अपोलो ‘जीनोमिक्स इन्स्टिट्यूट’ चा विस्तार -आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार जगभरातील ८००० दुर्मिळ विकार भारतात आढळतात

Apollo Hospitals Logo

नवी मुंबई, २७ एप्रिल २०२३ (GPN): जगातील सर्वात मोठा एकात्मिक आरोग्यसेवासुविधा पुरवठादार समूह अपोलोने ‘अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूट’ सुरु करून त्याचा विस्तार केल्याची घोषणा केली आहे. जीनोमिक्समधील गुंतवणुकीत दुपटीने वाढ करून याआधी अपोलोने नवी मुंबई व दिल्लीमध्ये अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूटची सुरुवात केली होती. २०२३ च्या अखेरपर्यंत हैद्राबाद, बंगलोर, अहमदाबाद मध्ये अजून तीन जीनोमिक्स इन्स्टिट्यूट्स सुरु करण्याची अपोलोची योजना आहे.

जगातील २० टक्के लोकसंख्या भारतात आहे, पण जागतिक जेनेटिक डेटाबेसमध्ये भारताचे योगदान फक्त ०.२ टक्के आहे. सुरक्षित पद्धतीने निर्माण करण्यात आलेल्या जेनेटिक डेटाचे संकलन आणि सुरक्षा यासाठी जीनोमिक व्हेरियंट डेटाबेस लॉन्च करण्याची देखील अपोलो जीनोमिक नेटवर्कची योजना आहे. पॅन-अपोलो जीनोमिक्स नेटवर्क शिक्षण व संशोधन कार्यात देखील सक्रिय आहे. एजीआयतर्फे दर आठवड्याला केस चर्चा, सहकाऱ्यांमध्ये आपापसात विचार व माहितीची देवाणघेवाण, दर महिन्याला ग्रँड राउंड्स, जर्नल क्लब आणि हेल्थकेयर सेमिनार सीरिज यांचे आयोजन केले जाते. आज असंसर्गजन्य आजार हे मृत्यू व त्रासांचे एक मोठे कारण बनत चालले आहे, भारतातील ६५ टक्के मृत्यू या आजारांमुळे होत आहेत, अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक आरोग्य देखभाल या विषयाला राष्ट्रीय पातळीवर प्राधान्य मिळावे यासाठी अपोलो वचनबद्ध आहे. अचूक आणि व्यक्तिगत वैद्यकीय देखभाल उपलब्ध करवून देऊन भारतामध्ये आरोग्यसेवेचे भविष्य बदलावे हे अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूट्सचे उद्दिष्ट आहे.

डॉ प्रीता रेड्डी, एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरपर्सन, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांनी सांगितले,”भारतामध्ये प्रचंड वैविध्य आणि विषमता आढळून येते आणि त्यामुळे जीनोमिक वैद्यकशास्त्र आपल्या देशामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते. अर्भक मृत्युदरामध्ये घट होत असल्याने जेनेटिक विकार हा प्रमुख आजार समूह बनत चालला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या २०२१ सालच्या एका अहवालानुसार, दुर्मिळ आजार म्हणून जगभरात मान्यता दिले गेलेले जवळपास ७००० ते ८००० विकार भारतात आढळून येतात. आज आपल्या देशातील लोक आरोग्याविषयी जास्तीत जास्त जागरूक बनत चालले आहेत, असंसर्गजन्य आजारांचे निदान आणि त्यांना प्रतिबंध घालण्यामध्ये तसेच मधुमेह, कर्करोग आणि कार्डिओव्हस्क्युलर आजार यासारख्या जेनेटिक आजारांमध्ये जीनोमिक तपासण्यांचे महत्त्व याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. आज भारत आणि जगभरात प्रमुख आरोग्य समस्या बनलेल्या असंसर्गजन्य आजारांना आळा घालण्यात आणि त्यांच्या उपचारांमध्ये जीनोमिक इन्स्टिट्यूटचा विस्तार हे खूप महत्त्वाचे पाऊल आहे.”

संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यात भारताने गेल्या काही वर्षात प्रचंड प्रगती साध्य केली असली तरी हल्लीच्या काळात जेनेटिक विकारांच्या संख्येत होत असलेल्या वाढीकडे मात्र दुर्लक्ष झालेले आहे. जीनोमिक्समुळे हे आजार बळावण्याच्या आधीच लक्षात येऊ शकतात, त्यामुळे वेळीच उपचार आणि प्रतिबंधात्मक काळजी घेतली जाऊ शकते.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अपोलो ‘जीनोमिक्स इन्स्टिट्यूट’ चा विस्तार -आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार जगभरातील ८००० दुर्मिळ विकार भारतात आढळतात"

Leave a comment

Your email address will not be published.


*