ऑल-न्यू ग्रँड चेरोकीसाठी प्री-बुकिंग सुरु; जीप इंडियाकडून ग्लोबल प्रीमियम एसयूव्हीचे उत्पादन

Jeep India Brand Logo

Nipun J Mahajan, Head of Jeep Brand India with The all-new Grand Cherokee 5th-Gen luxury SUV

5व्या जनरेशन ग्रँड चेरोकीचे उत्पादन सुरू झाले

  • अतुलनीय क्षमतेसाठी प्रसिद्ध ऑल-न्यू ग्रँड चेरोकी जीपमधील पुढील पिढीतील तंत्रज्ञान आणि असिस्टंट सिस्टिम्स तुम्हाला खरोखर उल्लेखनीय आणि आकर्षक ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करतात.
  • सर्व नवीन जीप ग्रँड चेरोकीमध्ये प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आणि 110 हून अधिक सुरक्षितता वैशिष्ट्यांचा संपूर्ण संच असेल.
  • ऑल-न्यू जीप ग्रँड चेरोकीसाठी प्री-बुकिंग आता निवडक जीप डीलरशिपवर किंवा www.jeep-india.com वर सुरु झाली आहे. या एसयुव्हीची डिलिव्हरी महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Mumbai, 8 नोव्हेंबर 2022 (GPN)जीप इंडियाने  5व्या पिढीतील ग्रँड चेरोकीचे उत्पादन पुण्यातील रांजणगाव येथील प्रकल्पात सुरू केले आहे. ही मेड इन इंडिया असणारी ब्रँडची चौथी नेमप्लेट आहे. समकालीन स्टाइलिंग आणि अतुलनीय क्षमतेसाठी आधीच ओळखली जाणारी ही जीप एसयुव्ही लक्झरीसाठी आणि पुढच्या पिढीतील प्रगत ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाच्या संचासाठी ओळखली जाईल. तसेच आरामदायी इंटीरियर, उल्लेखनीय आणि आकर्षक ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित करेल.

5व्या पिढीतील ग्रँड चेरोकीमध्ये सर्व-नवीन आर्किटेक्चर आणि एरोडायनॅमिक बॉडी स्टाइल देण्यात आली आहे. यामध्ये व्हेईकल परफॉर्मन्स, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुधारण्यात आली आहे. एकूण प्रवासी सुरक्षितता, आराम आणि सुविधा वाढवण्यासाठी डिझाइन केलेली जीप ग्रँड चेरोकीमध्ये पुढीलप्रमाणे वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण करण्यात आली आहे. यामुळे ती लक्झरी एसयूव्ही सेगमेंटमध्ये इतरांपेक्षा सरस ठरते.

उत्पादन समारंभाच्या सुरुवातीला बोलताना जीप ब्रँड इंडियाचे प्रमुख निपुण जे महाजन म्हणाले की, ” ऑल-न्यू ग्रँड चेरोकी ड्रायव्हर तसेच प्रवाशांना उत्तम अनुभव देण्याचे वचन देते. चेरोकी एसयुव्ही ही उत्कृष्ट क्षमता, क्लासमधील अग्रणी प्रशस्तता आणि उत्कृष्ट सुरक्षितता देण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. ही लक्झरी एसयूव्ही सेगमेंटमध्ये 5व्या-जनरल मॉडेलला जागतिक आयकॉन बनवते. कंटेंट आणि फिचर्सचे योग्य मिश्रण प्रिमिअम आणि अनुकरणीय जीवनशैलीचा ग्राहकांना अनुभव देते.”

लक्झरी एसयूव्ही ग्रँड चेरोकीच्या मागील पिढ्यांचा वारसा जपण्यात आला आहे. या एसयुव्हीने ३० वर्षांपूर्वी पदार्पण केले आणि विभाग स्थापन केला. जीप ग्रँड चेरोकीमध्ये आधुनिक आणि नवीन-युगातील डिझाइन, अगदी नवीन इंटीरियर, असंख्य प्रीमियम आणि जीवनशैली वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

  • पूर्णसूट – फुल-स्पीड फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग प्लस पेडेस्ट्रीअन इमर्जन्सी ब्रेकिंग, स्टॉप अँड गोसह अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट आणि क्रॉस पाथ डिटेक्शन, पॅसिव्ह पेडेस्ट्रीअन संरक्षण, ड्रॉसिव्ह ड्रायव्हर, अ‍ॅक्टिव्ह ड्रायव्हर यासारख्या वैशिष्ट्यांसह प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) मॅनेजमेंट सिस्टम आणि इंटरसेक्शन कोलिजन असिस्ट सिस्टम.
  • अॅक्टिवनॉईस कंट्रोल सिस्टिम
  • थ्रीपॉईंट सीटबेल्ट आणि पाचही पॅसेंजरसाठी बसल्यानंतरची डिटेक्शन सिस्टिम
  • ग्राहकांनात्यांच्या आवडीप्रमाणे कार कस्टमाईज करण्यासाठी अनेक पर्याय
  • रिमोटफंक्शन्ससह पूर्ण कनेक्टिव्हिटी पॅकेज
  • 24×7डेडिकेटेड असिस्टंस
  • स्लिमएचव्हीएसी व्हेंट्स असलेले इंटीरियर फ्रंट पॅनल, ड्रायव्हरला चांगली सुलभता मिळण्यासाठी प्रारंभिक वैशिष्ट्यांसह  10” हेड अप डिस्प्लेची पुर्नरचना, 10.1-इंच (25.6-सेमी) टचस्क्रीन रेडिओ, 10.25-इंच (26-सेमी) इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पॅनेल तसेच सेगमेंट-फर्स्ट 10.25-इंच (26-सेमी) फ्रंट पॅसेंजर इंटरएक्टिव्ह डिस्प्ले.
  • पाचहीपॅसेंजर साठी प्रीमियम कॅप्री लेदरच्या हवा खेळती राहण्यासाठी सछिद्र सीट्स.
  • साहित्यनेण्याची क्षमता किंवा प्रशस्तपणा व रस्त्यावरील उपस्थितीला धक्का न लावता एरो डायनॅमिक परफॉर्मन्स सुधारण्यासाठी कमी उंचीवरील टेपर्ड रूफ.
  • चांगलाप्रकाश खेळण्यासाठी व बाह्य दृश्यमानता वाढविण्यासाठी लोवर बेल्ट लाइनच्या खिडकीच्या काचा आणि मोठे पॅनोरॅमिक सनरूफ.

जीप ग्रँड चेरोकीच्या 5व्या पिढीतील आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे क्वाड्रा-ट्रॅक I 4×4 सिस्टीम आणि सिलेक-टेरेन ट्रॅक्शन मॅनेजमेंट सिस्टीम जी 4×4 कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी ऑन-रोड आणि ऑफ-रोड सेटिंग्ज दरम्यान निवडण्याची मुभा देते. प्रगत तंत्रज्ञान, अभिजातता, शक्तिशाली कार्यप्रदर्शन आणि विविध भूप्रदेशांचा सामना करण्याची अतुलनीय क्षमता यांचा मिलाफ या ग्रँड चेरोकीमध्ये आहे.

बुकिंगला सुरुवात

अशा या ऑल-न्यू ग्रँड चेरोकीसाठी आगाऊ बुकिंग करण्यास जीप इंडियाने सुरुवात केली आहे. जीप इंडिया वेबसाइटवर (jeep-india.com) किंवा निवडक जीप डीलरशिपवर हे बुकिंग खुले करण्यात आले आहे. एसयूव्ही लवकरच शोरूममध्ये प्रदर्शित केली जाईल आणि महिन्याच्या अखेरीस डिलिव्हरी सुरु केल्या जातील.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "ऑल-न्यू ग्रँड चेरोकीसाठी प्री-बुकिंग सुरु; जीप इंडियाकडून ग्लोबल प्रीमियम एसयूव्हीचे उत्पादन"

Leave a comment

Your email address will not be published.


*