एयू एसएफबीकडून बीबीपीएस व्‍यासपीठावर व्हिडिओ बँकिंगसह उद्योगातील पहिली त्रासमुक्‍त बिल पेमेंट सेवेचा शुभारंभ

AU Small Finance Bank Limited (AU Bank)

मुंबई, १८ एप्रिल २०२३ (GPN): एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक ही भारतातील सर्वात मोठी स्‍मॉल फायनान्‍स बँक व्हिडिओ बँकिंगच्‍या माध्‍यमातून बिल पेमेंट सेवा सुरू करयासाठी भारत बिल पेमेंट सिस्‍टम (बीबीपीएस) सोबत सहयोग करणारी भारतातील पहिली व्‍यावसायिक बँक बनली आहे. या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक समावेशनाकरिता डिजिटल उपलब्‍धतेला चालना देण्‍याचा आणि आर्थिक क्षमता वाढवण्‍याचा प्रमुख उद्देश आहे.

एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेची व्हिडिओ बँकिंग सेवा गाहकांना नवोन्‍मेष्‍कारी सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करते. हे व्‍यासपीठ ग्राहकांना शाखेला भेट न देता बिल भरण्‍यास सक्षम करते. ही सेवा विशेषत: गतीशीलता समस्‍या असलेल्‍या किंवा दुर्गम भागामध्‍ये राहणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी लाभदायी आहे.

तज्ञ बँकिंग प्रतिनिधींच्‍या मदतीने ग्राहक त्‍यांच्‍या एयू खात्‍यामधून २० हून अधिक श्रेणींमधील २० हजारांहून अधिक बिलर्सना पेमेंट्स करू शकतात. लोक एयू एसएफबीच्‍या व्हिडिओ बँकिंग सेवेच्‍या माध्‍यमातून आता फास्‍टटॅग, कर्जाची परतफेड, विमा, गुंतवणूका, शैक्षणिक शुल्‍क, महापालिका कर, युटिलिटी पेमेंट्स जसे गॅस, वीजबिल, मोबाइल, लँडलाइन, पाणीपट्टी, डीटीएच बिले सारखे इतर पेमेंट्स करू शकतात.

‘‘एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेने आपल्‍या डिजिटल-केंद्रित विकासाच्‍या दिशेने वाटचाल कायम ठेवली असताना आम्‍हाला या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून बँकिंग सेवांचे डिजिटायझेशन करण्‍यामध्‍ये धोरणात्‍मक भूमिका साकारण्‍याचा अत्‍यंत आनंद होत आहे. आमच्‍या बँक ग्राहकांसाठी आम्‍ही व्हिडिओ बँकिंगच्‍या माध्‍यमातून ४०० हून अधिक सेवांची पूर्तता करत आहोत. आता, व्हिडिओ बँकिंगवर बिल पेमेंट सेवांच्‍या शुभारंभासह आमचा ग्राहकांना त्‍यांच्‍या सोईनुसार त्‍यांचे बिल भरताना फेस-टू-फेस इंटरअॅक्‍शनची आरामदायी सुविधा देण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही या नवोपक्रमाला पाठिंबा देण्‍यासठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इतर मान्‍यवरांचे आभार मानतो,’’ असे एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे सीआयओ श्री. अंकुर त्रिपाठी म्‍हणाले.

व्हिडिओ बँकिंगवर नवीन सुरू करण्‍यात आलेल्‍या बिल पेमेंट सेवेचा लाभ घेण्‍यासाठी एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे ग्राहक सोईस्‍करपणे लिंकच्‍या (https://www.aubank.in) माध्‍यमातून किवा एयू ०१०१ अॅपच्‍या माध्‍यमातून बँकेच्‍या व्हिडिओ बँकरशी कनेक्‍ट होऊ शकतात. त्‍यानंतर ग्राहक व्हिडिओ बँकरकडून बिल पेमेंट सपोर्टची विनंती करू शकतात. व्हिडिओ बँकर संबंधित माहितीचे सत्‍यापन करेल आणि पेमेंट प्रक्रियेची सुविधा देईल. पेमेंट पूर्ण झाल्‍यानंतर व्हिडिओ बँकर ग्राहकांना त्‍यांच्‍या संवादाच्‍या पसंतीच्‍या मोडनुसार कॉलवर किंवा चॅटवर पावती शेअर करेल. ही प्रक्रिया पूर्णत: सुरक्षित, विश्‍वसनीय, मानव-केंद्रित आहे आणि ग्राहकांना पेमेंट माहिती सुरक्षिततेबाबत चिंता करण्‍याची गरज नाही. ते रिअल-टाइम आधारावर व्हिडिओ बँकरच्‍या सहाय्यतेसह मार्गदर्शन मिळवू शकतात आणि शंकांचे निराकरण करू शकतात; व्हिडिओ बँकिंगवर बिल पेमेंट सेवांसह ग्राहक वेळेवर बिल पेमेंट्स करू शकतात. हे सेवा आणखी एक पद्धत आहे, ज्‍यामध्‍ये एयू एसएफबी आपल्‍या ग्राहकांसाठी बँकिंग अधिक उपलब्‍धहोण्‍याजोगे, सोईस्‍कर व सर्वसमावेशक करत आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू एसएफबीकडून बीबीपीएस व्‍यासपीठावर व्हिडिओ बँकिंगसह उद्योगातील पहिली त्रासमुक्‍त बिल पेमेंट सेवेचा शुभारंभ"

Leave a comment

Your email address will not be published.


*