एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने एनकेजीएसबी सहकारी बँकेशी धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून केले आपले स्थान भक्कम

Ages Federal Life Insurance

एनकेजीएसबी सहकारी बँक लिमिटेडशी झालेली भागीदारी बँकाश्युरन्सवर भर देऊन विमा उत्पादनांचा प्रसार व विक्री साध्य करणार.

  • ह्या सहयोगामुळे एएफएलआयची वितरण व्याप्ती वाढणे अपेक्षितव्यवसाय विस्तारात मोठे योगदान दिले जाणार.

मुंबई, 20 डिसेंबर, 2023 (GPN): एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स ह्या भारतातील सर्वांत प्रतिष्ठित खासगी आयुर्विमा कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या कंपनीनेआजएनकेजीएसबी को – ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडबरोबर, भागीदारीची घोषणा केली

एनकेजीएसबी ही आघाडीची बहुराज्यीय सहकारी बँक आहे. ह्या भागीदारीमुळे एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सच्या वितरण जाळ्याचा लक्षणीय विस्तार होणार आहे. आयुर्विमा उत्पादने व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ह्या भागीदारीमागे आहे.

भारतातील आघाडीच्या 10 सर्वोत्तम सहकारी बँकांमध्ये गणल्या जाणाऱ्या एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या आज महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये मिळून 104 शाखा आहेत. एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत सहयोग केल्यामुळे एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सची व्याप्ती व वितरण क्षमता वाढल्या आहेत. हा सहयोग आयुर्विम्याचे लाभ ग्राहकांच्या अधिक जवळ आणण्यास तसेच सर्व समुदायांतील आर्थिक सुरक्षितता जोपासण्यास सज्ज आहे.

एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीविघ्नेश शहाणे ह्या भागीदारीबद्दल म्हणाले,“आयुर्विम्याची उपलब्धता अधिक व्यापक करण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेचा भाग म्हणून एनकेजीएसबी बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला अतीव आनंद होत आहेसर्वसमावेशक आर्थिक संरक्षण पुरवण्याच्या आणि बाजारपेठेतील स्थान आणखी भक्कम करण्याच्या आमच्या बांधिलकीशी हा सहयोग संलग्न आहेएनकेजीएसबी कोऑपरेटिव्ह बँक आपल्या भक्कम ग्राहकवर्गासाठी  विस्तृत नेटवर्कसाठी ओळखली जातेत्यामुळे एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सच्या वितरण धोरणाला एक मोलाचे अंग प्राप्त झाले आहेह्या सहयोगाच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांच्या सामूहिक बलस्थानांचा लाभ घेण्याचे आणि खात्रीशीर आयुर्विमा उत्पादनांच्या शोधात असलेल्या ग्राहकांना तो लाभ मिळवून देण्याचेउद्दिष्ट आमच्यापुढे आहे.”

एनकेजीएसबी को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चेअरपर्सन सौहिमांगी नाडकर्णी म्हणाल्या,“ह्या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांपुढे खुल्या झालेल्या शक्यतांमुळे आमचा उत्साह वाढला आहेएजेस फेडरल लाइफ इन्शुरन्ससोबत सहयोग केल्यामुळेवित्तीय उत्पादने  सेवांची अधिक विस्तृत श्रेणी ग्राहकांना देऊ करण्याची संधी आम्हाला मिळाली आहेआमच्या मोलाच्या ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्याप्रती आमची बांधिलकीही ह्यामुळे अधिक दृढ झाली आहे.”

नवोन्मेष, ग्राहक समाधान आणि विमा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र विस्तारणे ह्यांप्रती एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सची बांधिलकी ह्या सहयोगातून अधोरेखित होते. दरम्यान, एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने  FY 2022-23मध्ये 114 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा नफा 21% अधिक आहे. ह्या खासगी आयुर्विमा कंपनीने सलग 11व्या वर्षी नफ्याची नोंद केली आहे. 2022-23 ह्या आर्थिक वर्षात कंपनीच्या एकूण प्रीमियममध्ये 5 टक्क्यांनी वाढ होऊन तो 2,052 कोटी रुपयांवर पोहोचला. पुढील 5 वर्षात आपली विक्री व उत्पन्न (टॉपलाइन) 40 टक्के सीएजीआरने वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही कंपनीने आखली आहे.Ends

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने एनकेजीएसबी सहकारी बँकेशी धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून केले आपले स्थान भक्कम"

Leave a comment

Your email address will not be published.


*