण्यात आला आहे. आजच्या जगात कुणीही म्हणजे आपल्यातील सर्वात चलाख, ताकदवान व्यक्तीचीही कशी फसवणूक होऊ शकते, हे या व्हिडिओमध्ये दर्शवण्यात आले आहे. नव्याने आलेले डीपफेक तंत्रज्ञान वापरून कुटुंबातील सदस्य/जवळच्या मित्राचा मुखवटा भासवून दिशाभूल केली जाऊ शकते किंवा डिलिव्हरी एजंट असल्याचे भासवून ऑनलाइन खरेदीदारांकडून ओटीपी मागितला जाऊ शकतो. परिणामी, त्या व्यक्तीचा वैयक्तिक डेटा हॅक केला जाऊ शकतो. अशा अनेक पद्धतींनी भामटे लोकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करतात.

अशा प्रकारचा हल्ला कोणावरही होऊ शकतो, हेच या जाहिरातीतून दाखविण्यात आले आहे. कुणाल रॉय कपूर हा एक शांत स्वभावाचा आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारा डॉक्टर असतो. त्याचे रुग्णही त्याला मोकळेपणी सगळ्या गोष्टी सांगतात.

भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीपासून त्यांचे संरक्षण कसे करावे याचा तो विचार करत असतो. सजग, सतर्क राहून आणि फसवणूक/फसवणूक करणारे, भामटे यांना ओळखून ग्राहक त्यांची, स्वतःची तसेच त्यांच्या गोपनीय आर्थिक माहितीचे संरक्षण करू शकतात आणि सुरक्षित बँकिंग व शॉपिंगचा अनुभव घेऊ शकतात, यावर या जाहिरातीत भर देण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री. लाल सिंग म्हणाले, “लोकांना लुबाडण्याच्या उद्दिष्टाने होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकींचे प्रमाण वाढले आहे आणि हा धोका कायमच असतो. त्याचप्रमाणे, नव्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे आर्थिक फसवणूक करणाऱ्यांच्या कार्यपद्धतीतही वेगाने बदल होत आहे. म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाने अत्यंत सतर्क असणे गरजेचे आहे आणि संभाव्य फसवणूक/स्कॅम ओळखण्यास शिकले पाहिजे. बँक ऑफ बडोदाचे पेहचानकॉन कॅम्पेन ग्राहकांनी सतर्क राहण्यावर भर देते, जेणेकरून सायबरगुन्हेगारांनी निर्माण केलेल्या धोक्यापासून आपल्या कष्टाने कमवलेल्या पैशांच्या सुरक्षिततेची खात्री होऊ शकेल.”

तात्पर्य, जागरुक रहा, सतर्ग राहा या संदेशाची व्याप्ती वाढविणे हे या कॅम्पेनचे उद्दिष्ट आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहू शकता:
PehchaanCon Film #1 आणि PehchaanCon Film #2.
#PehchaanCon 3.0 कॅम्पेन हे मल्टि-चॅनल कॅम्पेन असून दूरचित्रवाणी, रेडिओ, डिजिटल आणि आउटडोअर प्लॅटफॉर्मवरून राबविण्यात येईल.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "आजच्या युगातील आर्थिक फसवणुकीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने पेहचानकॉन 3.0 कॅम्पेनसाठी केली कुणाल रॉय कपूरशी हातमिळवणी."

Leave a comment

Your email address will not be published.


*