‘बॉर्न टू शाइन’ ने केली आपल्या ३० विजेत्यां मुलींची घोषणा!

BORN TO SHINE - A ZEEL CSR INITIATIVE Brand Logo

Zee’s flagship CSR initiative- Born To Shine felicitates 30 girl child prodigies

Ace violinist Dr. Sangeeta Shankar and her daughters Ragini and Nandini performing at Born to Shine’s Award Ceremony (ZEE’s CSR initiative in association with GiveIndia)

The Sarod icons – Amaan Ali Bangash and Ayaan Ali Bangash performing at Born to Shine’s Award Ceremony (ZEE’s CSR initiative) in Mumbai

मुलींना कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांचे कौशल्य साध्य करण्यासाठी त्यांना सक्षम करणे ‘बॉर्न टू शाइन’ चे उद्दिष्ट

मुंबई, १४ नोव्हेंबर २०२२ (GPN): झी चा प्रमुख सीएसआर उपक्रम ‘बॉर्न टू शाइन’ ने गिव्ह इंडिया सोबत भागीदारी करून मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात आघाडीच्या ३० मुलींचा सत्कार केला. भारतीय कला प्रकार आणि प्रतिभावान मुलींच्या विलक्षण यशोगाथा साजरी कारण्यासाठी हा कार्यक्रम होता. प्रसिद्ध सरोदवादक अमान आणि अयान अली बंगश, प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. संगीता शंकर आणि त्यांच्या मुली रागिणी आणि नंदिनी, आणि प्रख्यात नृत्यांगना गुरू शुभदा वराडकर यांनी विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमात सादरीकरण केले. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक-मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित गोयंका, स्वदेस फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त-संचालक जरीना स्क्रूवाला, सुब्रमण्यम अॅकडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिंदू सुब्रमण्यम; CARER च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समारा महिंद्रा आणि ब्रह्मनाद कल्चरल सोसायटीचे संस्थापक रूपक मेहता यांनी परीक्षक मंडळातील स्थान भूषविले आणि संपूर्ण कार्यक्रमात सादर झालेल्या अतुलनीय प्रतिभेने त्यांना मंत्रमुग्ध केले. या विलक्षण सदस्यांचा स्वतंत्र सत्कार यावेळी परीक्षकांतर्फे करण्यात आला.

मे २०२२ मध्ये सुरू झालेल्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे उद्दिष्ट मुलींच्या उत्तुंग प्रतिभेचे पालनपोषण करणे तसेच कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांच्या कौशल्यांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना सक्षम करणे हे आहे. ५ ते १५ वयोगटातील मुलींसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमाला देशभरातून ५,००० हून अधिक पात्र अर्ज प्राप्त झाले आणि निवडलेल्या उमेदवारांची ८ शहरांमध्ये ऑडिशन घेण्यात आली.

पुनित गोयंका, व्यवस्थापकीय संचालक – मुख्य कार्यकारी अधिकारी, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड म्हणाले, “एक राष्ट्र म्हणून खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी आपण मुली आणि त्यांच्या अद्वितीय क्षमतांना चालना दिली पाहिजे. कारण त्या आपल्या देशाचा अभिमान आणि भविष्य आहेत! झी मध्ये आम्ही आमच्या पडद्यावरील आशयाद्वारे केवळ साचेबद्ध रूढीना छेद देतो असे नाही तर तळागाळातील महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी  विविध सामाजिक उपक्रमांद्वारे देखील या बदलाला प्रेरणा देण्यात एक छोटीशी भूमिका बजावतो याबद्दल आम्हाला धन्यता वाटत आहे. मुलींच्या पंखांमध्ये वारा भरून आणि त्यांच्या यशासाठी स्प्रिंगबोर्ड सारखे काम करून त्यांचे जीवन समृद्ध करण्याचा ‘बॉर्न टू शाइन’ हा आमचा आणखी एक प्रयत्न आहे. मला खरोखर आशा आहे निवडलेल्या ३० मुलींना त्यांची आवड जोपासण्यास आणि उत्तुंग यश मिळविण्यास मदत करेल आणि परिणामी आपल्या देशातील समृद्ध कला आणि संस्कृतीला जीवनाचा एक नवीन आयाम देईल.”

जरीना स्क्रूवाला, व्यवस्थापकीय विश्वस्त-संचालक, स्वदेस फाउंडेशन म्हणाल्या,“तरुण मुलींना कला आणि संस्कृतीचा पाठपुरावा करण्यासाठी सक्षम बनवणे हा उद्देश ठेवणाऱ्या एकमेवाद्वितीय शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी मी  ZEEL आणि गिव्ह इंडिया चे अभिनंदन करू इच्छिते. मला आशा आहे की बॉर्न टू शाइन सारख्या प्रयत्नांमुळे आपला समाज कलाकृतींना करिअरचा पर्याय म्हणून लवकरच स्वीकारण्यास सुरुवात करेल!”Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "‘बॉर्न टू शाइन’ ने केली आपल्या ३० विजेत्यां मुलींची घोषणा!"

Leave a comment

Your email address will not be published.


*