गॅरंटीड लाइफ इन्शुरन्स प्लॅनसह (हमी विमा योजनेसह) आजचा दिवस साजरा करा आणि उद्याचा दिवस सुरक्षित करा कार्तिक चक्रपाणी, मुख्य व्यवसाय अधिकारी, प्रामेरिका लाइफ इन्शुरन्स, यांचे द्वारा

Karthik Chakrapani, Chief Business Officer, Pramerica Life Insurance

Pramerica Life Insurance

मुंबई, डिसेम्बर, 2023 (GPN):- सणासुदीचा काळ आनंदमय वातावरण निर्माण करतो आणि अशा वेळेस आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तींना काय भेट करावे हा विचार मनात घोळू लागतो. आपल्याला अशी भेटवस्तू द्यायची असते जी अर्थपूर्ण असेल, उपयोगी असेल आणि त्या सोबतच आपले प्रेम आणि काळजी व्यक्त करेल. चॉकलेट्स आणि गॅझेट्स तात्पुरता आनंद देतात. मात्र एक भेटवस्तू अशी आहे जी अतिशय प्रभावी असून कायम टिकणारा परिणाम करते. ती भेटवस्तू म्हणजे जीवन विम्याची भेट. जीवन विम्याला बर्‍याचदा गंभीर गरज म्हणून पाहिले जाते. पण आपण तो दृष्टीकोन बदलू शकतो. त्याला प्रेम आणि आर्थिक सुरक्षिततेच्या शक्तिशाली प्रतीकात बदलले जाऊ शकते. “मला तुमच्या भविष्याची काळजी आहे आणि काहीही झाले तरी मी तुमचे संरक्षण करण्यासाठी येथे आहे” असे म्हणणारी ही भेटवस्तू आहे.

कार्तिक चक्रपाणी, मुख्य व्यवसाय अधिकारी, प्रामेरिका लाइफ इन्शुरन्स सांगतात की  जीवन विमा योजनेला सणासुदीची उत्कृष्ट आणि परिपूर्ण भेटवस्तू मानण्याची आकर्षक कारणे आहेत. ती कोणती ती खाली बघूया:-

दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी हमी परतावा:

आयुष्य म्हणजे अनेक महत्त्वपूर्ण उद्दिष्टे गाठण्याचा प्रवास असतो. त्यात मुलामुलीचे उच्च शिक्षण, स्वप्नगत लग्न सोहळा, आरामदायी निवृत्ती इत्यादी मैलाचे दगड असतात. पारंपारिक मुदत ठेवी कदाचित काही संरक्षण देऊ शकतात, परंतु वाढती महागाई बघता त्यांचा परतावा बरेचदा कमी पडतो. त्यामुळे भविष्यातील खर्चाशी ताळमेळ राखणे कठीण होते. अशा परिस्थितीत हमी परताव्यासह असलेल्या जीवन विमा योजना कामी येतात. बाजारात चढउतार असूनही या योजना अंदाजयोग्य उत्पन्न देतात. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींकडे त्यांची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक संसाधने आहेत याची खात्री होते.

 

हमी विमा योजना समजून घेणे:-

हमी विमा योजना जीवन विम्याची सुरक्षितता आणि परताव्याची हमी अशी दोन्ही मिळून एकत्रित आहे. तुमच्या प्रीमियमचा एक भाग कमी-जोखीम साधनांमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या लाभार्थींना नियमित व्याज मिळत राहते.

मुदत ठेवींच्या पुढे असलेले एक पाऊल:-

मुदत ठेवी काही सुरक्षा देतात, परंतु त्यामध्ये लवचिकता आणि गतिमानता नसते. हमी विमा योजनेत अंदाजे कमाईचा प्रवाह असतो. तो पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीदरम्यान दिला जातो. तो नियमित उत्पन्न देणाऱ्या एखाद्या दुसऱ्या उत्पन्नाप्रमाणे असतो. या नियमित मिळणाऱ्या रोख उत्पन्नामुळे बरीच मदत होते. त्यातून तुम्ही तुमचा मासिक खर्च करू शकता. कर्ज फेडू शकता किंवा पुढे आणखी गुंतवणूकदेखील करू शकता. तुम्हाला संपूर्ण मुदतीदरम्यान नियमित उत्पन्नाचा प्रवाह सुरू राहतो. तसेच शेवटी एकरकमी पेमेंटचीही हमी आहे. हा मॅच्युरिटी बेनिफिट (परिपक्वता लाभ) तुमच्या सेवानिवृत्तीच्या बचतीसाठी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी किंवा जीवनाच्या इतर कोणत्याही दीर्घकालीन उद्दिष्टासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो. जीवन विमा प्रीमियम असल्यास त्या रकमेवर कर कपात लागू होते. त्यामुळे तुमचा आर्थिक भार कमी होतो. अनेक योजना सानुकूल करण्यायोग्य रायडर्सदेखील देतात, जसे की गंभीर आजार कव्हर करणे किंवा अपघाती मृत्यू झाल्यास लाभ देणे. त्यामुळे यातून अतिरिक्त संरक्षणदेखील प्राप्त होते. (विमा रायडर हे मूलभूत विमा पॉलिसीमध्ये समायोजन किंवा अॅड-ऑन असतात. रायडर्सना मूलभूत पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कव्हरेजवर अतिरिक्त लाभ देण्यासाठी डिझाइन केलेले असते.)

हमी विमा योजनेचे प्रमुख फायदे:-

  1. या योजना गुंतवलेल्या रकमेवर हमखास परतावा देतात आणि प्राप्तकर्त्यासाठी स्थिरता आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करतात.
  2. एखादी दुर्दैवी घटना झाल्यास योग्य विमा योजना विमाधारकाला संरक्षण देते.
  3. योजना आणि कर कायद्यांनुसार,या विमा योजना कर लाभ देतात,ज्यामुळे प्राप्तकर्त्यासाठी हा एक मौल्यवान गुंतवणूक पर्याय बनतो.
  4. हमी परताव्यासह नवीन युगातील जीवन विमा योजना लवचिक प्रीमियम पेमेंट पर्याय आणि पेमेंट संरचनांसह येतात,ज्यामुळे विमाधारक त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार प्रीमियम पेमेंटची रक्कम आणि वारंवारता व पेमेटची पद्धत निवडू शकतात.
  5. या योजना दीर्घकालीन बचतीच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत,त्या प्राप्तकर्त्याला कालांतराने संपत्ती निर्माण करण्यास मदत करतात.
  6. हमी विमा योजना भेट म्हणून देऊन,तुम्ही प्राप्तकर्त्याला शिस्तबद्ध बचत आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची सवय लावण्यासाठी प्रोत्साहित करता.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "गॅरंटीड लाइफ इन्शुरन्स प्लॅनसह (हमी विमा योजनेसह) आजचा दिवस साजरा करा आणि उद्याचा दिवस सुरक्षित करा कार्तिक चक्रपाणी, मुख्य व्यवसाय अधिकारी, प्रामेरिका लाइफ इन्शुरन्स, यांचे द्वारा"

Leave a comment

Your email address will not be published.


*