बँक ऑफ बडोदाच्या बडोदा किसान पखवाडाच्या 6व्या पर्वाची सांगता, 4,65,000 शेतकऱ्यांशी साधला संवाद

Bank of Baroda (BoB) Logo

या महोत्सवात बँकेने रु.2,200 कोटींहून अधिक रकमेची कृषी कर्जे केली मंजूर

मुंबई12 जानेवारी, 2024 (GPN)बँक ऑफ बडोदा (बँक) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एका आघाडीच्या बँकेच्या बडोदा किसान पखवाडा या शेतकऱ्यांना जोडणाऱ्या वार्षिक उपक्रमाच्या 6व्या पर्वाची यशस्वी सांगता झाली. कृषी महोत्सवादरम्यानबँकेने देशभरातील 465,000 हून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि एकूण रु.2,200 कोटींहून अधिक रकमेची कृषी कर्जे मंजूर केली.

कृषी क्षेत्रातील ग्राहकांना सेवा देणाऱ्या बँकेच्या देशभरातील निमशहरी आणि ग्रामीण शाखा आणि काही मेट्रो आणि शहरी शाखांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या पंधरवड्यात बँकेने शेतकरी सभाचौपालशेतकरी मेळावे आणि आरोग्य शिबिरांची मालिका (माती प्राणी आणि शेतकरी यांच्यासाठी) आयोजित केल्या होत्या.

या प्रसंगी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री. अजय के. खुराना म्हणाले, बडोदा किसान पखवाडाच्या 6 व्या पर्वाची सांगता यशस्वी झाल्याचे घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणूनबँक ऑफ बडोदा विविध प्रकारच्या ऑफर्ससह भक्कम कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि भारतीय शेतकरी समुदायाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी पत वाढवण्याच्या वचनबद्धतेसह दृढ आहे.

या पंधरवड्यात बँकेने घर-घर केसीसी अभियान” या किसान क्रेडिट कार्ड अभियानाचा समावेश असलेल्या विविध उपक्रमांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे कृषी उत्पादनेयोजना/ऑफर आणि बॅंक ऑफ बडोदाने उपलब्ध केलेल्या डिलिव्हरी चॅनल्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. भारत सरकारने सुरू केलेल्या ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एआयएफ)ॲनिमल हसबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (एएचआयडीएफ), प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय)पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइस स्कीम (पीएम-एफएमई) अशा आत्मनिर्भर भारत योजनांचा प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमामुळे मदत झाली.

बँक ऑफ बडोदाने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कृषी क्षेत्राला रु.1,30,694 कोटी इतके कर्ज दिले. गेल्या वर्षाच्या तुलनेने ही 13.7% वाढ आहे.

बँक ऑफ बडोदाच्या कृषी कर्जांसाठी अर्ज करण्यासाठी ग्राहक https://bit.ly/AGRILoans या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाच्या बडोदा किसान पखवाडाच्या 6व्या पर्वाची सांगता, 4,65,000 शेतकऱ्यांशी साधला संवाद"

Leave a comment

Your email address will not be published.


*