कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा मध्य भारतात विस्तार – जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह नवीन वैद्यकीय केंद्र आता इंदौर मध्ये सुरू

राष्ट्रीय, 18 जानेवारी २०२३ (GPN): भारतातील अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी हेल्थकेअर इन्स्टिट्यूट असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (कोकिलाबेन हॉस्पिटल)ने आज मध्यप्रदेश मधील इंदौर येथे एक अत्याधुनिक  सेवा रुग्णालय सुरू करून मध्य भारतातील रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या विस्ताराची घोषणा केली. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या अध्यक्षा टीना अंबानी यांच्या उपस्थितीत प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान आणि श्रीमती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी व्हर्च्युअली या सोहळ्याला उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी नेत्या श्रीमती जया बच्चन यादेखील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

कोकिलाबेन हॉस्पिटल इंदौरचे उद्घाटन ही भारतातील आरोग्य सेवांची पुनरव्याख्या करण्याच्या ब्रँडच्या कटीबद्धतेची पावती आहे. या वैद्यकीय केंद्रामुळे मध्य भारतातील लोकांना समर्पित वैद्यकीय व्यावसायिकांची टीम आणि जागतिक स्तरावर मापदंड ठरलेल्या क्लिनिकल परिणामांची खात्री देणारे सर्वोत्कृष्ट श्रेणीतील प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानासह उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविली जाईल.

विस्ताराबाबत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्षा टीना अंबानी म्हणाल्या, “गेल्या १४ वर्षांपासून आम्ही सिद्धहस्त जागतिक पद्धती आणि उपचार प्रोटोकॉलचे पालन करून अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत भारतातील आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. इंदौर येथील नवीन कोकिलाबेन हॉस्पिटलही याला अपवाद नाही. लोकांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा येथे सुलभपणे मिळतील. प्रत्येक रुग्णाला शक्य तितकी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि आधार प्रत्येक टप्प्यावर मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

अत्यंत प्रेमाने स्वागत केल्याबद्दल श्री. अमिताभ बच्चन यांनी इंदौरच्या जनतेचे आभार मानले आणि रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल श्रीमती टीना अनिल अंबानी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी कोकिलाबेन हॉस्पिटलच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा एक भाग आहे आणि या नवीन टप्प्याचा भाग झाल्याचा मला आनंद होत आहे. इंदौर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे आणि आज कोकिलाबेन हॉस्पिटल इंदौरच्या उद्घाटनसोबत मी हे अभिमानाने सांगतो की इंदौर हे भारतातील सर्वात आरोग्यदायी शहरांपैकीही एक असेल.”

आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांचे जागतिक मापदंड प्रस्थापित करण्यात कशा पद्धतीने योगदान दिले जात आहे हे बघता त्यांनी भारतातील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा सुविधा, वैद्यकीय कौशल्य आणि देशातील वैद्यकीय प्रतिभा यांचे कौतुक केले.

कोकिलाबेन हॉस्पिटल समूहाचे उद्दिष्ट जगातील सर्वोत्कृष्ट सेवांच्या बरोबरीने उच्च पातळीची आरोग्यसेवा प्रदान करून आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण करणे हे आहे. सर्व कोकिलाबेन हॉस्पिटल्सचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे FTSS (फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टम) मॉडेल असून ते आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय केंद्रांमध्ये प्रचलित असलेल्या पद्धतींशी सुसंगत आहे. ते चोवीस तास उपलब्धता आणि समर्पित तज्ञांपर्यंत सहज पोहोचता येणे  सुनिश्चित करते. हे रुग्णांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी एकाच छताखाली संसाधने, कौशल्य आणि क्षमता एकत्र आणते.

सुमारे १४ वर्षे आपल्या उच्च दर्जाच्या क्लिनिकल एक्सलन्ससाठी ओळखले जाणाऱ्या कोकिलाबेन हॉस्पिटल समूहाने गेल्या काही वर्षांत लाखो रुग्णांचा विश्वास जिंकला आहे. कोकिलाबेन हॉस्पिटल ग्रुपने मुंबईत आपले पहिले रुग्णालय स्थापन केले आणि त्यानंतर नवी मुंबई विभागात दुसरे हॉस्पिटल तसेच महाराष्ट्रातील अकोला, गोंदिया आणि सोलापूर येथे केअर सेंटर्स आणि गुजरातमध्ये विविध क्लिनिक आणि पॉइंट-ऑफ-केअर सेंटर्स उभारली. देशातील वैद्यकीय संशोधन पुढे नेत संस्थेने २५० हून अधिक संशोधन प्रकल्प, १०० आंतरराष्ट्रीय बहुकेंद्रित औषधांच्या चाचण्या केल्या असून आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये ३०० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. इंदौर सुपर स्पेशालिटी हे मध्य भारतातील पहिले फ्युचरिस्टिक पायाभूत सुविधा असलेले केंद्र असून या औपचारिक उद्घाटनानंतर सर्व सेवा सुविधांसह कार्यान्वित होईल.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा मध्य भारतात विस्तार – जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह नवीन वैद्यकीय केंद्र आता इंदौर मध्ये सुरू"

Leave a comment

Your email address will not be published.


*