श्वसनाच्या त्रासाने ग्रासलेल्या 79 वर्षांच्या रुग्णावर यशस्वी पीटीएमसी शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या अनुभवी डॉक्टरांमुळे आणि सांघिक प्रयत्नांमुळे रुग्णाला मिळाले जीवदान

Wockhardt Hospitals, Mumbai Central

मुंबई, 19 जुलै 2023 (GPN):  मुंबई सेंट्रल येथिल वोक्हार्ट रुग्णालयात 79 वर्षांचा रुग्ण आले  होते. श्री.आचरेकर ( बदललेले नाव) यांना श्वसनाच्या त्रासाने ग्रासले होते. दोन महिन्यांपासून त्यांना कफाचा त्रास होत होता. फुफ्फुसाशी संबंधित विकारांचे तज्ज्ञ डॉ. सुलेमान लधानी यांनी आचरेकरांची तपासणी केली होती.  आचरेकरांना मित्रल स्टेनोसिस विकार झाल्याचे त्यांना दिसून आले. या विकारामध्ये तंतूमय पेशी जमल्यामुळे हृदयाची झडप निमुळती होत जाते. आचरेकरांना हृदयविकारही आहे आणि क्रोनिक ऑबस्ट्रक्टीव्ह पल्मोनरी डिसिजचाही त्रास आहे. क्रोनिक ऑबस्ट्रक्टीव्ह पल्मोनरी डिसिजमुळे शरीरात ऑक्सिजन पोहोचविणार्‍या छोट्या-छोट्या वायू तंत्रामध्ये गडबड होते ज्यामुळे श्वास घेणे अवघड होऊ लागते. हा फुफ्फुसाशी निगडीत विकार आहे.

श्री.आचरेकर यांची मित्रल स्टेनोसिसची समस्या दूर करण्यासाठी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. परीन संगोई यांचा सल्ला घेण्यात आला. डॉ.संगोई यांनी श्री.आचरेकर यांची बारकाईने तपासणी केली आणि त्यांच्यावर पर्क्युटॅन्युअस ट्रान्सव्हेनस मित्रल कमिस्युरोटोमी  (पीटीएमसी)  नावाची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. या शस्त्रक्रियेमुळे हृदयाच्या झडपेची निमुळती झालेली वाट रुंद होण्यास मदत होते ज्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळित होतो. डॉ.संगोई यांनी आचरेकरांवर ही शस्त्रक्रिया केली ज्यानंतर त्यांना होत असलेला श्वसनाचा त्रास बराच कमी झाला.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. परीन संगोई यांनी बोलताना म्हटले की, “रुग्णालयात आलेले श्री.आचरेकर यांची तपासणी केली असता मित्रल स्टेनोईस बळावला असल्याचे आणि हृदय विकार असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांच्यावर पर्क्युटॅन्युअस ट्रान्सव्हेनस मित्रल कमिस्युरोटोमी  (पीटीएमसी)  शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मला आनंद आहे की या शस्त्रक्रियेनंतर आचरेकरांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना होणारा श्वसनाचा त्रासही कमी झाला आहे. वोक्हार्ट रुग्णालयाचा सातत्याने प्रयत्न असतो की हृदयविकाराच्या रुग्णांना उत्तम दर्जाची शुश्रुषा मिळावी आणि ते ठणठणीत व्हावेत.”

“श्री.आचरेकर यांना जो त्रास होत होता तो काहीसा दुर्मिळ स्वरुपाचा आहे. इतर शस्त्रक्रियांप्रमाणे पर्क्युटॅन्युअस ट्रान्सव्हेनस मित्रल कमिस्युरोटोमी  (पीटीएमसी)  ही नियमित शस्त्रक्रिया नाहीये. 79 वर्ष वयाच्या रुग्णावर ती केली जाणं हे तर फारच दुर्मिळ आहे.”

श्री.आचरेकर हे वोक्हार्ट रुग्णालयात असताना त्यांची अँजिओग्राफी चाचणी देखील करण्यात आली. त्यांच्या हृदयाची स्थिती जाणून घेण्यासाठी अँजिओग्राफी करण्यात आली होती. यामध्ये हृदयाच्या धमन्यांमध्ये काही ब्लॉकेजस म्हणजेच अडथळे दिसून आले होते. हे अडथळे औषध देऊन दूर करण्यात आले.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाचे फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ.सुलेमान लधानी यांनी म्हटले की,  ” आमचा प्राथमिक उद्देश्य हा रुग्णाला होत असलेली श्वसनाची समस्या कमी करणे हा होता. श्री.आचरेकर जेव्हा रुग्णालयात आले तेव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यांना खोकलाही होता. यामुळे त्यांना बारकाईने तपासणे गरजेचे होते. आमच्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली असता पर्क्युटॅन्युअस ट्रान्सव्हेनसमित्रल कमिस्युरोटोमी  (पीटीएमसी)  मुळे त्यांची श्वसनाची समस्या बळावली असावी असं दिसून आलं. श्री.आचरेकरांना तत्काळ आराम पडावा आणि त्यांना श्वास घेण्यास होत असलेली अडचण दूर व्हावी ही आमची प्राथमिकता होती. श्री.आचरेकर यांच्या फुफ्फुसांती क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात आली, मात्र तरीही त्यांना होत असलेला श्वसनाचा त्रास कमी झाला नव्हता. कारण त्यांना हृदयविकाराचाही त्रास होत होता. यामुळे आम्ही डॉ.परीन संगोई यांच्यासोबत मिळून रुग्णावर उपचार करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर पर्क्युटॅन्युअस ट्रान्सव्हेनस मित्रल कमिस्युरोटोमी  (पीटीएमसी) शस्त्रक्रिया केली.”

श्री.आचरेकरांवर करण्यात आलेल्या या उपचारांनंतर त्यांना होणारा त्रास कमी झाला आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "श्वसनाच्या त्रासाने ग्रासलेल्या 79 वर्षांच्या रुग्णावर यशस्वी पीटीएमसी शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या अनुभवी डॉक्टरांमुळे आणि सांघिक प्रयत्नांमुळे रुग्णाला मिळाले जीवदान"

Leave a comment

Your email address will not be published.


*