बँक ऑफ बडोदा’तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दोन पेयजल किऑस्क भेट देण्यात आले

मुंबई, 23 मार्च, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक) ने आज त्यांच्या पर्यावरण, सामाजिक आणि व्यवस्थापन उपक्रमांचा अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (SGNP) ला पिण्याच्या पाण्याचे दोन किऑस्क उपलब्ध करण्यात आले. एक किऑस्क पेयजलाचा कार्यालय समोर देण्यात आहे, दुसरा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत असलेल्या जगप्रसिद्ध कान्हेरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ स्थापित करण्यात आले. बँक ऑफ बडोदा’चे कार्यपालक निदेशक श्री ललित त्यागी यांनी गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी पिण्याच्या पाण्याच्या दोन्ही किऑस्कचे उद्घाटन केले. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वरिष्ठ वन अधिकारी, धावपटूंचे गट आणि मोठ्या संख्येने बँक कर्मचारी उपस्थित होते.

पेयजलाचे किऑस्क अशा ठिकाणी आहेत,जिथे पार्कमध्ये येणाऱ्यांकडून पिण्यायोग्य पाण्याच्या सुविधांकरिता सर्वाधिक मागणी आहे. या दोन किऑस्कच्या माध्यमातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच इथे येणाऱ्या अभ्यागतांना शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. वॉटर किऑस्कमध्ये आरओ सुविधांसह वॉटर कुलरची सोय आहे. ज्यामुळे शुद्ध पिण्यायोग्य पाण्याची खातरजमा होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 103 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले असून याठिकाणी दरवर्षी 2 दशलक्षहून अधिक पर्यटक भेट देतात. राष्ट्रीय उद्यानात सुमारे 20,000 लोकांचा प्रभात फेरीसाठी नियमित पास आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी स्थित असून याठिकाणी एकूण 109 लेण्या आहेत.

या प्रसंगी बँक ऑफ बडोदा’चे कार्यपालक निदेशक श्री. ललित त्यागी म्हणाले, “संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील अद्वितीय हिरव्यागार निसर्गरूपासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईतील नागरिकांना हरित अभयारण्याचा पर्याय त्यामुळे उपलब्ध झाला असून इथे निसर्गासोबतच वन्यजीव पाहायला ते येऊन फिरू एवं व्यायाम करू शकतात. शहराच्या मध्यभागी शुध्द हवाचे हे एक ठिकाण आहे. बँक ऑफ बडोदा या देशाचा एक जबाबदार घटक आहे व आम्हाला आमच्या भूमिकेची जाणीव आहे. आम्हाला सुरक्षित आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासोबत हातमिळवणीचा आनंद वाटतो. पिण्याच्या पाण्याच्या किऑस्कचे उन्हाळ्यात विशेष कौतुक होईल. या काळात पार्कमध्ये लहान मुले, पर्यटक, ट्रेकर्स, सायकलस्वार आणि वृद्ध लोकांची मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे, दररोज नॅशनल पार्कला धावणे, सायकल चालवणे आणि चालण्यासाठी भेट देणाऱ्या सर्वच वयोगटातील असंख्य लोकांसाठी ते वरदान ठरेल.”

हरित आणि अधिक शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्याच्या दिशेने बँक ऑफ बडोदा वचनबद्ध आहे.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदा’तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दोन पेयजल किऑस्क भेट देण्यात आले"

Leave a comment

Your email address will not be published.


*