एयू बँकेने सर्व घटकांवर केली प्रबळ निकालांची नोंद

AU Small Finance Bank Limited (AU Bank)

ठेवींमध्ये वार्षिक ३२ टक्‍क्‍यांची वाढआगाऊमध्‍ये वार्षिक २६ टक्‍क्‍यांची वाढ आणि निव्‍वळ व्‍याज उत्‍पन्‍नामध्‍ये वार्षिक ३७ टक्‍क्‍यांच्‍या प्रबळ वाढीच्‍या पाठबळासह संपूर्ण वर्षातील नफा वार्षिक २६ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ,४२८ कोटी रूपयांवर पोहोचलाआर्थिक वर्ष २३ च्या चौथ्‍या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वोच्‍च तिमाही नफा ४२५ कोटी रूपयेजीएनपीए १.६६ टक्‍क्‍यांनी कमी आणि निव्‍व्‍ळ एनपीए ०.४२ टक्‍क्‍यांनी कमी होण्‍यासह मालमत्ता दर्जामध्‍ये प्रबळ वाढ

बोर्डकडून आर्थिक वर्ष २३ साठी प्रति इक्विटी शेअर १ रूपयांच्‍या लाभांशाची शिफारस

·       नफा – आर्थिक वर्ष २३ च्‍या चौथ्‍या तिमाहीसाठी निव्‍वळ नफा वार्षिक २३ टक्‍क्‍यांनी वाढून ४२५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला; संपूर्ण आर्थिक वर्ष २३ साठी पीएटी (करोत्तर नफा) १,४२८ कोटी रूपये राहिला; आर्थिक वर्ष २३ च्‍या चौथ्‍या तिमाहीसाठी / आर्थिक वर्ष २३ साठी आरओए २.० टक्‍के / १.८ टक्‍के आणि आरओई १५..८ टक्‍के / १५.४ टक्‍के

·       आरबीआयकडून खालील पदाधिकाऱ्यांच्‍या पुनर्नियुक्‍तीला मान्‍यता 

    • जानेवारी’२४ पर्यंत त्‍यांच्‍या उर्वरित कार्यकाळासाठी अध्‍यक्ष श्री. आर. व्‍ही. वर्मा
    • ३ वर्षांच्‍या कालावधीसाठी व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अग्रवाल
    • ३ वर्षांच्‍या कालावधीसाठी कार्यकारी संचलाक श्री. उत्तम तिब्रेवाल

·       आरबीआयने फॉरेक्‍स व क्रॉस-बोर्डर व्‍यापार संबंधित सेवा देण्‍यासाठी बँक ऑथोराइज्‍ड डीलर कॅटेगरी – १ (एडी कॅट-१) परवानाला मंजूरी दिली

·       लाभांश – बोर्डने मार्च २०२३ रोजी समाप्‍त झालेल्‍या वर्षासाठी प्रति शेअर १ रूपयांच्‍या लाभांशाची (दर्शनी किंमतीच्‍या १० टक्‍के) शिफारस केली आहे

·       स्वतंत्र संचालकांची भर – बँकेने वर्षभरात ३ स्वतंत्र संचालकांची भर घालून आपले बोर्ड अधिक बळकट केले आणि त्याचा विस्तार केला, तसेच बोर्डमधील एकूण संख्या १० संचालकांवर नेली आणि त्यात २ महिला संचालकांसह ८ स्वतंत्र संचालक आहेत.

·       ठेवी वार्षिक ३२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ६९,६३५ कोटी रूपयांवर पोहोचले; सीएएसए ठेवी वार्षिक ३६ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २६,६६० कोटी रूपयांवर पोहोचले; सीएएसए रेशो ३८.४ टक्‍के आणि सीएएसए + रिटेल ठेवी रेशो ६९ टक्‍के

·       ताळेबंदने ९०,००० कोटी रूपयांचा टप्‍पा पार केला

·       एकूण एनपीए १५ बीपीएसने कमी होत १.६६ टक्‍के आणि निव्‍वळ एनपीए ०.४२ टक्‍के राहण्‍यासह मालमत्ता दर्जा सुधारला

·       प्रोव्हिजन कव्‍हरेज रेशो (पीसीआर) ७५ टक्‍क्‍यांसह प्रोव्हिजन अधिक प्रबळ झाले; ७८ टक्‍क्‍यांच्‍या टेक्निकल राइट-ऑफसह पीसीआर

·       कॉन्टिन्‍गन्‍सी प्रोव्हिजन आता ९० कोटी रूपये; फ्लोटिंग प्रोव्हिजन ४१ कोटी रूपये राहिले आणि मानक पुनर्रचित मालमत्तांसाठी प्रोव्हिजन्‍स ११६ कोटी रूपये

·       बँकेने आर्थिक वर्ष २३ मध्‍ये १०८ नवीन टचपॉइण्‍ट्स सुरू केले, ज्‍यामुळे एकूण नेटवर्क २१ राज्‍यांमध्‍ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये १,०२७ टचपॉइण्ट्सपर्यंत पोहोचले.

 मुंबई, २६ एप्रिल २०२३ (GPN): एयू स्‍मॉल फायनन्‍स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाच्या आर्थिक निकालांना मान्यता दिली.

या कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अग्रवाल म्‍हणाले, ‘‘बँकेने उच्‍च व्‍याजदरांमुळे चलनवाढ, रोखप्रवाहसंदर्भात आव्‍हाने असताना देखील सर्व घटकांवर सातत्‍याने उत्तम कामगिरी करण्‍याची आणखी एक तिमाही व आणखी एक वर्ष संपादित केले आहे. बाजारपेठेत मंदी असताना देखील आम्‍ही आमचे ठेवी बुक विकसित करण्‍यामध्‍ये, तसेच आमचे सीएएसए रेशो स्थिर ठेवण्‍यामध्‍ये आणि आमच्‍या ठेवी अधिक ग्रॅन्‍युलर व रिटेल करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरलो आहोत. आमचा मालमत्ता दर्जा या वर्षा मध्‍ये अधिक सुधारला असून निव्‍वळ एनपीए ०.४ टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. प्रशासनावरील आमच्‍या लक्ष केंद्रित करण्‍याला आम्‍ही अधिक प्राधान्‍य देत आहोत आणि वर्षादरम्‍यान ३ नवीन स्‍वतंत्र संचालकांच्‍या भरसह बोर्डमधील एकूण संख्‍या आता १० संचालकांपर्यंत पोहोचली आहे, ज्‍यापैकी ८ स्‍वतंत्र संचालक असण्‍यासोबत २ महिला संचालक आहेत. बँक म्‍हणून आम्‍ही उत्‍पादने, तंत्रज्ञान, वितरण असो किंवा मनुष्‍यबळ असो भारतात पुढील दशकामधील संधीचा लाभ घेण्‍यासाठी सुसज्‍ज आहोत. आम्‍ही प्रमाणित, स्‍केलेबल व शाश्‍वत असलेल्‍या पद्धती व प्रक्रियांचा विचार करण्‍याची मानसिकता असलेल्‍या पिढीसह भारतभरात शाश्‍वत व सुव्‍यवस्थित बँकेचा पाया रचण्‍याचे कार्य सुरू ठेवले आहे.

एयू बँक स्‍मॉल फायनान्‍स बँक म्‍हणून ६वे वर्ष आणि संस्‍था म्‍हणून २८ वर्ष पूर्ण करत असताना मला संस्‍थापक व उद्योजक असण्‍याचे समाधान व अभिमान वाटतो. १९ एप्रिल या आमच्‍या वर्धापन दिनी ऑथोराइज्‍ड डीलर कॅटेगरी – १ लायसेन्‍स (एडी-१) मिळणे अत्‍यंत परिपूर्ण गिफ्ट होते, जेथे कोणत्‍याही संस्‍थेला हा परवाना मिळण्‍याची इच्‍छा असेल. मी सरकार, आरबीआय व इतर नियामकांचे त्‍यांनी दिलेला पाठिंबा व मार्गदर्शनासाठी आभार मानतो, तसेच आमचे गुंतवणूकदार, ग्राहक, कर्मचारी व इतर भागधारकांचे एयूमधील त्‍यांच्‍या अविरत विश्‍वासाठी आभार मानतो. आमच्‍या भागधारकांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी बोर्डने आर्थिक वर्ष २३ करिता प्रति इक्विटी शेअर १ रूपयांच्‍या लाभांशाची शिफारस केली आहे.’’  Ends

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू बँकेने सर्व घटकांवर केली प्रबळ निकालांची नोंद"

Leave a comment

Your email address will not be published.


*