अपोलोने जन्मजात ‘सिस्टिक ऍडेनोमेटॉइड’ विकृत बाळाला दिले जीवदान; जटिल शस्त्रक्रियेद्वारे जन्मजात ‘पल्मोनरी एअरवे मॅल्फोर्मेशन’ च्या दुर्मिळ प्रकरणात वाचवले बाळाचे प्राण

नवी मुंबई, २७ जून २०२३ (GPN): नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाने फुफ्फुसाचा दुर्मिळ विकार म्हणजेच जन्मजात फुफ्फुसीय वायुमार्ग विकृती (पल्मोनरी एअरवे मॅल्फोर्मेशन) सिस्टिक ऍडेनोमेटॉइड (सीपीएएम) असलेल्या अकाली जन्मलेल्या बाळावर यशस्वीपणे उपचार केले. रुग्णालयाच्या बहुकुशल टीमने या प्रकरणातील गुंतागुंत हाताळली आणि यामुळे बाळाला जीवनदान मिळाले. या गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये गर्भात वेदना आणि मेकोनियम-स्टेन्ड लिकरमुळे ३५ आठवड्यांच्या गर्भातील बाळाची सी-सेक्शनद्वारे तात्काळ प्रसूती करण्यात आली. आईला हिपॅटायटिस-बी व्हायरसची लागण झाली होती, त्यामुळे वैद्यकीय टीमसमोर मोठे आव्हान उभे राहिले. तथापि बहुकुशल निओनॅटल (नवजात बालकांची काळजी घेणाऱ्या) टीमने सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा पुरवल्यामुळे बाळाला रोगमुक्त होण्यास मदत मिळाली. जेव्हा नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे निओनॅटोलॉजिस्ट (नवजात शास्त्र तज्ञ) आणि बालरोगतज्ञ-सल्लागार डॉ. ओमप्रकाश जमादार यांना गर्भात वेदना आणि मेकोनियम-स्टेन्ड लिकर असलेल्या ३५ आठवड्यांच्या गरोदर मातेचा फोन आला. आधीच्या प्रसूतीपूर्व स्कॅनमध्ये बाळाच्या फुफ्फुसाच्या खालच्या डाव्या भागात ५० x ३० x ४० मिमीची जखम दिसून आली हे ‘सिस्टिक ऍडेनोमेटॉइड’ चे सूचक होते.

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सद्वारे प्रसूतीसाठी ‘एनआयसीयू ऑन व्हील्स’ म्हणजे ट्रान्स्पोर्ट इन्क्यूबेटर, व्हेंटिलेटर आणि प्रसूतीसाठी प्रशिक्षित डॉक्टर असलेली रुग्णवाहिका ताबडतोब पाठवण्यात आली. प्रसूतीनंतर सुरुवातीला बाळ व्यवस्थित रडले पण हळूहळू बाळाला सायनोसिस आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला.नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समधील निओनॅटल (नवजात शिशूसाठीच्या) टीमने तात्काळ प्रतिसाद दिला, बाळाला लगेच सीपीएपी वर ठेवण्यात आले आणि अतिदक्षता आणि पुढील उपचारांसाठी अपोलो हॉस्पिटल्स येथे हलवण्यात आले.

डॉ.ओमप्रकाश जमादार, बालरोगतज्ञ-सल्लागार, निओनॅटोलॉजिस्ट (नवजात शास्त्र तज्ञ), अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईतील म्हणाले,”बाळाच्या अकाली जन्मामुळे आणि फुफ्फुसाच्या स्थितीमुळे हे प्रकरण गंभीर होतं. छातीच्या क्ष-किरणामुळे ग्रॉस मेडियास्टिनल शिफ्ट आणि फुफ्फुसात उबाळू दिसून आला. बाळाला लगेच इन्ट्युबेट करण्यात आले आणि यांत्रिक वायुवीजन (व्हेंटिलेशन) सुरु करण्यात आले आणि बाळ हळू-हळू स्थिर होऊ लागले. ३५ आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या बाळावर शस्त्रक्रिया केल्यास उच्च जोखीम निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही सुरुवातीला शस्त्रक्रिया न करता बाळाची स्थिती व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर लगेच हे समजले की शस्त्रक्रियात्मक उपचार आवश्यक आहेत, कारण संकुचित फुफ्फुसामुळे श्वास घेण्याचा आधार बंद करता येत नाही आणि फुफ्फुसातील मोठ्या उबाळूमुळे हृदय उजव्या बाजूला हलले जाते.”

सिटी स्कॅनमुळे बाळाच्या फुफ्फुसात ‘सिस्टिक ऍडेनोमेटॉइड’ (सीपीएएम)चे लक्षण असलेल्या मस्टी-सिस्टिक (बहु-पटीय) जखम असल्याची पुष्टी झाली. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे बालरोग आणि नवजात शल्यचिकित्सक डॉ.अश्विनी खानोळकर आणि भूलतज्ञ (ऍनेस्थेसियोलॉजिस्ट) सल्लागार डॉ.कांचन सिंह सोबत बहुकुशल टीमने प्रभावित फुफ्फुसाच्या भागाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. शस्त्रक्रियेच्या दुसर्याा दिवशी बाळाचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. ५व्या दिवशी छातीच्या क्ष-किरणामध्ये लक्षणीयरित्या सुधारणा दिसून आली. जन्म झाल्यानंतर १०व्या दिवशी बाळाला तोंडावाटे पाजण्यात आले आणि २३व्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी, बाळाचे वजन व्यवस्थित होते.

जन्मजात फुफ्फुसीय वायुमार्ग विकृती (पल्मोनरी एअरवे मॅल्फोर्मेशन) ज्यास जन्मजात सिस्टिक ऍडेनोमेटॉइड विकृती देखील म्हणतात, हा एक फुफ्फुसाचा दुर्मिळ विकार आहे, जो प्रत्येक ३०,००० गर्भधारणेपैकी एकाला होतो. सीपीएएम मध्ये फुफ्फुसाचा संपूर्ण भाग असामान्य फुफ्फुसाच्या ऊतींच्या नॉन-वर्किंग सिस्टिकच्या तुकड्याने बदलला जातो, जो सामान्य फुफ्फुसाच्या ऊतींप्रमाणे कधीही कार्य करत नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, सीपीएएमच्या बाबतीत गर्भाचा परिणाम पॉजिटिव्ह असतो, पण जर फुफ्फुसाच्या ऊतींच्या वाढीस प्रतिबंधित करण्यासाठी आणि हृदयावर दाब आणण्यासाठी सिस्टिक खूप वाढले तर हे जीवावर बेतू शकते.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अपोलोने जन्मजात ‘सिस्टिक ऍडेनोमेटॉइड’ विकृत बाळाला दिले जीवदान; जटिल शस्त्रक्रियेद्वारे जन्मजात ‘पल्मोनरी एअरवे मॅल्फोर्मेशन’ च्या दुर्मिळ प्रकरणात वाचवले बाळाचे प्राण"

Leave a comment

Your email address will not be published.


*