बँक ऑफ बडोदाच्या वतीने त्यांच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी लाँच

Bank of Baroda (BoB) Logo

संपूर्णपणे स्वयंचलित प्रक्रियेमुळे जलद सुनिश्चित वेळ, प्रमाणीकरण सुलभता, उपलब्धता आणि प्रतिबंध फसवणूक

मुंबई11 मे2023 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असणाऱ्या बँकेने नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड (NeSL) च्या भागीदारीत, त्यांच्य बरोबर बड़ौदा इंस्टा प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी (ई-बीजीलाँच करण्याची घोषणा केली आहेजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे आंर्तदेशीय बीजी जारी करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. NeSL ही भारतातील पहिली आणि एकमेव माहिती उपयुक्तता असून दिवाळखोरी आणि शोधन अक्षमता संहिता, 2016 (आईबीसीच्या तरतुदींनुसार दिवाळखोरी आणि शोधन अक्षमता भारतीय मंडळ (IBBI) द्वारे नियंत्रित केली जाते. या लाँचसहबँक ऑफ बडोदा इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी करण्यासाठी बँकांच्या निवडक गटात सामील होते आहे – BG च्या संपूर्ण जीवनचक्रामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजीटल प्रक्रिया जारी करणेदुरुस्ती आणि बंद करणेपरिणामी जारी करण्याच्या वेळेत लक्षणीय घट होते. एक BG, त्याच वेळी अधिक सुरक्षितता आणि उपलब्धता प्रदान करते.

आंर्तदेशीय बँक हमी जारी करण्याच्या पारंपरिक कागदी प्रक्रियेला सामान्यतः बीजी जारी करण्यापासून ते लाभार्थीकडून पावती मिळण्यासाठी काही दिवस लागतात. शिवाय सेंट्रल रेपोझेरेटरीच्या अनुपस्थितीत, बीजी स्थितीची पडताळणी करणे कठीण असून गैरवापरास देखील वाव आहे.

ई-बीजीमध्ये, फसवणूक रोखण्यासाठी, NeSL द्वारे फिजीकल स्टॅम्पिंगच्या जागी ई-स्टॅम्पिंग दाखल करण्यात आले. ई-बीजी सेंट्रल रिपोझीटरीमध्ये साठवले जाते. ज्यामुळे सर्व भागधारकांसाठी संपूर्ण पारदर्शकता आणि सुलभता तसेच प्रमाणीकरण आणि पडताळणी सुलभ होते. तसेच, पारंपरिक BG च्या बाबतीत सरासरी 2-3 दिवसांच्या TAT प्रमाणे, इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीवर काही मिनिटांत प्रक्रिया करण्यात येते आणि ती वितरित होते.

बँक ऑफ बडोदा’चे – महाव्यवस्थापकफॉरेक्स आणि फी इनकम– प्रमुखश्री. टी. एन. सुरेश म्हणालेइलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी ही एक परिवर्तनकारी सुधारणा आहे. कारण आम्ही आमच्या ग्राहकांसाठी बँकिंग अधिक सोपीअधिक सुरक्षित आणि सहज उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो. वैयक्तिक कंत्राटदारछोटे-मध्यम उद्योग आणि मोठे कॉर्पोरेट हे बँक गॅरंटीचे प्रमुख अर्जदार आहेत. तसेच e-BGs कडे जाणे ही एक जलदअखंडपारदर्शक आणि पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया आहे, जिचा फायदा सर्वांना होईल.”

NeSL चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. देबज्योती रे चौधरीम्हणालेगेल्या काही वर्षांतभारताने एक मजबूत डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण केली असून अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये वाढ होते आहे. सर्वसाधारणपणे बँकिंग उद्योग आणि विशेषतः BOB आपली उत्पादनं आणि प्रक्रिया डिजीटल पद्धतीद्वारे उपलब्ध करून देण्यात आघाडीवर आहे. NeSL चे e-BG हे उत्पादनासाठी बँकिंग उद्योगाची दीर्घकालीन आवश्यकता पूर्ण करते. जे ई-BG जारी करण्याच्या फिजीकल प्रोसेस आव्हानांना तोंड देते. या उत्पादनाची संकल्पना मांडण्यात आणि उत्पादन लाँचसाठी सज्ज होईपर्यंत त्यांच्या सदस्यांशी झालेल्या अनेक सल्लामसलतींविषयी समन्वय साधण्यासाठी आम्ही इंडियन बँक्स असोसिएशनचे आभारी आहोत.”

नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड (NeSL) इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे आंर्तदेशीय BG जारी करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. ई-बीजीमधील डिजीटल पायऱ्यांमध्ये बीजी अॅप्लिकेशन, पूर्वावलोकन आणि पुष्टी, पेपरलेस ई-स्टॅम्पिंग, ई-स्वाक्षरी, NeSL पोर्टलवर अंतीम इलेक्ट्रॉनिक बीजी होस्टिंग आणि लाभार्थ्यांना अंतीम BG ची सूचना यांचा समावेश आहे. लाभार्थ्याला जारी केल्यावर लगेचच NeSL पोर्टलवर अंतिम डिजीटल बीजी पाहणे शक्य होईल. अशा e-BG मुळे बीजी जारी करणाऱ्या बँकेकडून वेगळ्या प्रमाणीकरणाची गरज राहत नाही.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाच्या वतीने त्यांच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी लाँच"

Leave a comment

Your email address will not be published.


*