अपग्रॅड चार शहरांमध्ये विस्तार करणार. विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणासाठी ३,३५,००० चौरस फूट जागा अपग्रॅडने घेतली

Upgrad Logo

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२२ (GPN): अपग्रॅड ने आपली वाढ आणि विस्तार कायम ठेवत भारतातील आणि जगातील विद्यार्थ्याना प्रभावित करून त्यांना नोकरी साठी तयार करण्याचे योजले आहे. आतापर्यंत ‘वन अपग्रॅड’ ने ८.२ मिलियन एवढ्या शिकणाऱ्या व्यक्तींना सॉफ्टस्किल्स,परीक्षेची तयारी, महाविद्यालयांशी जुडलेले उपक्रम, नोकरी मिळविणे, कामात बदल आणि करियर मध्ये सुधारणा यामध्ये तयार केले आहे. अपग्रॅडने गेल्या काही महिन्यांमध्ये चार शहरांमध्ये ३,३५००० चौरस फूट एवढी जागा कार्यालयीन जागेसाठी, ऑफलाइन कॅम्पस साठी, शिकणाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था म्हणून, शिक्षक व विद्यार्थ्याना ट्रेनिंग साठी खोल्या बनविण्यासाठी आणि स्टुडियोज साठी वापरायला नवीन भाडेतत्वावर  घेतली आहे. नोव्हेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीमध्ये १४०० हून जास्त कर्मचारी भारतात आणि जगातील अन्य कार्यालयांमध्ये घेण्यात येतील.

श्री.मयंक कुमार, सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक, अपग्रॅड म्हणाले की,“देशांतर्गत विस्तारला आमच्यासाठी प्राधान्य आहे. आमचे बिझनेस मॉडेल दर तिमाही मध्ये १००% हून जास्त परिणाम देत आहोत. आमच्या प्रभावाची व्याप्ती वाढवायला आम्ही आमचा नफा पुन्हा गुंतवणे आवश्यक आहे. आम्ही जे नवीन सदस्य घेत आहोत त्यांच्यासाठी आम्ही आमच्या जागेचा विस्तार करीत आहोत. आमचे लक्ष्य उत्तम ऑनलाइन डीलिवरी करणाऱ्या मॉडेल वर असले तरी आम्ही आमच्या आताच्या आणि भविष्यातील विद्यार्थ्यांना ते जेव्हा स्वतः साठी योग्य प्रोग्राम निवडत असतात तेव्हा त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी प्रोत्साहित करतो. प्रत्यक्ष भेटीतून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनभरच्या शिकण्याच्या प्रवासामध्ये अधिक जवळ येतो.”

विद्यार्थी त्यांच्या सुविधेची रचना तयार करण्यासाठी वास्तुविशारद ही होत आहेत अशा शिकाऊ गृहनिर्माण कार्यक्रमासाठी मुंबईत दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळाची जागा, ‘नॉलेजहट’ चे बूट-कॅम्प मध्ये विस्तार करण्यासाठी बंगळूर मध्ये २०,००० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा, टॅलेंटएड्जच्या विस्तारासाठी २५,००० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा पुण्यामध्ये, नोयडातील सेक्टर १२५ मध्ये त्यांच्या ‘अपग्रॅड अबरॉड’- परदेशी शिकण्याच्या विभागासाठी ४०,००० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा आणि नोयडातील सेक्टर ५८ मध्ये जेथे दररोज २५ लाख हून जास्त व्यूज् मिळणाऱ्या २५ यूट्यूब चॅनलसाठी जेथून काम होते असे ४५ हून जास्त स्टुडिओ. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणाऱ्या ५ लाख हून जास्त इच्छुकांना प्रशिक्षित केले जात आहे अशा शासकीय परीक्षांच्या तयारीच्या केंद्रासाठी ५०,००० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा अपग्रॅडने घेतली आहे.Ends   

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अपग्रॅड चार शहरांमध्ये विस्तार करणार. विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणासाठी ३,३५,००० चौरस फूट जागा अपग्रॅडने घेतली"

Leave a comment

Your email address will not be published.


*