एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक परिणाम

AU Small Finance Bank Limited (AU Bank)

मुंबई, 25 ऑक्टोबर 2022 (GPN):- एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ३० सप्टेंबर, २०२२ रोजी समाप्त तिमाहीतील वित्तीय निकालांना मंजूरी देण्यात आली.

एयू बँकेने आर्थिक वर्ष २३च्या दुसऱ्या तिमाहीत, आव्हानात्मक मॅक्रो स्थिती तसेच रोखतेचा अभाव व चढ्या महागाईच्या परिस्थितीही, उत्तम सर्वांगीण कामगिरी केली आहे. पीएटीमध्ये गेल्या तिमाहीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३४३ कोटी रुपयांवर गेला आहे, सीएएसए गुणोत्तरात सुधारणा होऊन ४२ टक्के झाला आहे, एकूण एनपीएमध्ये सुधारणा होऊन ती १.९० टक्के झाली आहे आणि निव्वळ एनपीए ०५६ टक्क्यांवर स्थिर आहे; बँकेने २,५०० कोटी रुपयांचे भांडवल उभे करून सीआरएआर २३.४ टक्क्यांवर नेला आहे.

आर्थिक वर्ष २३ मधील दुसऱ्या तिमाहीदरम्यान मॅक्रो अर्थव्यवस्थेतील स्थिती आव्हानात्मक होती. भूराजकीय परिस्थितीतून निर्माण होणारे धोके, सातत्याने वाढणारी महागाई व जगभरातील घटते व्याजदर यांमुळे एकंदर स्थिती अनिश्चित होती. देशांतर्गत स्तरावरही, रोखतेचा लक्षणीय अभाव होता आणि वाढत्या महागाईच्या दबावामुळे व्याजदर कमी होत होते. मात्र, देशांतर्गत मागणीने उत्तम जोर धरल्यामुळे तसेच भारतीय पतीच्या एकंदर वातावरणामुळे भारतातील बँकिंग उद्योगाने या तिमाहीत स्थितीस्थापक कामगिरी केली.

या पार्श्वभूमीवरही, एयू बँकेने उत्तम तिमाही कामगिरी केली. सीएएसए ठेवींचे एकत्रीकरण, पतवाढ, डिजिटल उत्पादनांचे संपादन व वापर, नफाक्षमतेत वाढ, मार्जिन किंवा संकलन कार्यक्षमता व असेट दर्जा या सर्वच निकषांवर बँकेने सातत्याने प्रगती केली आहे. बँकेने दमदार सर्वांगीण कामगिरी केली आहे आणि प्रत्येक निकषावर वाढ कायम राखली आहे.

ठेवींमध्ये गेल्या तिमाहीच्या तुलनेत ७ टक्के वाढ होत त्या ५४,६३१ कोटी रुपयांवरून ५८,६३१ कोटी रुपयांवर गेल्या, सीएएसए गुणोत्तरात सुधारणा होऊन ते ४२ टक्क्यांवर पोहोचले तर सीएएसए प्लस रिटेल मुदत ठेवींची संमिश्र श्रेणी ७३ टक्क्यांवर पोहोचली. निधीवर आधारित वितरणांमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत २ टक्के वाढ होऊन ती ८,६०५ कोटी रुपयांवर गेली. आर्थिक वर्ष २३च्या पहिल्या तिमाहीत हा आकडा ८,४४५ कोटी रुपये होता. बँकेने ग्रॉस अॅडव्हान्सेस विभागात मागील तिमाहीच्या तुलनेत ६ टक्के वाढ साध्य करून तो ५२,४५२ कोटी रुपयांवर नेला, आर्थिक वर्ष २३च्या पहिल्या तिमाहीत तो ४९,३४९ कोटी रुपये होता. याला कार्यक्षम संकलनाची जोड सातत्याने मिळाली. या तिमाहीत संकलनाचा दर १०८ टक्के होता. त्यामुळे असेट दर्जा गुणोत्तरामध्ये सातत्यपूर्ण सुधारणा झाली. बँकेने डिजिटल सेवांमध्येही मजबूत स्थान कायम राखले आहे. एयू ०१०१, व्हिडिओ बँकिंग, क्रेडिट कार्डस्, यूपीआय क्यूआर आदी सुविधांनी उत्तम वेग कायम राखला आहे.

एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अगरवाल बँकेच्या कामगिरीबद्दल म्हणाले, “आर्थिक वर्ष २३च्या पहिल्या सहामाहीतील कामकाजाच्या वातावरणात बरीच अनिश्चितता होतीचलनवाढरोखतेचा अभाव आणि लक्षणीयरित्या वाढलेले दर ही स्थिती तर अद्याप कायम आहेदेशांतर्गत परिस्थिती प्रोत्साहक असलीतरी या घटकांचा मागणीवरील व सक्रियतेवरील परिणाम दुर्लक्षून चालणार नाही आणि आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोतया संदर्भातबँकेने आर्थिक वर्ष २२च्या पहिल्या सहामाहीत उत्तम कार्यकारी कामगिरी केली आहे आणि रिटेल ठेवींचे एकत्रीकरणसर्व प्रकारच्या कर्जवितरणात पतवाढडिजिटल उत्पादनांचे सातत्यपूर्ण संपादन व उपयोग या सर्वच निकषांवर बँकेने प्रगती केली आहेसंकलन कार्यक्षमता भक्कम राहिली आहे आणि त्याची परिणती असेटचा दर्जा दमदार राखण्यात झाली आहेयाशिवाय २,००० कोटी रुपयांचे इक्विटी भांडवल व ५०० कोटी रुपयांचे श्रेणी २ भांडवल असे २,५०० कोटी रुपयांचे भांडवल उभारून बँकेने ताळेबंद भक्कम केला आहेयामुळे आम्हाला या अनिश्चित काळात अधिक स्थितीस्थापकत्व प्राप्त झाले आहे आणि वाढीच्या संधी घेण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक परिणाम"

Leave a comment

Your email address will not be published.


*