कमिंस इंडिया लिमिटेडचा 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाही कालावधीचा निकाल

Cummins India Limited

मुंबई, 8 नोव्हेंबर, 2022 (GPN): कमिंस इंडिया लिमिटेड (एन.एस.ई: कमिंस.आय.एन.डी आणि बी.एस.ई: 500480) कमिंस इंडिया लिमिटेडच्या (‘सी.आय.एल’) संचालक मंडळाने आज

झालेल्या बैठकीत 30सप्टेंबर2022 अखेर संपलेल्या तिमाही आणि कालावधीसाठी (एकत्रित आणि स्टँडअलोन) विनालेखित आर्थिक निकालांचे पुनरावलोकन केले आणि मंजूर केले.

30 सप्टेंबर2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि कालावधीसाठी कामगिरीचे ठळक मुद्दे (स्वतंत्र आर्थिक निकालांवर आधारित) :

  • या तिमाहीतील एकूण विक्री ₹1,922 कोटी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 14% आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 16% ने वाढली आहे.
  • गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ₹1,391 कोटी रुपयांच्या देशांतर्गत विक्रीत 11% आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 19% ने वाढ झाली आहे.
  • गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 531 कोटी रुपयांच्या निर्यात विक्रीत 21% आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • अपवादात्मक वस्तूंपूर्वीचा नफा आणि कर ₹336 कोटी मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 15% ने जास्त आहे आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 21% ने जास्त आहे.
  • ₹336 कोटी करपूर्व नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 15% ने जास्त आहे आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 27% ने जास्त आहे.

कमिंस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्वथ राम म्हणाले:

सी.आय.एल ने या तिमाहीत विक्रमी कमाईची नोंद केली असून आमच्या बऱ्याच देशांतर्गत आणि निर्यात प्रधान एंड मार्केट्स मध्ये सतत मागणी दिसून येत आहे. महागाई, भू-राजकीय प्रश्न इत्यादींनी डोके वर काढलेले असतानाही आर्थिक क्रियाकलाप विकासाची गती टिकवून ठेवत आहेत. भरघोस टॅक्स कलेक्शन, कमॉडिटीचा खर्च कमी होणे, पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे आणि  अर्थव्यवस्थेचे डिजिटायझेशन करण्याचे सततचे प्रयत्न आमच्या उत्पादने आणि सेवांसाठी चांगले आहेत. पुरवठा साखळीची अडचण कायम असली, तरी आम्ही जागतिक एकात्मिक पुरवठा साखळीचा भाग असल्याने मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा सुरक्षित करण्यास आम्हाला सक्षम करीत आहोत. अल्प ते मध्यम मुदतीच्या मागणीच्या दृष्टिकोनाबद्दल आम्ही सावधपणे आशावादी आहोत.

भविष्यातील दृष्टीकोन:

कंपनीचा असा विश्वास आहे की नजीक ते मध्यम मुदतीमध्ये विविध एंड मार्केट्स मधून जोरदार मागणीचा ओघ टिकून राहण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि परिणामी वित्तीय धोरणातील व्याजदर वाढविण्याच्या कृतीचा परिणाम आणि त्याचा आपल्या एंड मार्केट्सच्या  कंझम्पशनवर होणारा परिणामावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमच्याकडे आर्थिक बाजू, जागतिक पुरवठा साखळी आणि देशांतर्गत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि ह्युमन रिसोर्ससेस यांचा ताळेबंद मजबूत असल्याने या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी कंपनी चांगल्या स्थितीत आहे. वाढती महागाई आणि भू-राजकीय मुद्द्यांमुळे अनिश्चित आर्थिक वातावरण लक्षात घेता, कंपनी आर्थिक वर्ष 2023 साठी मार्गदर्शन देत नाही.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "कमिंस इंडिया लिमिटेडचा 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाही कालावधीचा निकाल"

Leave a comment

Your email address will not be published.


*