जीवनाचा उत्सव—दात्री (DATRI) आणि नारायण हेल्थच्या एसआरसीसी(SRCC) चिल्ड्रन्स हॉस्पिटलने डोनर्स आणि प्राप्तकर्ता यांची भेट आयोजित केली

मुंबई, 7 डिसेंबर, 2022 (GPN):- रक्ताचा कर्करोग आणि रक्ताचे विकार असलेल्या रुग्णांना ब्लड स्टेम सेल्सचे दान करून त्यांचा जीव वाचवणार्‍या डोनर्सनी ब्लड स्टेम सेल्स प्राप्तकर्त्यांची भेट घेतली.

आपला डोनर शंकर रामचंद्रन याला मंचावर येताना पाहून छोट्या जान्हवी गोधेला आपल्या भावना अनावर झाल्या. जान्हवी त्याच्या पायांवर कोसळली, तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि तिचा गळा दाटून आला. ती म्हणाली, “आज मी हे जग बघू शकत आहे ते फक्त तुमच्यामुळे. धन्यवाद काका!” संपूर्ण वातावरणच भारावून गेले होते. श्री. रामचंद्रन यांनी दात्री (DATRI) च्या माध्यमातून जान्हवीला ब्लड स्टेम सेल्स दान करून तिचा जीव वाचवला होता. हे ट्रान्सप्लांटेशन नारायण हेल्थ, मुंबईद्वारा संचालित एसआरसीसी(SRCC)चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे करण्यात आले होते.

बोन मॅरो आणि स्टेम सेल डोनर्स यांनी जीवनदान देऊन विविध ब्लड कॅन्सर आणि रक्त विकारांनी पीडित रुग्णांना जगण्याची आणखी एक संधी दिली त्याचा आनंद साजरा करण्यासाठी दात्री आणि नारायण हेल्थ, मुंबईद्वारा संचालित एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे डोनर्स आणि प्राप्तकर्ते यांची एक भेट मंगळवारी, मुंबई येथे आयोजित केली होती. ही भेट म्हणजे डोनर्स आणि प्राप्तकर्ते यांना आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी मिळालेला एक मंच होता. या मंचावरून पीडित लोकांना उपचारांत मदत करण्यासाठी व त्यांच्या जीवनात सुखद बदल घडवून आणण्यासाठी स्टेम सेल्स डोनेशनसाठी पुढे येण्यास लोकांना प्रोत्साहन देखील मिळाले.

या प्रसंगी बोलताना नारायण हेल्थ द्वारा संचालित एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथील पेडियाट्रिक हेमेटॉलॉजी ऑन्कॉलॉजी अँड बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. रुचिरा मिश्रा म्हणाल्या, “जेव्हा आमच्याकडे आलेली कोवळी मुले अशा जीवघेण्या रोगाच्या धोक्यातून वाचतात, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. दोनेक वर्षांपूर्वी आमच्या बीएमटी(BMT) प्रोग्रामची सुरुवात झाली, तेव्हापासून आम्ही 100 पेक्षा जास्त पेडियाट्रिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले आहेत. दात्री या ना-नफा डोनर नोंदणी संस्थेचे डोनर्सना शोधण्यात मोठे योगदान आहे. दात्रीकडे ब्लड स्टेम सेल्स डोनर्सचा मोठा डेटाबेस आहे, ज्याचा उपयोग आम्हाला डोनर्सची प्रतीक्षा करत असलेल्या अनेक ब्लड कॅन्सर आणि थेलेसेमियाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी होतो.”

आशुतोष नावाच्या रूग्णाला ब्लड स्टेम सेल्सचे दान करून जीवनदान देणारा डोनर नवीन देखील आनंदाने भारावून गेला होता. तो म्हणाला, “यासारखी संधी जीवनात एकदाच येते, अशावेळी आपला हात पुढे करण्यात आपण कसूर करता कामा नये. या जीवन रक्षक मिशनमध्ये सहभागी झाल्याचा मला आनंद आहे.”

या प्रसंगी बोलताना कौन्सेलिंग आणि ट्रान्सप्लांट मॅनेजमेंट, दात्रीच्या प्रमुख सुमती मिश्रा म्हणाल्या, “रक्ताचा कर्करोग आणि थेलेसेमियासारख्या घातक रक्त विकारांनी ग्रासलेल्या लोकांसाठी ब्लड स्टेम सेल्स ट्रान्सप्लांट ही जगण्यासाठीची एकमेव आशा आहे. प्रत्येक जण ब्लड स्टेम सेल्स डोनेशन बाबत जागरूकता आणून जीवन दान देऊ शकतो. प्रत्येक गरजू रूग्णाला अनुरूप डोनर शोधून देणे हाच दात्रीचा प्रयत्न असतो. हेच दात्रीचे मिशन आहे.”
नारायण हेल्थ द्वारा संचालित

एसआरसीसी(SRCC)चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथील पेडियाट्रिक हेमेटॉलॉजी ऑन्कॉलॉजी अँड बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. पूर्णा कुरकुरे म्हणाल्या “जागरूक राहा आणि देखभाल करण्यासाठी शेअर करा.” जर आपण या मिशनसह एकत्र काम केले, तर आपण जास्तत जास्त मुलांना बरं करून त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनवू शकतो. हळूहळू बीएमटी(BMT)चे परिणाम आणि यशाचा दर सुधारत चालला आहे, आणि आत्ता तो 70% ते 80%च्या मध्ये आहे.”Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "जीवनाचा उत्सव—दात्री (DATRI) आणि नारायण हेल्थच्या एसआरसीसी(SRCC) चिल्ड्रन्स हॉस्पिटलने डोनर्स आणि प्राप्तकर्ता यांची भेट आयोजित केली"

Leave a comment

Your email address will not be published.


*