बँक ऑफ बडोदा’चा सन रन दुप्पट क्षमता, तंदुरुस्ती आणि धमाल मूडसह पुन्हा एकदा सज्ज

पीव्ही सिंधू’च्या हस्ते बीकेसीतील जिओ वर्ल्ड गार्डनमधून शर्यतीला हिरवा कंदील 

या रन’मध्ये 10 किमी बीओबी आणि 5 किमी बीओबी फन रनचा समावेश 

सुमारे 4,000 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग  

मुंबई, 18 जानेवारी, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक), ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक असून आज सन रन’च्या 2 ऱ्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली, ही शर्यत रविवारी, 29 जानेवारी 2023 रोजी रंगणार असून मुंबईकरांमध्ये धावण्याची इच्छा नक्कीच शिगेला पोहोचलेली असेल. मुंबईच्या वांद्रा-कुर्ला कॉमप्लेक्स येथील जिओ वर्ल्ड गार्डनवरून शर्यतीची सुरुवात होईल. त्यात 10 किमी अंतर निश्चित वेळेत गाठण्याचा बीओबी प्रो रन तसेच 5 किमी अंतर वेळेच्या निश्चित मर्यादेशिवाय कापणे अशा दोन प्रकारच्या शर्यतींचा समावेश राहील. त्याशिवाय, बँकेच्या वतीने झुंबा सेशन आणि लाईव्ह डीजे अशा अनेक गुंतवून ठेवणाऱ्या क्रियाकलापांची योजना आखली आहे. पीव्ही सिंधू ही भारताची बॅडमिंटन सुपरस्टार तसेच बँक ऑफ बडोदा’ची ब्रँड एंडॉर्सर असून तिच्या हस्ते सोहळ्याला हिरवा कंदील दाखविण्यात येईल.

बँक ऑफ बडोदा’च्या सन रन 2.0 मध्ये 4,000 हून अधिक स्पर्धक सहभागी होतील ही अपेक्षा वर्तविण्यात येते आहे आणि आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी समविचारी व्यक्तिंना एकत्र आणणे हा या शर्यतीचा उद्देश राहील. शर्यतीची नोंदणी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर होईल. सन रनकरिता स्पर्धकांना https://www.bankofbaroda.in/bankofbarodasunrun वर ऑनलाईन नोंदणी करता येईल.    

बँक ऑफ बडोदा’चे चीफ जनरल मॅनेजर – रिटेल लायबिलीटीज, मार्केटींग अँड गव्हर्नमेंट बिझनेस, बँक ऑफ बडोदा श्री पुरूषोत्तम म्हणाले, “धावणं, चालणं आणि सक्रिय राहणीमानाचं महत्त्व आपण सर्वच जण जाणतो. तसेच या सगळ्याचे आपलं शरीर तसेच मनाच्या सुदृढतेच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम आहेत. सन रन 2.0 ची घोषणा करताना आम्हाला आनंद वाटतो आहे आणि आपली तंदुरुस्ती, आरोग्य त्याचप्रमाणे धमाल करण्याच्या उद्देशाने समाजाला एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. बँक ऑफ बडोदा’चा सन रन 2.0 उत्साहवर्धक आणि धमाल मजेचा ठरेल याची खात्री वाटते.”

या शर्यतीच्या पुरुष आणि महिला गटातील शीर्ष 3 विजेत्यांना रोख बक्षिसे मिळतील, त्याचप्रमाणे सर्व सहभागींना पदक आणि ई-प्रमाणपत्र मिळतील. सर्व नोंदणीकृत सहभागींना एक सन रन 2.0 किट मिळेल. ज्यामध्ये एक कालबद्ध चिप बीआयबी, टी-शर्ट, पदक, प्रमाणपत्र आणि अल्पोपहाराचा समावेश असेल. पार्किंग, बॅगेज काउंटर आणि वॉशरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. 

बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांच्या एकत्रीकरणानंतर सन रनची पहिली आवृत्ती 2019 मध्ये साजरी झाली. कर्मचार्‍यांमध्ये सांघिक भावना आणि एकजूट वाढवण्यासाठी, तीन संस्थांच्या एकत्र येण्याचा उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने सन रन 1.0 ची रचना करण्यात आली होती. यावर्षी, बँकेच्या कर्मचार्‍यांसोबतच सर्वसामान्यांनाही सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने या रनची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. 

बीओबी फायनान्शियल सोल्यूशन्स लिमिटेड  ही बँक ऑफ बडोदाच्या सन रन 2.0 साठी सह-भागीदार आहे. तर इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोला एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि निवा बूपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे सहयोगी भागीदार आहेत.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदा’चा सन रन दुप्पट क्षमता, तंदुरुस्ती आणि धमाल मूडसह पुन्हा एकदा सज्ज"

Leave a comment

Your email address will not be published.


*