प्रमेरिका जीवन विम्याने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दृढनिश्चय आणि चिकाटी साजरी करणारी, “धिस इज माय क्लाइंब” अशी नवीन ब्रँड मोहीम सुरू केली

Pramerica Life Insurance
  • “धिस इज माय क्लाइंब” (मी पुढे जातच राहणार) हे प्रमेरिका जीवन विम्याचा अभिव्यक्तीपर शब्दप्रयोग आहे. तो प्रमेरिका जीवन विम्याचे ग्राहक, भागीदार आणि कर्मचार्‍यांचे दैनंदिन जीवन प्रदर्शित करतो. तो त्यांच्या जीवनातली चिकाटी आणि दृढनिश्चय साजरा करतो.
  • ही ब्रँड मोहिम सोशल आणि डिजिटल मीडियावर सुरू केली आहे. तिचे उद्दिष्ट प्रमेरिका जीवन विम्याचे ग्राहक, भागीदार आणि कर्मचाऱ्यांशी भावनिक पातळीवर जुडणे आहे. या मोहिमेद्वारे हे प्रदर्शित केले आहे की प्रमेरिका जीवन विम्याचे ग्राहक, भागीदार आणि कर्मचारी त्यांची ध्येय गाठत असताना आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास धडपडत असताना ब्रँड त्यांच्या अनोख्या संघर्षात त्यांच्या पाठीशी उभा आहे.

मुंबई, 9 जानेवारी 2024 (GPN): प्रमेरिका  जीवन  विमा (Pramerica Life Insurance) ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या जीवन विम्यापैकी एक आहे. त्यांनी आज ““धिस इज माय क्लाइंब”” ही प्रेरणादायी ब्रँड मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. या प्रभावी मोहिमेत दोन लघुपटांचा समावेश आहे. आपला वैयक्तिक जीवन प्रवास हा अनेक आकांक्षा आणि जीवनातले बदल सामावून घेण्याच्या चिकाटीने भरलेला असतो. अशा विविधतेने नटलेला हा प्रवास साजरा करणे हे या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम पारंपारिक विपणन दृष्टिकोनाला बाजूला सारते आणि मानवी अनुभवाच्या भावनिक गाभ्याचा शोध घेते. ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तींशी संवाद साधते.

प्रमेरिका जीवन विम्याचे एमडी आणि सीईओ पंकज गुप्ता (Pankaj Guptaम्हणाले, “जसे प्रत्येक चढाव चढतांना अनन्य आव्हाने असतात आणि त्यासाठी अटल निर्धाराची आवश्यकता असते, तसेच जीवनाच्या प्रवासात देखील आव्हाने येतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी खंबीर निर्धार असावा लागतो.”

“‘धिस इज माय क्लाइंब’ या मोहिमेद्वारे, आम्ही प्रत्येक व्यक्तीचे उद्दिष्ट, बांधिलकी आणि जबाबदारीचे वेगवेगळे पैलू साजरे करतो. आम्हाला आमच्या ग्राहकांच्या जीवनात एक मजबूत भागीदार बनायचे आहे, ज्यावर ते अवलंबून राहू शकतात. प्रत्येक चढाईत, मग ती मोठी असो किंवा लहान असो, एका बळकट साथीदाराची गरज असते. आम्ही आमच्या सर्व भागधारकांसाठी तसाच मजबूत साथीदार असण्याबाबत बांधील आहोत.”

दोन आकर्षक लघुपटांच्या माध्यमातून ही मोहीम उलगडत जाते. पहिला लघुपट (first film) एका वडिलांचा  प्रवास आणि आकांक्षा यांचे एक सर्वसामान्य मिळतेजुळते चित्र रेखाटतो. आपण त्या पित्याची बांधिलकी पाहतो. ते आपल्या मुलाच्या महत्त्वाकांक्षा जोपासण्यासाठी स्वतःची स्वप्ने आणि इच्छा कशी बाजूला ठेवतात हे बघतो. प्रत्येक लहान-मोठा अडथळा त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी एक पाऊल बनते. प्रत्येक अडथळा एक चढण असते जे ते दृढनिश्चयाने आणि शांतपणे त्याग करत सर करतात. ते प्रत्येक पालकांचे प्रतिनिधित्व करतात जे स्वतःची स्वप्ने बाजूला सारून आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करतात. ते त्यांच्या यशात आनंद आणि त्यांच्या संघर्षात सामर्थ्य शोधतात.

दुसरा लघुपट (second film) प्रेक्षकांना संरक्षण  कर्मचार्‍यांच्या कुटुंबाच्या नजरेतून भावस्पर्शी प्रवास करवतो. हा संरक्षण कर्मचारी जवाबदारी आणि समर्पणाची उंची गाठत असतो. त्यावेळेस त्यांचे कुटुंब त्यांना आपला खंबीर पाठिंबा देत असतात आणि त्या कुटुंबाला आपल्या संरक्षण कर्मचारी असलेल्या सदस्याचा अभिमान वाटत असतो. प्रमेरिका जीवन विमा ही संरक्षण समुदायाला सेवा देणारी बाजारपेठेतील अग्रणी जीवन विमा कंपनी आहे. तो त्यांचा प्रमुख व्यवसाय चॅनल आहे. हा लघुपट प्रमेरिका जीवन विमाच्या भावनेशी लगेच जुळतो. ही मोहीम केवळ संदेश देत नाही तर ती रक्षण करणाऱ्या वीरांना मनापासून दिलेली श्रद्धांजली देखील आहे. त्यांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये त्यांच्या आणि त्यांच्या प्रियजनांसोबत राहण्याचे वचन आहे. प्रत्येक लघुपटाच्या शेवटी ब्रँडचा हळूच समावेश करण्यात आला आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या चढण चढण्याच्या संघर्षात भागीदार होण्यासाठी प्रमेरिका जीवन विम्याची बांधिलकीला बळकट करते.

ही मोहीम ब्रँडच्या सोशल मीडिया हँडल FacebookInstagramYouTubeLinkedIn वर सुरू करण्यात आली असून ती 6 ते 8 आठवड्यांच्या कालावधीसाठी विविध मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जोरात चालवली जाईल. ग्राहक, भागीदार आणि कर्मचारी – या आपल्या प्रमुख भागधारकांशी मिळून काम करण्याची कंपनीची योजना आहे. त्यासाठी कंपनी परस्परसंवादी उपक्रम आणि सोशल मीडिया संभाषणाचा वापर करणार असून मोहिमेचा उद्देश आणि चिकाटीचा संदेश देत त्याभोवती एक उत्साही समुदाय तयार करणार आहे.

प्रमेरिका जीवन विम्याचे मुख्य व्यवसाय अधिकारी कार्तिक चक्रपाणी (Karthik Chakrapani) म्हणाले, “‘धिस इज माय क्लाइंब’चे सौंदर्य त्याच्या व्यापक दृष्टीकोनांमध्ये आहे.”एक कथा ही देशाच्या सार्वभौमत्वासाठी कार्यरत असलेल्या संरक्षण कर्मचार्‍यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक भावनिष्ठेची आहे तर दूसरी कथा ही आपल्या मुलाच्या भविष्यासाठी वडिलांच्या दृढनिश्चयाची आहे. प्रत्येक कथा वेगवेगळी आहे आणि विशिष्ट आहे. आम्ही दर्शकांना या प्रेरणादायी प्रवासात सहभागी होण्यासाठी, त्यांच्यामधला समान धागा शोधून स्वतःचे उद्देश पूर्ण करण्यासाठी आणि मानवी चैत्यन्य साजरा करण्यात आमच्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.”

ही मोहीम पब्लिस वर्ल्डवाइड इंडियाने कल्पकतेने विकसित केली. ती श्री.परितोष श्रीवास्तव- मुख्य कार्यकारी अधिकारी, ओइन्द्रिला रॉय- व्यवस्थापकीय संचालक, सृजन शुक्ला आणि प्रतीब रवि- क्रिएटिव्हचे प्रमुख यांच्या नेतृत्वात विकसित केली गेली आहे. ते आकर्षक कथा गुंफण्यासाठी नावाजलेले आहेत. त्यांनी या कथांमध्ये मानवी दृढनिश्चय आणि चिकाटी खूप यशस्वीपणे टिपले आहे. हे यश त्यांच्या सामूहिक कौशल्य आणि समर्पणामुळे शक्य झाले आहे.

“धिस इज माय क्लाइंब” मोहीम प्रभावी आणि भावनेने ओथंबून वाहणारा अनुभव आहे. तो अनुभव आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष असतात आणि आपल्या सर्वांमध्ये आपल्या वैयक्तिक शिखरावर पोहोचण्याची ताकद असते.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "प्रमेरिका जीवन विम्याने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दृढनिश्चय आणि चिकाटी साजरी करणारी, “धिस इज माय क्लाइंब” अशी नवीन ब्रँड मोहीम सुरू केली"

Leave a comment

Your email address will not be published.


*