एयू स्मॉल फायनान्स बँक आणत आहे बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड

मुंबई, ८ मे २०२३, (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँकेने  बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड हे स्वयंरोजगारित ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खास विकसित केलेले नाविन्यकारी उत्पादन बाजारात आणण्यासाठी रुपेशी भागीदारी केली आहे. छोट्या व्यावसायिकांना वैविध्यपूर्ण लाभ पुरवण्याच्या उद्दिष्टाने हे नवीन उत्पादन तयार करण्यात आले आहे. हे क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप आसबे आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अगरवाल यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले.

एयू स्मॉल फायनान्स बँकेचे बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड व्यवसायांसाठी आर्थिक व्यवहार सुलभ करते. या कार्डामुळे २ टक्के कॅशबॅक, ४८ दिवस व्याजमुक्त क्रेडिट आणि तत्काळ कर्जे आदी लाभ प्राप्त केले जाऊ शकतात. या कार्डासोबत आग, दरोडा व घरफोडीच्या परिस्थितीत विमा संरक्षण दिले जाते. त्यामुळे ते व्यावसायिकांसाठी सर्व लाभ एका ठिकाणी मिळवून देणारे उत्पादन आहे.

“छोटे व मध्यम आकारमानाचे उद्योग (एमएसएमई) भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, याची जाणीव एयू स्मॉल फायनान्स बँकेला आहे आणि आम्ही गेल्या २८ वर्षांपासून या विभागाला सेवा देत आहोत. या विभागाच्या वेगळ्या गरजा पूर्ण करणारी नाविन्यकारी आर्थिक उत्पादने पुरवण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड ही आमच्या एमएसएमईंप्रती असलेल्या बांधिलकीची पावती आहे. स्वयंरोजगारित ग्राहक विभाग आमच्या बँकेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे आम्ही या ग्राहकांना मूल्यवर्धन करून देण्यावर तसेच पत समावेशनाला बढावा देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. यापुढेही आम्ही आमच्या अन्य क्रेडिट कार्ड प्रकारांच्या माध्यमातून एमएसएमईंसाठी कस्टमाइझ्ड लाभ आणण्यावर काम करत राहणार आहोत,” असे एयू एसएफबीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अगरवाल म्हणाले.

हे क्रेडिट कार्ड अन्य जीवनशैली व प्रवास लाभही पुरवते. सिल्व्हर स्पून डायनिंग प्रोग्राम कार्डधारकांना ३०० हून अधिक रेस्टोरंट्समध्ये ३० टक्के सवलत देऊ करतो, दरवर्षी ८ रेल्वे लाउंजेसमध्ये मोफत प्रवेश देऊ करतो तसेच इंधन अधिभारावर १ टक्का* सवलत देऊ करतो.

“एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्डाच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहून मला खूप आनंद वाटला. नॅशनल पेमेंटेस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बँकिंग क्षेत्रात नाविन्यकारी उत्पादनला बढावा देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि हे क्रेडिट कार्ड त्याचे स्पष्ट उदाहरण आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकेने बँकिंग उद्योगात उत्कृष्टता व नवोन्मेष यांच्याप्रती सातत्याने समर्पितपणे काम केले आहे. हे क्रेडिट कार्ड स्वयंरोजगारित व्यक्तींना सक्षम करणारे व आर्थिक समावेशनाला बढावा देणारे उत्तम उत्पादन आहे. हे क्रेडिट कार्ड खूप यशस्वी होईल आणि असंख्य व्यवसायांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास मला वाटतो. एयू एसएफबीचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हे उत्तम काम असेच सुरू ठेवावे अशा शुभेच्छा देतो,” असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलिप असबे म्हणाले.

एयू स्मॉल फायनान्स बँक ही स्वयंरोजगारित व्यक्ती व व्यवसायांना नाविन्यकारी व खात्रीशीर वित्तीय उत्पादने पुरवणारी आघाडीची बँक आहे. उत्कृष्टता व पत समावेशनाप्रती अविचल बांधिलकी राखत, बँक सातत्याने आपल्या सेवेत सुधारणा व सखोलता आणत आहे आणि सर्वसमावेशक लाभ देऊ करत आहे. बँकिंग व व्यवसाय परिसंस्थेत अभूतपूर्व कार्यक्षमता आणण्यासाठी एयू एसएफबी सज्ज आहे तसेच ती भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत योगदान देत आहे आणि एसएमई विभागाला सक्षम करत आहे.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू स्मॉल फायनान्स बँक आणत आहे बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड"

Leave a comment

Your email address will not be published.


*