तरिकेरे कम्युनिटी ड्रीप इरिगेशन फेज II च्या शेतकऱ्यांनी ड्रीप फर्टिगेशनद्वारा पीक उत्पादन आणि आर्थिक समृद्धी वाढवली

मुंबई, 23मार्च, 2023 (GPN):-  तरिकेरे कम्युनिटी  ड्रीप इरिगेशन फेज II मधील शेतकऱ्यांनी पाण्याची उत्पादकता आणि ड्रीप फर्टिगेशनचा वापर करून खतांचा वापर कार्यक्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याच्या उत्पादकतेमध्ये सुमारे ९० टक्के आणि खतांच्या वापराची कार्यक्षमतेत ३० ते ४० टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. हे देखील निदर्शनास आले आहे की शेतकऱ्यांनी फरो किंवा फ्लड आणि ब्रॉडकास्ट फर्टिलायझेशन वापरून केलेल्या पारंपरिक सिंचनाच्या तुलनेत पीक बाष्पीभवन ९-१० टक्क्यांनी कमी झाले आहे. हे तंत्रज्ञान पिकांना पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी इष्टतम ओलाव्याचे वितरण करण्यास देखील मदत करते.

ड्रीप फर्टिगेशनद्वारे प्लास्टीक टयूबिंगचा वापर पाणी आणि खत रोपांच्या पायथ्याशी नियमितपणे ठिबक करण्यासाठी केला जातो आणि अशा प्रकारे, हे तंत्र सुमारे ५० ते ६० टक्के जास्त उत्पादन मिळविण्यासाठी खूप उपयुक्त ठरले आहे.

आतापर्यंत, कंपनीने तारिकेरे कम्युनिटी ड्रीप इरिगेशन फेज II च्या ५५०० हेक्टरमध्ये ठिबक यंत्रणा बसवली आहे. कमी प्रमाणात पाणी आणि खतांचा विवेकपूर्ण वापर करून या आधुनिक कृषी तंत्रामुळे ५१०० हेक्टर जमिनीवर शेती करणाऱ्या सुमारे ४९% शेतकऱ्यांपर्यंत पीक उत्पादनात ५० टक्क्यांनी वाढ करण्यात मदत झाली आहे.

कल्लापुरा गावातील जयम्मा यांचा मुलगा श्री कुमार यांनी घेरकिनचे (५.५ टन/एकर) ३०-३५% जास्त उत्पादन  पाहिले, तर ड्रीप फर्टिगेशनशिवाय ते फक्त ४ टन/एकर वाढू शकले. कल्लापुरा गावातील आणखी एक शेतकरी श्री. परप्पा यांनी ड्रीप फर्टिगेशनद्वारे १४ टन/०.५ एकर टोमॅटोचे पीक घेतले आहे. पूर्वी फक्त १० टन/०.५ एकर उत्पादन मिळत असे. गरगदहल्ली गावातील श्री रमेश यांनी ड्रीप फर्टिगेशनने २५ टन/हेक्टर टरबूज घेतले आहेत, जे मागील पिकाच्या उत्पन्नापेक्षा ३०% जास्त आहे.

ड्रीप फर्टिगेशनवर भाष्य करतानानेटाफिम इंडियाचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ श्रीउमेश म्हणाले, “पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि उच्च उत्पादकतेसाठी सिंचन आणि खत व्यवस्थापन सुधारणे हा एक कळीचा मुद्दा आहे. ड्रीप फर्टिगेशनमुळे पाणी आणि खतांचा पुरवठा पिकांच्या मागणीशी समक्रमित होऊ शकतो. अशाप्रकारे शाश्वतपणे उत्पादकता वाढवण्याची क्षमता प्रदान करते. हे तंत्रज्ञान रूट झोनजवळील पिकांची पोषक मागणी पूर्ण करते आणि शेतकऱ्यांना खतांवर तसेच पीक उत्पादन खर्चावर १५-२५% बचत करण्यास मदत करते. पृष्ठभागावरील सिंचनाच्या तुलनेत, ड्रीप फर्टिगेशन हे कृषी पिकांच्या मुळांच्या वाढीमध्ये सुधारणा करण्यासाठी, पिकांचे पोषक शोषण वाढवण्यासाठी आणि मातीची क्षारता नियंत्रित करण्यासाठी एक अतिशय उपयुक्त तंत्र आहे.”

तारिकेरे कम्युनिटी ड्रीप इरिगेशन प्रकल्प, एकदा पूर्ण  झाल्यानंतर, १३५९४ हेक्टर जमीन, ४२ गावे आणि अंदाजे २६,००० शेतकरी समाविष्ट होतील. मुख्यतः प्रकल्पाशी संबंधित शेतकरी भाजीपाला, फळे, फुले आणि सुपारी पिकवत आहेत. हा प्रकल्प जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "तरिकेरे कम्युनिटी ड्रीप इरिगेशन फेज II च्या शेतकऱ्यांनी ड्रीप फर्टिगेशनद्वारा पीक उत्पादन आणि आर्थिक समृद्धी वाढवली"

Leave a comment

Your email address will not be published.


*