बँक ऑफ बडोदाने मिलिंद सोमण यांच्यासोबत ‘ग्रीन राइड’च्या दुस-या पर्वाची घोषणा केली

#BOBGreenRideWithMilind 2.0

Shri Sanjiv Chadha, Managing Director & CEO, Bank of Baroda And Mr. Milind Soman

मुंबई, 16 डिसेंबर, 2022 (GPN): भारतातील आघाडीच्या सार्वजनिक बँकापैकी एक असणा-या बँक ऑफ बडोदा या बँकेतर्फे आज ग्रीन राइड – एक पहल स्वच्छता की ओर या उपक्रमाचे दुसरे पर्व लाँच करण्यात आले. पर्यावरण प्रसारक व फिटनेस चाहते मिलिंद सोमण यांच्या साथीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मिलिंद सोमण सायकल व इलेक्ट्रिक स्कूटरवरून 8 दिवसांच्या शाश्वत प्रवासाची सुरुवात करणार आहेत. या माध्यमातून ते पर्यावरणस्नेही वाहनांचा, हरित जीवनशैलीचा तसेच आरोग्य व फिटनेसचा प्रचार करणार आहेत.

या 1400 किमीच्या राइडची मुंबईहून 19 डिसेंबर रोजी सुरुवात होईल आणि मंगळुरूला 26 डिसेंबर 2022 रोजी त्याची सांगता होईल. या प्रवासात मिलिंद पुणे, बंगळुरू व म्हैसूरला भेट देणार आहेत. प्रत्येक शहरात ते बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी, ग्राहक आणि त्यांच्या चाहत्यांना भेटणार आहेत आणि शुद्ध हवेच्या महत्त्वाच्या संदेशाचा प्रसार करणार आहेत. शाश्वत व ऊर्जासक्षम वाहतूक पर्यायांचा वापर करण्यास व प्रत्येकाने आपल्या आयुष्यात फिटनेसला प्राधान्य द्यावे यासाठी प्रोत्साहन देणार आहेत.

या सहयोगाबद्दल बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ श्री. संजीव चड्ढा म्हणाले, “पर्यावरण संरक्षणामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे याची जाणीव वाढू लागली आहे. प्रदूषणाचे अनेक घातक परिणाम आहेत आणि शाश्वत जीवनशैलीच्या दृष्टीने लहान पावले टाकून आपणही हरित वातावरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. ग्रीन राइडसाठी श्री. मिलिंद सोमण यांच्याशी सहयोग करताना बँक ऑफ बडोदाला प्रचंड आनंद होत आहे. आम्ही या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि एकत्रित कृती करण्यासाठी सर्व भारतीयांना एकत्र आणतो.”

“पर्यावरण संवर्धनासाठी बँक ऑफ बडोदाने काही पावले उचलली आहेत. “प्लांट अ ट्री” (वृक्षारोपण) या उपक्रमांतर्गत पुढील तीन वर्षात वाटप होणा-या प्रत्येक ऑटो लोन आणि होम लोनसाठी बँकेतर्फे एक फळझाड लावण्यात येईल. अंतर्गत मंजुरीसाठी आम्ही पेपरलेस ऑफिस केले आहे, जेणेकरून संपूर्ण संस्थेतील कागद वापर कमी होऊ शकेल.”, अशी पुष्टी श्री. चड्ढा यांनी केली.

मिलिंद सोमण म्हणाले, “माझा लोकांना सोपा संदेश आहे. आपल्याकडे श्वास घ्यायला शुद्ध हवाच नसेल तर एक समाज म्हणून आपण केलेली सर्व प्रगती व साध्य केलेली आधुनिकता व्यर्थ आहे. जर आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात बदल घडवला. म्हणजे इंधनयुक्त वाहनाऐवजी चालण्याचे/सायकल चालविण्याचे ठरवले, रोप लावले, रियुझ/रिसायकल तत्वाचे अनुसरण केले तर आपण एकत्रितपणे पर्यावरणाच्या संवर्धात योगदान देऊ शकू. गेल्या वर्षी पहिल्या ग्रीन राइडचा अनुभव सद्गदित करणारा होता. त्यावेळी लोकांनी दाखवलेला उत्साह व जोश अजूनही माझ्या मनात ताजा आहे. म्हणून, आरोग्यदायी व अधिक शाश्वत अस्तित्वाचा संदेश पोहोचविणाऱ्या या वर्षीच्या राइडसाठीही मी उत्सुक आहे.”
——————————————————————————————————–

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाने मिलिंद सोमण यांच्यासोबत ‘ग्रीन राइड’च्या दुस-या पर्वाची घोषणा केली"

Leave a comment

Your email address will not be published.


*