रेनो इंडियातर्फे बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियम अनुरूप असलेली 2023ची नवीकोरी श्रेणी सादर

या संपूर्ण श्रेणीमध्ये या क्लासमधील सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत

मुंबई, 11 फेब्रुवारी, 2023 (GPN))रेनो या भारतातील आघाडीच्या युरोपियन ब्रँडने कायगर, ट्रायबर आणि क्विडसह त्यांची संपूर्ण श्रेणी बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियमबद्ध करत रेनोचा पर्यावरणस्नेही वाहनांबद्दलचा निर्धार दर्शविला आहे. नव्या बीएस VI स्टेप 2 अनुरूप श्रेणीमध्ये या क्लासमधील वाढीव सुरक्षा फीचर्सही देण्यात आले आहेत.

बीएस VI च्या दुसऱ्या स्टेपच्या अंमलबजावणीसह सर्व रेनो कारमध्ये सेल्फ-डायग्नॉस्टिक डिव्हाइस (स्वयं-निदान उपकरण) असेल. हे उपकरण कॅटेलिटिक कन्व्हर्टर व ऑक्सिजन सेन्सर्ससारख्या इतर महत्त्वाच्या उत्सर्जन उपकरणांसह हे वाहन चालवताना होणाऱ्या उत्सर्जनाच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवून असेल.

रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम मामिल्लापल्ले यांच्यानुसार, “स्वच्छ व हरित वातावरणाच्या भारत सरकारच्या व्हिजनशी सुसंगत राहण्याचा रेनो इंडियाचा निर्धार आहे. संपूर्ण रेंजमध्ये बीएस VI स्टेप 2 अनुरूप पेट्रोल इंजिन लाँच करत उत्सर्जनात घट करणे व परिणामी, सुरक्षित व स्वच्छ वातावरणात योगदान देण्याची खातरजमा करण्यात आली आहे.”

“सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि आमच्या नव्या 2023 श्रेणीमध्ये या क्लासमधील सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स समाविष्ट करत भारतीय ग्राहकांना जागतिक पातळीची सुरक्षा प्रदान करणारी प्रोडक्ट्स उपलब्ध करून देण्याच्या आमच्या निर्धारावर शिक्कामोर्तब होते.”, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

अपग्रेडचा भाग म्हणून रेनोच्या कायगरट्रायबर आणि क्विड या गाड्यांमध्ये या क्लासमधील सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत. रेनो कायगर व ट्रायबरमध्ये ग्लोबल एनकॅप (Global NCAP) या जागतिक पातळीवर आघाडीच्या असलेल्या कार मूल्यमापन प्रोग्रॅमकडून 4 स्टार सेफ्टी रेटिंग फॉर ॲडल्ट ऑक्युपंट देण्यात आले आहे. या गाड्यांनी हा सुरक्षेचा मापदंड निश्चित केला आहे. रेनो कायगर उत्तम परफॉर्मन्स आणि स्पोर्टी ड्राइव्हचा अनुभव देते तर रेनो ट्रायबरमध्ये असामान्य दर्जा, मॉड्युलॅरिटी, आकर्षक डिझाइन, उत्तम व्हॅल्यू पॅकेजिंगचा अनुभव मिळतो.

सुरक्षांक अजून वाढवत रेनोच्या संपूर्ण रेंजमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅम (ईएसपी), हिल स्टार्ट असिस्ट (एचएसए), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम (टीसीएस) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (टीपीएमएस) स्टँडर्ड फीचर्स म्हणून समाविष्ट आहेत. ईएसपी आणि टीसीएस फीचर्स वाहनाला स्टेबिलिटी म्हणजेच स्थैर्य देतात आणि अपघाताची जोखीम कमी करतात तर टीपीएमएसमुळे ड्रायव्हरला टायर प्रेशरमध्ये सतत लक्ष ठेवता येते आणि त्यानुसार ॲडजस्टमेंट करता येते. परिणामी, रस्ते सुरक्षा व कार्यक्षमतेत वाढ होते. कायगर, ट्रायबर श्रेणी व क्विडच्या निवडक व्हेरिअंट्समध्ये असलेल्या हिल स्टार्ट असिस्ट (एचएसए) फीचरमुळे ग्राहकांपूर्ण परिपूर्ण मूल्य प्राप्त होते.

रेनो क्विडने त्यांचे एसयूव्ही प्रेरित डिझाइन भारतातील एन्ट्री सेगमेंटमध्ये नवा पायंडा पाडला. या गाडीचे समकालीन एसयूव्ही-प्रेरित डिझाइन लँग्वेज, या विभागातील सर्वोत्तम फीचर्स आणि वाजवी किंमत यामुळे रेनो क्विड लोकप्रिय झाली आहे. क्विडच्या एमटी व्हर्जनमध्ये 1.0L पॉवरट्रेनमधील नव्या आरएक्सई व्हेरिअंट रु.4.69 लाख या किमतीत सादर केल्याने ही गाडी अधिक आकर्षक झाली आहे. क्विडमध्ये ओआरव्हीएमवर टर्न इंडिकेटर्स आणि स्टिअरिंग माउंटेड ऑडियो व फोन कंट्रोल मिळतात. त्यामुळे गाडीत बसलेल्यांना अधिक सुविधा प्राप्त होते.

रेनो ट्रायबरमध्ये प्रत्येक रांगेतील आसनव्यवस्था ऐसपैस आहे, ज्यात एक ते सात प्रौढ व्यक्ती 4 मीटरहून कमी जागेत आरामात बसू शकतात. त्याचप्रमाणे या गाडीत 625L इतकी बुटस्पेस मिळते, जी या कॅटेगरीमधील एक सर्वात मोठी बूट स्पेस आहे. 2023च्या श्रेणीमधील क्रोम फिनिश एक्स्टिरिअर डोअर हँडल्स, त्याचप्रमाणे आसनांवरील आच्छादन (अपहोलस्टरी) ट्रायबर श्रेणीच्या आकर्षकपणात भर घालते.

नव्या बीएस VI स्टेप 2 अनुरूप रेनो रेंजची डिलिव्हरी रेनोच्या सर्व अधिकृत डीलरशिप्समधून आजपासून सुरू झाली आहे.

रेनो इंडिया भारत सरकारच्या मेक इन इंडिया व्हिजनप्रती प्रतिबद्ध आहे. चेन्नईमधील निर्मिती कारखाना, लॉजिस्टिक्स व तंत्रज्ञान केंद्र आणि डिझाइन स्टुडियोसह रेनोने भक्कम स्थानिक अस्तित्वावर भर दिला आहे. रेनो क्विड 2015 मध्ये लाँच करण्यात आली. 98% स्थानिकीकरणाच्या माध्यमातून या गाडीची निर्मिती करण्यात आली असून मेक इन इंडिया तत्वाची ही द्योतक आहे. मेक इन इंडिया तत्वावर भर देत रेनो इंडियाने 2019 मध्ये ट्रायबर आणि 2021 मध्ये कायगर लाँच केली. कायगर आणि ट्रायबर या दोन्ही गाड्यांची संकल्पना, विकास आणि निर्मितीत भारतात करण्यात आली आणि जगभरात पाठविण्याआधी त्या भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आल्या. या गाड्यांमध्ये भारतीय डिझाइन कौशल्य, इंजिनीअरिंग आणि जागतिक दर्जाच्या निर्मितीक्षमतांची सांगड घातली आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "रेनो इंडियातर्फे बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियम अनुरूप असलेली 2023ची नवीकोरी श्रेणी सादर"

Leave a comment

Your email address will not be published.


*