एयू बँकेकडून आणखी एक उद्योग अग्रणी नवोन्‍मेष्‍कारी क्रेडिट कार्ड ऑफरिंग – स्‍वाइपअप प्‍लॅटफॉर्म लाँच

AU Small Finance Bank Limited (AU Bank)

(L-R): Mr. Mayank Markanday, Head of Credit Card Business, Mr. Uttam Tibrewal, Executive Director, Sadeep Ghosh, Group Country Manager India & South Asia, Visa, Mr. Sanjay Agarwal,  MD & CEO, AU Small Finance Bank,  at the launch of AU Bank Credit Card SwipeUp Platform in Mumbai today.

इतर बँक क्रेडिट कार्डधारकांना मिनिटांमध्‍ये जलद डिजिटल प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे विद्यमान क्रेडिट कार्ड २ ते ३ सेकंदांमध्‍ये तुलना व अपग्रेड करण्‍यामध्‍ये केले सक्षम

मुंबई२३ जानेवारी २०२३ (GPN): एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक या भारतातील सर्वात मोठ्या स्‍मॉल फायनान्‍स बँकेने आज क्रेडिट कार्ड उद्योगातील अद्वितीय प्‍लॅटफॉर्म – स्‍वाइपअप प्‍लॅटफॉर्मच्‍या लाँचची घोषणा केली. या प्‍लॅटफॉर्मसह एयू बँक इतर बँक क्रेडिट कार्डधारकांना त्‍यांचे कार्ड एयू कार्ड क्रेडिट कार्डसपैकी एका कार्डमध्‍ये अपग्रेड करण्‍याची संधी देईल. बँकेने ग्राहकांना २ ते ३ सेकंदांमध्‍ये विद्यमान क्रेडिट कार्डसची तुलना करण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्म प्रदान केला आहे. त्‍यामुळे ते काही मिनिटांमध्‍येच जलद एण्‍ड-टू-एण्‍ड डिजिटल प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून क्रेडिट मर्यादा, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइण्‍ट्स अपग्रेड करू शकतात, ज्‍यामुळे क्रेडिट कार्ड त्‍यांच्‍या विद्यमान जीवनशैलीशी संलग्‍न होऊ शकते.

क्रेडिट कार्डस् दोन दशकांपासून प्रचलित आहेत आणि वर्षानुवर्षे उत्तम वाढीसह प्रगती करत आहेत. पण ग्राहकांच्‍या दृष्‍टीकोनातून पाहिले तर बहुतांश ग्राहक त्‍यांचे उत्‍पन्‍न व जीवनशैलीमध्‍ये सतत अपग्रेड करत असताना देखील अनेक वर्षांपासून तीच वैशिष्‍ट्ये व ऑफर्सचा वापर करत आहेत. क्रेडिट कार्ड अर्ज सबमिट करण्‍याच्‍यावेळी त्‍यांचे क्रेडिट कार्ड त्‍यांच्‍या जीवनशैलीनुसार आहेत. अनेक बँका क्रेडिट मर्यादा वाढवत असताना देखील वैशिष्ट्ये व लाभ बदललेले नाहीत. याचा अर्थ असा की ग्राहक त्‍यांच्‍या विद्यमान जीवनशैलीशी संलग्‍न होणारी क्रेडिट कार्ड वैशिष्‍ट्ये वापरत आहेत. एयू बँकेने ग्राहकांची ही गरज ओळखली आणि स्‍वाइपअप प्‍लॅटफॉर्मसह ही पोकळी भरून काढण्‍याचे ठरवले.

स्‍वाइपअप प्‍लॅटफॉर्म प्रामुख्‍याने इतर कोणत्‍याही बँकेचे क्रेडिट कार्ड असलेल्‍या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्‍यांना त्‍यांच्‍या विद्यमान जीवनशैलीशी संलग्‍न होणाऱ्या अपग्रेडेड क्रेडिट कार्डमधून लाभ मिळवून देऊ शकते. इतर बँकांच्‍या क्रेडिट कार्डधारकांना त्‍यांच्‍या विद्यमान क्रे‍डिट कार्डसचे तपशील मिळू शकतात आणि ते २ ते ३ सेकंदांमध्‍ये एयू क्रेडिट कार्डच्‍या अपग्रेडेड रेंजसाठी त्‍यांची पात्रता तपासू शकतात. या कार्डसमध्‍ये उच्‍च क्रेडिट मर्यादा, उच्‍च कॅशबॅक, सर्वोत्तम रिवॉर्ड पॉइण्‍ट्स, झीरो मेम्‍बरशीप शुल्‍क आणि त्‍यांच्‍या विद्यमान क्रेडिट कार्डमधून अपग्रेड करण्‍यात आलेली इतर विविध वैशिष्‍ट्ये आहेत.

स्‍वाइपअप प्‍लॅटफॉर्मवर जारी करण्‍यात आलेले क्रेडिट कार्डस् एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेने प्रदान केलेल्‍या विद्यमान क्रेडिट कार्डसपेक्षा वेगळी आहेत. कार्डसची नवीन श्रेणी ग्राहकांना उच्‍च मूल्‍य तत्त्व देत असले तरी कार्ड प्‍लास्टिक बायोडिग्रेडेबल आहे, जे पर्यावरणाच्‍या उत्तम संरक्ष्‍णाच्‍या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

या लाँचबाबत बोलताना एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे व्‍यस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अग्रवाल म्‍हणाले, ‘‘आम्‍ही नुकतेच क्रेडिट कार्ड उद्योगात प्रवेश केला असला तरी आमच्‍या टीमने नेहमी ग्राहकांच्‍या समस्‍या समजून घेण्‍यावर आणि तंत्रज्ञान नवोन्‍मेष्‍काराच्‍या माध्‍यमातून क्रांतिकारी सोल्‍यूशन्‍स शोधून काढण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षाच्‍या सुरूवातीला आम्‍ही लोकांना त्‍यांच्‍या गरजांनुसार कार्ड निर्माण करण्‍यास मदत करण्‍यासाठी पूर्णत: सानुकूल क्रेडिट कार्ड एलआयटी लाँच केले. एलआयटी क्रेडिट कार्ड नवीन एयू क्रेडिट कार्ड ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करत असले तरी यावेळी स्‍वाइपअपसह आम्‍ही इतर सर्व क्रेडिट कार्डधारकांना ‘बदलाव’चे स्‍वातंत्र्य देत आहोत. ‘लिव्‍ह लिमिटलेस’ या आमच्‍या क्रेडिट कार्ड बोधवक्‍याला पुढे घेऊन जात आम्‍ही ग्राहकांना त्‍यांच्‍या विद्यमान जीवनशैलीशी संलग्‍न होणाऱ्या सर्वोत्तम क्रेडिट कार्ड मूल्‍य तत्त्वाशी तुलना करण्‍याची व त्‍याबाबत उत्तमरित्‍या जाणून घेण्‍याची संधी देणारा हा प्‍लॅटफॉर्म सादर केला आहे. ग्राहक-केंद्रित बँक म्‍हणून आम्‍ही ग्राहकांच्‍या समस्‍या जाणून घेत राहू आणि त्‍यांच्‍या जीवनात अधिक सोयीसुविधांची भर करण्‍यासाठी तंत्रज्ञान-केंद्रित सोल्‍यूशन्‍स देणाऱ्या ऑफरिंग्‍ज डिझाइन करत राहू.’’

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू बँकेकडून आणखी एक उद्योग अग्रणी नवोन्‍मेष्‍कारी क्रेडिट कार्ड ऑफरिंग – स्‍वाइपअप प्‍लॅटफॉर्म लाँच"

Leave a comment

Your email address will not be published.


*