एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेने लॉन्च केले १०००वे बँकिंग टचपॉइण्‍ट

AU Small Finance Bank Limited (AU Bank)

बेंगळुरूमधील इंदिरा नगर शाखेच्‍या उद्घाटनासह दक्षिण भारतातील उपस्थिती १८ बँकिंग टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढवली 

मुंबई, 7 डिसेंबर, 2022 (GPN):- एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक या भारतातील सर्वात मोठ्या स्‍मॉल फायनान्‍स बँक आणि झपाट्याने विकसित होणा-या रिटेल बँकेने आज इंदिरा नगर, बेंगळुरू येथे त्‍यांच्‍या १०००व्‍या बँकिंग टचपॉइण्‍टचे उद्घाटन केले. हा एयू एसएफबीच्‍या भारतभरातील उपस्थिती वाढवण्‍याच्‍या प्रवासामधील लक्षणीय बेंचमार्क आहे, तसेच शहरातील आठ बँकिंग टचपॉइण्‍ट्ससह भारताच्‍या सिलिकॉन व्‍हॅलीमधील बँकेची उपस्थिती अधिक दृढ झाली आहे. कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे माजी-अध्‍यक्षमुख्‍य कार्यकारी अधिकारी व ग्रुप मेडिकल डायरेक्‍टर डॉ. नंदकुमार जयरामनिवृत्त पोलिस महानिरीक्षक व इंदिरानगर क्‍लबचे विद्यमान अध्‍यक्ष (माजी आयपीएस) श्री. बी. एन. एस. रेड्डीतसेच एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेच्‍या ब्रांच बँकिंगचे राष्‍ट्रीय व्‍यवसाय व्‍यवस्‍थापक श्री. अविनाश शरन आणि एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे सर्कल मॅनेजर (साऊथ) श्री. लॉईड जोसेफ लोबो यांच्‍या हस्‍ते शाखेचे उद्घाटन करण्‍यात आले.

बँकेने प्रबळ रिटेल फ्रँचायझी तयार करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे एयू बँक दक्षिणेमध्ये आपले अस्तित्व मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, जेथे कर्नाटक हे गेटवे आहे. कर्नाटक राज्याचा देशामध्ये ५व्या क्रमांकाचा जीडीपी आहे, ज्‍याचे श्रेय त्यांच्या मजबूत आयटी सेवा उद्योगाला जाते आणि भारतातील नोकऱ्यांमध्ये त्याचे योगदान १० टक्‍के आहे. राज्याची मजबूत अर्थव्यवस्था बँकिंग विभागासाठी राज्‍याला महत्त्वपूर्ण बाजारपेठ बनवते, ज्‍यामधून ठेवी आणि क्रेडिट्सच्‍या उच्च क्षमतेची खात्री मिळते. राज्य १२ लाख कोटी रुपयांची तिसरी सर्वात मोठी डिपॉझिट बाजारपेठ आणि ८ लाख कोटी रुपयांची चौथी सर्वात मोठी क्रेडिट बाजारपेठ आहे. एकट्या बंगळुरूचा राज्‍यामध्‍ये वाटा जवळपास ९ लाख कोटी रूपयांच्या ठेवीचा  आहे आणि दक्षिण भारतातील एयूच्या विस्तार योजनेतील एक प्रमुख शहर आहे.

या विकासाबाबत बोलताना एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे कार्यकारी संचालक श्री. उत्तम तिब्रेवाल म्‍हणाले, “आज आम्‍ही १००० टचपॉइण्‍ट टप्‍प्‍यावर पोहोचलो आहेात आणि ३०० हून अधिेक टचपॉइण्‍ट्ससह साडेपाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्‍या प्रवासाकडे पाहताना अत्‍यंत अभिमान वाटतो. या कालावधीदरमयान आम्‍ही ७७,८०० कोटी रूपयांहून अधिक ताळेबंद आकार, ५८,३०० कोटी रूपयांहून अधिक ठेवी आणि ५२,४०० कोटी रूपयांहून अधिक ग्रॉस ॲडवान्‍स निर्माण करण्‍यासोबत स्थिरगतीने ग्रॅन्‍युलेरिटी सुधारत आहोत. या प्रवासातून आम्ही जो प्रभाव पाडू शकलो ते पाहून आनंद वाटतो. ग्राहकांच्या उच्च सहभागासह उत्पादने, सेवा आणि डिजिटल सोल्यूशन्सचा सर्वसमावेशक समूह तयार करण्यावर मुख्य लक्ष केंद्रित केले आहे. बँकिंग म्हणजे वितरण व ग्राहकांपर्यंत पोहोचणे. सुलभतेसाठी, आम्ही आमच्या AU0101 अॅपद्वारे बँकेचे डिजिटल वितरण साध्य केले आहे, जे व्यावहारिकपणे ग्राहकांच्या हँडसेट्सवर बँकिंग सुविधा देते. व्हिडिओ बँकिंगद्वारे, आमचे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार ४०० हून अधिक सेवांचा लाभ घेऊ शकतात. आता, आम्ही दक्षिणेकडील राज्यांतील ग्राहकांना आमच्या उत्कटतेने आणि दीर्घकालीन संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून सेवा देण्याचा प्रयत्न करतो. बचत खात्यावर मासिक व्याज भरणे, वाढीव बँकिंग तास आणि कोणतीही ठेव किंवा पैसे काढण्याची स्लिप यांसारख्या आमच्या प्रमुख वैशिष्ट्यांचा लाभ या भागातील ग्राहकांना मिळावा अशी आमची इच्छा आहे. ते बचत खाते व ठेवींवर स्पर्धात्मक आणि ग्राहक अनुकूल व्याजदराचा देखील लाभ घेऊ शकतात.’’

दक्षिण भारतासाठी एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेच्‍या विस्‍तारीकरण योजनेबाबत बोलताना एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेच्‍या ब्रांच बँकिंगचे राष्‍ट्रीय व्‍यवसाय व्‍यवसथापक श्री. अविनाश शरन म्‍हणाले, “आम्ही दोन वर्षांपूर्वी तीन शाखांसह दक्षिण भारतात प्रवेश केला. गेल्या ११ महिन्यांत, आम्ही महत्त्वाकांक्षीपणे जवळपास ७०० कोटींचे डिपॉझिट बुक तयार करताना दक्षिणेतील १८ टचपॉइण्‍ट्सपर्यंत आमची उपस्थिती वाढवली आहे. बेंगळुरू ही भारताची सिलिकॉन व्हॅली आहे आणि या शहराने गेल्या काही वर्षांत अनेक युनिकॉर्न्‍स निर्माण केले आहेत. यामधून राज्यातील व्यवसायासाठी अनुकूल वातावरणाची खात्री मिळते. मोठे आयटी उद्योग, एरोस्पेस हब आणि बायोटेक हबवर भरभराट करणाऱ्या पगारदार, स्वयंरोजगार आणि लघु व्यावसायिक विभागासाठी आमच्या बँकिंग सेवा ग्राहकांचा विश्वास जिंकून आम्हाला राज्यात आमचा व्यवसाय प्रबळ करण्यास मदत करतील.”

कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे माजी-अध्‍यक्षमुख्‍य कार्यकारी अधिकारी व ग्रुप मेडिकल डायरेक्‍टर डॉ. नंदकुमार जयराम म्‍हणाले, “आमच्या शहरामध्‍ये एयू बँकेच्या १०००व्या बँकिंग टचपॉइण्‍टचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकेचे आर्थिक समावेशनावर प्रबळ लक्ष केंद्रित आहे आणि ग्राहकांना सेवा देण्यासाठी अविरतपणे काम करण्याचा बँकेचा व्यापक अनुभव आहे, मला खात्री आहे की आमच्या शहरातील रहिवाशांना, तसेच संपूर्ण दक्षिण भारतातील रहिवाशांना येथे एयू बँकेच्या विस्तारामुळे खूप मोठा फायदा होईल.”

निवृत्त पोलिस महानिरीक्षक आणि इंदिरानगर क्‍लबचे विद्यमान अध्‍यक्ष (माजी आयपीएस) श्री. बी. एन. एस. रेड्डी म्‍हणाले, ‘’बेंगळुरूमधील लोक हे भारतातील सर्वात जास्त तंत्रज्ञान जाणकार आहेत. त्यामुळे, एयू स्मॉल फायनान्स बँक सारख्या तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील बँकेच्या सेवा बेंगळुरूमधील ग्राहकांसाठी खूप अर्थपूर्ण आहेत. त्यांनी सुपर अॅप AU0101 आणि व्हिडिओ बँकिंगचा डिजिटल स्टॅक तयार केल्‍याचा मला खूप आनंद होत आहे, जो ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा देतो.’’

एयू बँकेने बँकिंग सुविधा सुलभ करण्यासाठी अनेक उद्योग-अग्रणी डिजिटल बँकिंग प्रयत्न हाती घेतले आहेत. बँक चालू खाती व मुदत ठेवींसह टॅब्लेटवर सर्व डिपॉझिट अकाउंट डिलिव्हर करत आहे आणि कर्ज मागणाऱ्या क्लायंटसाठी टू-व्हीलरवर एंड-टू-एंड डिजिटल ट्रिप देत आहे. एयू बँक ही स्वतःची क्रेडिट कार्डे उपलब्ध करून देणारी पहिली आणि एकमेव स्‍मॉल फायनान्सिंग बँक आहे.Ends

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेने लॉन्च केले १०००वे बँकिंग टचपॉइण्‍ट"

Leave a comment

Your email address will not be published.


*