एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली मासिक पाळी रजा

AU Small Finance Bank

तसेच विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी इंडस्‍ट्री फर्स्‍ट ‘एयू फॉरेव्‍हर पास’ची घोषणा 

मुंबई, 16 जानेवारी 2023 (GPN): एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक ही भारतातील सर्वात मोठी स्‍मॉल फायनान्‍स बँक आज आपल्‍या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा देणाऱ्या भारतीय कंपन्‍यांच्‍या यादीमध्‍ये सामील झाली. तसेच बँकेने विद्यमान ग्राहकांसाठी इंडस्‍ट्री फर्स्‍ट एनिशिएटिव्‍ह ‘एयू फॉरेव्‍हर पास’ची देखील घोषणा केली.

एयू बँकेच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये ‘वैविध्‍यता व सर्वसमावेशन’ यांना प्राधान्‍य दिले जाते आणि मासिक पाळी रजा धोरणासह बँकेचा महिलांना मान्‍य रजेव्‍यतिरिक्‍त मासिक पाळी रजा धोरणांर्गत दर महिन्‍याला अतिरिक्‍त भरपगारी १ दिवसाची रजा देत त्‍यांच्‍यासाठी सर्वसमावेशक कार्यस्‍थळ निर्माण करण्‍याचा उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी २०२३ पासून या धोरणाची अंमलबजावणी करण्‍यात येईल.

इंडस्‍ट्री फर्स्‍ट इनिशिएटिव्‍ह म्‍हणून बँकेने ३ वर्षांच्‍या सेवेनंतर कंपनी सोडलेल्या कर्मचार्‍यांसाठी खास ‘एयू फॉरेव्‍हर पास’ देखील सुरू केला आहे. बाहेर पडण्याच्या वेळी सुवर्ण-मानक सेवा रेकॉर्ड आणि बँकेच्या वाढीमध्ये अपवादात्मक योगदान असलेल्या निवडक पात्र कर्मचाऱ्यांना ‘एयू फॉरेव्‍हर पास’ सदस्यत्व दिले जाईल, जे उमेदवारांना त्यांच्या इच्छेनुसार एयू एसएफबी मध्ये परत सामील होण्याची खात्रीशीर संधी देते.

हा क्रांतिकारी कर्मचारी केंद्रित उपक्रम सुरू करण्‍यामागील उद्देशाबाबत सांगताना एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी संचालक श्री. संजय अग्रवाल म्‍हणाले, ‘‘आमच्‍या ‘बदलाव’ तत्त्वांतर्गत आम्‍ही आमच्‍या कंपनीला सर्वांसाठी अधिक सहाय्यक व सर्वसमावेशक करण्‍यासाठी आवश्‍यक परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती काम करत आहोत. कार्यस्‍थळाची संस्‍कृती महिला व बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विविध कर्मचाऱ्यांच्‍या गरजा जाणून घेईल तेव्‍हाच सर्वसमावेशक मानली जाऊ शकते. मासिक पाळी रजा सारखी कर्मचारी-केंद्रित धोरणे कंपनीला संवेदनशील बनवून कर्मचारी वर्गात प्रवेश करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याचा मार्ग मोकळा करू शकतात. त्याचप्रमाणे, वैयक्तिक गरजा किंवा व्यावसायिक आकांक्षांमुळे आमची कंपनी सोडणाऱ्या आमच्या कर्मचार्‍यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ‘एयू फॉरेव्‍हर पास’ सुरू करण्यात आला आहे. ‘बदलाव’च्या या प्रवासात आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत सहयोगाने पुढे वाटचाल करत राहू.’’

एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे एचआर प्रमुख श्री. विवेक त्रिपाठी म्‍हणाले, ”महामारीदरम्‍यान आणि महामारीनंतर एयू बँकेने कार्यस्‍थळाला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित व आरोग्‍यदायी बनवण्‍यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. नुकतेच बँकेने कर्मचारी, कुटुंबं व समुदायांच्‍या बदलत्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी ‘एयू फॉरेव्‍हर पास’ उपक्रम, मासिक पाळी रजा धोरण, वाढदिवसाची रजा, लग्नाच्या वाढदिवसाची रजा, पितृत्व रजा, देणगी पत्त्याचे धोरण, दीर्घकाळ सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी सशुल्क सब्बॅटिकल रजा, शैक्षणिक सहाय्य उपक्रम, वैयक्तिक कर्ज धोरण, आणि सवलतीचे गृहकर्ज धोरण आणले आहे.

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली मासिक पाळी रजा"

Leave a comment

Your email address will not be published.


*