शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट, इंडियाबुल्स फायनान्स आणि पीएजी एकत्र येत आहेत, भारतातील सर्वात उंच लग्झरी टॉवर बांधण्यासाठी

Shapoorji Pallonji Real Estate

~ 300 मीटरहून उंच गगनचुंबी मिनर्व्हामध्ये व्हांटेज सीरिज  लाँच करूनत्या माध्यमातून 1500 कोटी रुपयांच्या संभाव्य उत्पन्नाचे लक्ष्य ~ 

मुंबई20 जानेवारी , 2023 (GPN): भारतातील सर्वांत उंच लग्झुरी गगनचुंबी इमारत असलेल्या दक्षिण मुंबईतील मिनर्व्हामध्ये, लवकरच, शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटच्या (SPRE) मार्गदर्शनाखाली, ‘व्हांटेज सीरिज’ निवास लाँच केले जाणार आहेत. 11.6 लाख चौरस फुटांच्या विक्रीयोग्य (सेलेबल) क्षेत्रासह उर्वरित इन्व्हेंटरीसाठी 1500 कोटी रुपयांचे संभाव्य उत्पन्न अपेक्षित आहे.  लोखंडवाला कटारिया कन्स्ट्रक्शन कंपनीने एसपीआरईची नियुक्ती प्रकल्प मार्केटिंग सल्लागार म्हणून केली आहे. या अल्ट्रा-लग्झुरियस प्रकल्पाला इंडिया बुल्स फायनान्स लिमिटेड व एपीएसीवर लक्ष केंद्रित करणारी आघाडीची गुंतवणूक फर्म पीएजी यांचे वित्तीय पाठबळ आहे.

या 300 मीटरहून अधिक  उंच 91 मजली गगनचुंबी इमारतीतून महालक्ष्मी रेसकोर्स व अरबी समुद्राचा देखणा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. प्रख्यात आर्किटेक्ट हफीझ काँट्रॅक्टर यांनी रचना केलेल्या व्हांटेज सीरिजमध्ये 54व्या मजल्यापासून वर फोर बीएचके अपार्टमेंट्स आहेत. या इमारतीत खासगी सनडेक्स, प्रशस्त लीव्हिंग रूम्स आणि मोठ्या बेडरूम्सचा समावेश असून, ही घरे आरामाची व्याख्या आणखी उच्च स्तरावर नेणारी आहेत.

या अल्ट्रा-लग्झुरियस प्रकल्पामध्ये 372 अपार्टमेंट्स  आहेत. उच्चभृ परिसरात उभी असलेली मिनर्व्हा अनेकविध सुविधा पुरवते. या सुविधा इमारतीच्या वेगवेगळ्या स्तरांवर विकसित करण्यात आल्या असून, घरमालकांच्या स्वास्थ्य, मनोरंजन व व्यवसायाच्या गरजांची पूर्तता या सेवांद्वारे होणार आहे. हा प्रकल्प महालक्ष्मीसारख्या मोक्याच्या ठिकाणी आहे. व्यावसायिक केंद्रे, आंतरराष्ट्रीय शाळा, मल्टि-स्पेशॅलिटी रुग्णालये, मॉल्स, क्लब, मल्टिप्लेक्सेस येथून अगदी जवळ आहेत.

अनेक सेलेब्रिटी व उद्योजकांनी यापूर्वीच संपन्न मिनर्व्हा प्रकल्पात घरे खरेदी केली आहेत. या प्रकल्पाला 51व्या मजल्यापर्यंत अंशत: ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) मिळाले आहे आणि 200हून अधिक घरांचे मालक लवकरच येथे निवासासाठी येणार आहेत. या प्रकल्पाचा पुनर्वसनाचा भागही पूर्णत्वाकडे पोहोचत आला आहे.

शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीवेंकटेश गोपालकृष्णन या प्रकल्पाबद्दल म्हणालेभारतातील सर्वांत उंच निवासी टॉवर लोखंडवाला मिनर्व्हाशी जोडले गेल्याचा शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटला अभिमान वाटतोअल्ट्रालग्झुरी विभागातील अस्तित्व विस्तारण्याच्या आमच्या धोरणाशी हा प्रकल्प सुसंगत आहे.

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स आणि पीएजीसारखी आघाडीची गुंतवणूक फर्म मिनर्व्हाचे वित्तीय भागीदार असल्यामुळेया प्रकल्पाबद्दलचा विश्वास खूप वाढला आहे.”

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या कमर्शिअल क्रेडिट विभागाचे प्रमुख श्रीराजीव गांधी म्हणालेशापूरजी पालोनजी रिअल इस्टेटच्या नियुक्तीमुळे आम्हाला आनंद झाला आहेहा सहयोग विश्वासस्पर्धात्मकता  कार्यान्वयनातील उत्कृष्टतेचे उदाहरण आहेकारणआम्ही मिनर्व्हा हा आख्यायिकेसारखा आरामदायी प्रकल्प निर्माण करत आहोत.”

पीएजी क्रेडिट अँड मार्केट्सचे भागीदार  व्यवस्थापकीय संचालक श्रीकनक कपूर पुढे म्हणालेआशियातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पासाठी एसपीआरईसोबत वित्तीय सहयोगी म्हणून सहभागी होताआले याचा आम्हाला आनंद वाटतोश्रेष्ठ दर्जाच्या सेवा देणारे उच्च दर्जाचे रिअल इस्टेट प्रकल्प विकसित करण्याच्या यासमूहाच्या क्षमतेबद्दल  आम्हाला विश्वास आहेमिनर्व्हा याचे महत्त्वाचे उदाहरण ठरणार आहे.”

लोखंडवाला कटारिया कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे (LKCPL) व्यवस्थापकीय संचालक श्रीअली लोखंडवाला म्हणालेभारतातीय सर्वांत उंच टॉवरच्या या महाकाय बांधकामाची संकल्पना  बांधकाम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहेहा प्रकल्प राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा आहेकारणयामुळे गगनचुंबी इमारतींच्या जागतिक यादीत भारताला स्थान मिळणार आहे.”

मिनर्व्हामध्ये बांधकाम तंत्रज्ञाने, पर्यावरणाची शाश्वतता व कार्यक्षमता यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रगत फॉर्म-वर्क तंत्रज्ञान, उच्च तांत्रिक उपकरणे आणि पूर्णपणे यांत्रिक प्रणालींचा उपयोग करून या प्रकल्पाच्या बांधकामाचा दर्जा उत्तम राखला जात आहे. पूर्ण झाल्यानंतर मिनर्व्हा हा भारतातील सर्वांत समृद्ध व उंच निवासी विकासांपैकी एक ठरेल आणि ‘लग्झुरी’ची व्याख्या नव्याने करेल.Ends

 

 

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट, इंडियाबुल्स फायनान्स आणि पीएजी एकत्र येत आहेत, भारतातील सर्वात उंच लग्झरी टॉवर बांधण्यासाठी"

Leave a comment

Your email address will not be published.


*